West Bengal Election Results | प.बंगालमध्ये निवडणूक आयोगानुसार भाजपा 24 जागांवर पुढे तर टीएमसी… सुरुवातीच्या कलांमध्ये नेमकं चित्र काय?
आसाम, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा आज निकाल लागणार असून यामध्ये कोणता पक्ष बाजी मारेल याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे. निवडणुकांच्या मतमोजणीला आज सकाळी ८ वाजल्यापासून सुरुवात झाली आहे.
आसाम, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा आज निकाल लागणार असून यामध्ये कोणता पक्ष बाजी मारेल याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे. निवडणुकांच्या मतमोजणीला आज सकाळी ८ वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. यावेळी सुरुवातीला टपाली मतपत्रिकांची (पोस्टल बॅलेट) मोजणी होते आणि नंतर इव्हीएम मतमोजणीला सुरुवात होते.
पश्चिम बंगालमधील ताज्या कलांनुसार, भाजप 24 जागांवर तर टीएमसी 5 जागी आघाडीवर आहे. दोन्ही पक्षांमधील आकडेवारीचा फरक खूप मोठा दिसत आहे. इतकेच नाही तर ममता बॅनर्जी यांची जी सुरक्षित सीट म्हटली जात होती त्यांचा गड म्हटला जात होता त्या जागेवर देखील काट्याची लढत पाहायला मिळत आहे.
Published on: May 04, 2026 10:47 AM
Follow Us
Latest Videos

