Nana Patole नांदेडमध्ये आल्यास त्यांना काळे फासून जोड्याने मारु, BJP चा इशारा | Nana Patole Controversy
नाना पटोले यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दलच्या वक्तव्यानंतर भारतीय जनता पक्ष आक्रमक झाला आहे. नाना पटोले नांदेडमध्ये आल्यास त्यांना काळे फासून जोड्याने मारु, असा इशारा भाजपच्या नेत्यांनी-कार्यकर्त्यांनी दिला आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) भाजपला थेट अंगावर घेत आल्याचं आपण पाहतो. नाना पटोले हे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून राज्यातील काँग्रेसही चांगलीच आक्रमक झाल्याचंही पाहायला मिळत आहे. पटोले हे भाजप आणि विरोधकांवर थेट टीका करतात. मात्र, आता पटोले यांचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ते पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना मारण्याची आणि शिव्या देण्याची भाषा करत असल्याचं पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये ते कार्यकर्त्यांशी संवाद साधताना दिसून येत आहेत. मात्र, त्यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचं पाहायला मिळतंय. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. दरम्यान, भाजपकडूनही पटोले यांच्या या व्हिडीओवर जोरदार हल्ला चढवण्यात आलाय. दरम्यान, नाना पटोले यांच्या वक्तव्याविरोधात भारतीय जनता पक्ष आक्रमक झाला आहे. नाना पटोले नांदेडमध्ये आल्यास त्यांना काळे फासून जोड्याने मारु, असा इशारा भाजपच्या नेत्यांनी-कार्यकर्त्यांनी दिला आहे.
Published on: Jan 18, 2022 03:26 PM
रोहित पवारांच्या आंदोलनाकडे शेतकऱ्यांची लढाई म्हणून पहा, कारण...
जरांगे पाटलांची रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी भेट, दोघांमध्ये...
'या' लास्ट सर्टिफिकेटची मला गरज होती, अखेर त्या प्रकरणावर CM
मोठी अपडेट! रोहित पवारांची तब्येत खालावली तर पत्नी कुंती यांना अश्रू

