Special Report | ‘वाईन’वर अंतिम मोहोर!-TV9
गेल्या कॅबिनेटमध्ये सरकारने मोठा निर्णय घेत वाईन दुकानात आणि सुपरमार्केटमध्ये विकण्यास परवानगी देण्याची घोषणा केली. त्यानंतर भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारला जोरदार घेरलं. फक्त भाजपच नाही तर इतर अनेक घटकांमधून या निर्णयाला विरोध करण्यात आला. आता राष्ट्रवादी नेते नवाब मलिक यांनी भाजप नेत्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
मुंबई : राज्यात सध्या वाईवरून जोरदार पॉलिटिकल राडा सुरू आहे. गेल्या कॅबिनेटमध्ये सरकारने मोठा निर्णय घेत वाईन दुकानात आणि सुपरमार्केटमध्ये विकण्यास परवानगी देण्याची घोषणा केली. त्यानंतर भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारला जोरदार घेरलं. फक्त भाजपच नाही तर इतर अनेक घटकांमधून या निर्णयाला विरोध करण्यात आला. आता राष्ट्रवादी नेते नवाब मलिक यांनी भाजप नेत्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ‘सर्वात जास्त पिणारी मंडळी भाजपमध्येच आहेत, असे वक्तव्य नवाब मलिक यांनी केल्याने, भाजपमधील हे मद्यपी कोण? असा सवाल सर्वांसमोर उपस्थित झाला आहे. मागच्या कॅबिनेटमध्ये जो वाईन पॉलिसीचा निर्णय सरकारने घेतला होता, त्यावर आज शिक्कामोर्तब झाले आहे. जे भाजप आज सांगत आहे की बेवड्यांचं राज्य होईल, त्याच भाजपात सर्वात जास्त नेते दारू पितात. भाजप नेत्यांचे दारूचे कारखाने आहेत. भाजपच्या नेत्यांचे वाईन शॉप्स आहेत. भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांचे आणि माजी मंत्र्यांचे बार आहेत. त्यामुळे वाईनला विरोध करणाऱ्या भाजप नेत्यांनी हे सर्व परवाने परत करावे, भाजपच्या कार्यकर्त्यांनी शपथ घेतली पाहिजे की दारू पिणार नाही, असा खोचक टोला नवाब मलिक यांनी लावला आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

