Devendra Fadanvis | आम्हाला पुन्हा संधी मिळणारच- देवेंंद्र फडणवीस

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माथाडी कामगारांच्या मेळाव्यात मोठं विधान केलं आहे. आम्हाला पुन्हा सत्तेची संधी मिळणारच आहे, असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. 

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माथाडी कामगारांच्या मेळाव्यात मोठं विधान केलं आहे. आम्हाला पुन्हा सत्तेची संधी मिळणारच आहे, असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. नवी मुंबई येथे दिवंगत आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या जयंती निमित्त माथाडी कामगारांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला संबोधित करताना देवेंद्र फडणवीस यांनी हे विधान केलं. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. मुख्यमंत्रीपदाच्या काळात माथाडी कामगारांना आम्ही सरकारचे दरवाजे पूर्णपणे उघडे केले होते. माथाडी नेत्यांनी कधीही प्रश्न मांडावा आणि आम्ही तो सोडवावा अशी व्यवस्था राज्य सरकारमध्ये आम्ही त्या काळात उभी केली होती. अजून पुढचा काळ मिळाला असता तर उरलेले प्रश्नही सोडवले असते. आता या सरकारला संधी आहे. ते सोडवतील याचा मला विश्वास आहे. नाही सोडवले तर आम्हाला पुन्हा संधी मिळणारच आहे. त्यावेळी आम्ही प्रश्न सोडवू, असं सांगतानाच लोकशाहीत कमी अधिक होत असतं. कधी हे असतात कधी ते असतात, असं फडणवीस म्हणाले.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI