Russia Ukraine crisis | तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात करावी लागेल – Joe Biden
रशिया आणि युक्रेनमध्ये जोरदार युद्ध (war between Russia and Ukraine) सुरू आहे. आज या युद्धाचा चौथा दिवस आहे. रशियाने युक्रेनची राजधानी कीववर (Kiev) केलेल्या हल्ल्यात मोठं नुकसान झालं आहे.
रशिया आणि युक्रेनमध्ये जोरदार युद्ध (war between Russia and Ukraine) सुरू आहे. आज या युद्धाचा चौथा दिवस आहे. रशियाने युक्रेनची राजधानी कीववर (Kiev) केलेल्या हल्ल्यात मोठं नुकसान झालं आहे. अनेक इमारती उद्धवस्त झाल्या असून, हजारो लोकांना आपला जीव गमावावा लागला आहे. रशियाने युक्रेनचे शेकडो सैन्यस्थळे उद्धवस्त केले आहेत. रशियाने युक्रेनवर केलेल्या या हल्ल्याचा आता जगभरातून निषेध करण्यात येत असून, युद्ध थांबावावे अशी मागणी होत आहे. दरम्यान रशिया – युक्रेन युद्धावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (US President Joe Biden) यांनी प्रतिक्रिया देताना मोठं वक्तव्य केलं आहे. ते बोलताना म्हणाले की, रशियाने आता आमच्यापुढे केवळ दोनच पर्याय शिल्लक ठेवले आहेत. एक म्हणजे तिसरे महायुद्ध किंवा रशियावर कडक आर्थिक निर्बंध घालणे हे आहेत. दरम्यान अमेरिकेकडून या पूर्वीच या हल्ल्याचा निषेध करण्यात आला आहे. अमेरिकेने रशियावर अनेक निर्बंध घातले असून, युरोपीयन संघामधील देशांनी रशियन बँकांना स्विफ्टमधून निष्कासीत केले आहे.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?

