Vijay Wadettiwar | सुप्रीम कोर्टात कॅव्हेट दाखल करणार; मंत्री विजय वडेट्टीवारांची माहिती

ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात सादर केलेल्या प्रतित्रापत्रावर आम्ही कॅव्हेट दाखल करणार असल्याचं म्हटलंय. केंद्राच्या कोर्टातील भूमिकेनं आरक्षण विरोधी भाजपचा चेहरा उघड झालाय, असं वडेट्टीवार म्हणाले आहेत.

ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात सादर केलेल्या प्रतित्रापत्रावर आम्ही कॅव्हेट दाखल करणार असल्याचं म्हटलंय. केंद्राच्या कोर्टातील भूमिकेनं आरक्षण विरोधी भाजपचा चेहरा उघड झालाय, असं वडेट्टीवार म्हणाले आहेत. 65 पानांच्या प्रतिज्ञापत्रात केंद्राचं म्हणणं म्हणजे ओबीसींवर अन्याय आहे.

सुधारित अध्यादेश राज्यपालांकडे

राज्य सरकारचा अध्यादेशाद्वारे ओबीसी आरक्षण काही प्रमाणात देण्याचा प्रयत्न आहे. अध्यादेश सुधारित करुन राज्यपालांकडे पाठवला आहे. राज्यपाल त्यावर राज्यपाल निर्णय घेतील ही अपेक्षा असल्याचं विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत.

ओबीसी समाजचं भाजपला जागा दाखवेल

भाजप ओबीसी आरक्षणाच्या विरोधात आहे हे त्यांनी दाखवून दिलंय.अध्यादेशालाही विरोध झाला.केंद्रही सांगतंय इम्पेरिकल डाटा देणार नाही. आता ओबीसी समाजच भाजपला जागा दाखवेल, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI