Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Video : बड्या बापाच्या लेकाचे भरचौकात अश्लील चाळे, BMW मध्ये बसून स्त्रियांसमोरच... व्हिडीओ व्हायरल

Pune Video : बड्या बापाच्या लेकाचे भरचौकात अश्लील चाळे, BMW मध्ये बसून स्त्रियांसमोरच… व्हिडीओ व्हायरल

| Updated on: Mar 08, 2025 | 1:52 PM

पुण्यातली शास्त्रीनगर भागात सकाळच्या वेळेला BMW कारमधील मद्यधुंद अवस्थेत एका तरुणाने रस्त्यावर अश्लील चाळे केल्याची घटना समोर आली आणि एकच संतापाचं वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळालं.

पुण्यात सातत्याने महिलांवर अत्याचार, गुन्हेगारी आणि हत्येच्या घटना घडताना दिसताय. अशातच पुण्यात नेमकं चाललंय तरी काय? असा संतप्त सवाल राज्यभरातील लोकांकडून केला जात आहे. अशातच आज पुन्हा एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी पुण्यात स्वारगेट एसटी डेपो परिसरात एका बसमध्ये तरुणीवर बलात्कार झाल्याच्या घटनेनंतर आता मद्यधुंद अवस्थेतील तरूणाने पुण्यातील शास्त्रीनगर चैकातील सिग्नलवर अश्लील चाळे केल्याचे पाहायला मिळाले. आज सर्वत्र महिला दिन साजरा केला जात असताना एका तरूणाने सिग्नलवरच स्त्रियांसमोर अश्लील चाळे केल्याचे सांगितले जात आहे. या तरूणाने महागड्या बीएमडब्ल्यू कारमध्ये बसून हे अश्लील कृत्य केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आज आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा केला जात असताना महिलांसमोर केलेल्या या कृत्यानंतर पुन्हा शरमेने मान झुकली असल्याचे दिसतंय. येरवडा भागांमध्ये शास्त्रीनगर चौकात स्त्रियांच्या समोर तरूणाने हे अश्लील चाळे केले. हा तरूण आणि त्याचा मित्र दोघेही मद्यधुंद अवस्थेत कारमध्ये होते. अश्लील चाळे करुन झाल्यावर दोघे फुल स्पीडमध्ये गाडी चालवत वाघोलीच्या दिशेने गेल्याची माहिती मिळतेय. तर या कारचा नंबर MH-12 RF8419 असा आहे.

Published on: Mar 08, 2025 12:48 PM