ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ; सूरज चव्हाण ईडी कार्यालयात
ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्या निटकवर्तींचा समावेश होता. मुंबई महानगरपालिकेच्या कथित घोटाळ्या प्रकरणी ईडीने शिवसेना युवासेना सचिव सूरज चव्हाण यांच्याही घरी छापेमारी केली होती.
मुंबई : काही दिवसांपुर्वीच कथित कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी ईडीने मुंबईतील जवळपास 15 ठिकाणी छापा मारला होता. यात ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्या निटकवर्तींचा समावेश होता. मुंबई महानगरपालिकेच्या कथित घोटाळ्या प्रकरणी ईडीने शिवसेना युवासेना सचिव सूरज चव्हाण यांच्याही घरी छापेमारी केली होती. तर तब्बल 17 तास चौकशी केल्यानंतर त्यांच्याकडे काही कागदपत्रे सापडली होती. ज्यामुळे ठाकरे गट आणि सूरज चव्हाण यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यानंतर त्यांना ईडीने समन्स बजावत 26 जूनला ईडी कार्यालयात हजर राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे चव्हाण हे ईडी कार्यालयात हजर झाले आहेत.
Published on: Jun 26, 2023 01:01 PM
Follow Us
Latest Videos
महेश ट्युटोरियल्सचा मोठा धक्का! राज्यभरातील 33 सेंटर अचानक बंद
नागपूरच्या कमाल चौकात भरदिवसा फायरिंग! अजय चिंचखेडेवर जीवघेणा हल्ला
एकनाथ शिंदेंचा दिल्ली दौरा अचानक रद्द, महायुतीच्या नेत्यांसोबत आज...
15 दिवसांत महाराष्ट्रात राजकीय भूकंप?; दोन्ही राष्ट्रवादी एकत्र....
