AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | अंबानी यांच्या घरासमोर बॉम्ब ठेवणारा मास्टरमाईंड कोण? अनिल देशमुख म्हणाले...

Video | अंबानी यांच्या घरासमोर बॉम्ब ठेवणारा मास्टरमाईंड कोण? अनिल देशमुख म्हणाले…

| Updated on: Mar 02, 2024 | 7:42 PM
Share

आपल्याला ईडी लावल्यापूर्वी आघाडी सरकारच्या वरिष्ठ नेत्यांवर आरोप करण्याची ऑफर देण्यात आली होती आणि ती जर स्विकारली असती तर त्याचवेळी आघाडी सरकार कोसळले असते असा दावाही अनिल देशमुख यांनी केला. आपल्यावर 100 कोटीचा आरोप ठेवून ईडीने अटक केली परंतू चार्जशिटमध्ये प्रत्यक्षात 1 कोटी 71 आरोप ठेवला. त्याचे ही पुरावे दिले नसल्याचे देशमुख म्हणाले.

नाशिक | 2 मार्च 2024 : देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्कॉर्पिओत स्फोटके ठेवण्यात आली होती. या प्रकरणाची आमच्या सरकारने चौकशी केली, तेव्हा या घटनेत नाव पुढे येईल म्हणून त्याच्या स्कॉर्पिओच्या मालकाची हत्या करण्यात आली. या प्रकरणाची चौकशी केली असता मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग हेच या प्रकरणाचे मास्टर माईंड असून त्यांच्या या प्लानमध्ये सचिन वझे आणि चार एपीआय असल्याचंही आढळून आल्याचा खुलासा माजी गृहमंत्री आणि शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी केला आहे. त्यानंतर आपण परमबीर सिंग यांना निलंबित केले. तर सचिन वाझे यांना काढून टाकले. भाजपातील काही नेत्यांनी या दोघांना एकत्र बोलावून आपल्यावर आरोप करायला लावले, त्यातून परमबीर सिंग यांनी 100 कोटीच्या वसुलीचा आरोप आपल्यावर केला असल्याचा दावा देशमुख यांनी केला. या प्रकरणात आरोप झाल्यावर आपण तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली असे अनिल देशमुख म्हणाले. या प्रकरणात न्या. चांदीवाल आयोग नेमण्यात आला होता. चांदीवाल आयोगाचा अहवाल येऊन दीड वर्षे झाली, तो अधिवेशनात ठेवला जाईल अशी अपेक्षा होती. परंतू तो अद्याप ठेवलेला नसल्याचे देशमुख यांनी सांगितले. परंतू सहा समन्स पाठवून देखील परमबीर कोर्टात हजर झाले नाहीत. चांदीवाल आयोगाच्या अहवाल आल्यानंतर आपण पुढील निर्णय घेऊ असेही देशमुख यांनी सांगितले.

Published on: Mar 02, 2024 07:00 PM