डॉक्टरकडे तपासणीसाठी गेली तरूणी अन्… बीडमध्ये नेमकं काय घडलं? आंदोलकांकडून बंदची हाक
एका डॉक्टराकडे तपासणीसाठी गेलेल्या तरुणीची छेड काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी परळीतील वातावरण चांगलंच तापले होते. तरुणीच्या नातेवाईकांसह मोठ्या संख्येने जमाव परळी शहर पोलीस ठाण्याबाहेर जमला...
बीडच्या परळी शहरातील एका डॉक्टराकडे तपासणीसाठी गेलेल्या तरुणीची छेड काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी परळीतील वातावरण चांगलंच तापले होते. तरुणीच्या नातेवाईकांसह मोठ्या संख्येने जमाव परळी शहर पोलीस ठाण्याबाहेर जमला होता. परळी शहरातील डॉक्टरचे जनरल फिजिशियन हॉस्पिटल आहे. याच हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी गेलेल्या तरुणीचा विनयभंग केल्याचा आरोप तरुणीने केला आहे. दरम्यान, याच प्रकरणावरून पीडित तरुणीला न्याय मिळावा या मागणीसाठी मोठा जमाव पोलीस ठाण्याबाहेर जमला होता. अखेर पोलिसांनी तपास करून डॉक्टरच्या विरोधात कलम 74,75( 2) 79,3,1, नुसार गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर संबंधित डॉक्टर फरार असून त्याच्या अटकेच्या मागणीसाठी आज परळी बंद पुकारण्यात आला. दरम्यान याच पार्श्वभूमीवर आज परळी बंदची हाक देण्यात आले असून नागरिकांनी शांतता अबाधित ठेवावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे. आज परळी शहर कडकडीत बंद पाळला जाणार आहे. सकाळपासूनच व्यापाऱ्यांनी आपली दुकान बंद ठेवून या बंदला पाठिंबा दिलाय.