West Bengal Election Results 2026 | पश्चिम बंगालमधील भवानीपूर मतमोजणी केंद्राबाहेर मोठा गोंधळ, स्वत: ममता बॅनर्जी…
पश्चिम बंगालच्या निवडणुकीत भाजपने मोठी मुसंडी मारल्याचं दिसून येत आहे. सुरुवातीच्या कलांपासूनच भाजपच्या विजयाचे चिन्ह दिसत होते. यादरम्यान अनेक ठिकाणी भाजप नेते जल्लोष करताना दिसत आहेत. मात्र अलीकडेच याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.
पश्चिम बंगालच्या निवडणुकीत भाजपने मोठी मुसंडी मारल्याचं दिसून येत आहे. सुरुवातीच्या कलांपासूनच भाजपच्या विजयाचे चिन्ह दिसत होते. यादरम्यान अनेक ठिकाणी भाजप नेते जल्लोष करताना दिसत आहेत. मात्र अलीकडेच याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. पश्चिम बंगालमधील भवानीपूर मतमोजणी केंद्राबाहेर मोठा गोंधळ उडाला आहे.
भवानीपूर ही जागा स्वत: तृणमूल काँग्रेस पार्टीच्या प्रमुख नेत्या आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी लढवत आहेत. त्यांच्या विरुद्ध याच जागेवर भाजपचे सुवेंदु अधिकारी निवडणुक लढवत आहेत. काही वेळापूर्वीच केंद्रावरील एका काउंटिंग एजंटला मारहाण झाल्याचं समोर आलं होतं. यानंतर ममता बॅनर्जी स्वतः मतमोजणी केंद्रावर पोहोचल्या होत्या. महत्त्वाची बाब म्हणजे यावेळी त्यांच्यासोबत फक्त खासगी सुरक्षा रक्षक होते. ताज्या माहितीनुसार सध्या या जागेवरची मतमोजणी बंद करण्यात आली असून पुढे नेमकं काय घडेल? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
Published on: May 04, 2026 05:13 PM
निंबाळकरांसाठी 84 सभा अन् मीदेखील तीन दिवस तिथेच... संजय राऊतांनी
कसलं ऑपरेशन टायगर? घंटा! ते खासदार घंटा...; राऊतांनी उडवली खिल्ली
20 वर्षांचा न्यायाचा संघर्ष! पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा आज निकाल
अखेर फोटो समोर आला! ऑपरेशन टायगरमधील बंडखोर खासदार कुठे आहेत?

