Agricultural : शेती पारंपरिक पण उत्पन्न लाखोंमध्ये, अल्पभूधारक शेतकऱ्याने कशी साधली किमया?

| Updated on: Sep 23, 2022 | 4:42 PM

यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे केवळ हंगामी पिकाचेच नव्हे तर बागायती क्षेत्राचेही मोठे नुकसान झाले आहे. पण माळरानावरील पपई बागेला याचा धोका निर्माण झाला नव्हता. त्यामुळेच उत्पादनात वाढ झाली आहे.

 Agricultural : शेती पारंपरिक पण उत्पन्न लाखोंमध्ये, अल्पभूधारक शेतकऱ्याने कशी साधली किमया?
माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्याने पपईतून विक्रमी उत्पन्न घेतले आहे.
Follow us on

पंढरपूर : काळाच्या ओघात शेती पद्धतीमध्ये (Agricultural practices) बदल झाला तरी, निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादनात वाढ होईलच असे नाही. त्यामुळे उत्पादनाची शाश्वती शक्य नाही. अशा प्रतिकूल परस्थितीमध्येही माळशिरस तालुक्यातील एका अल्पभूधारक (Small holder farmer) शेतकऱ्याने पावने दोन एकरामध्ये तब्बल 22 लाखाचे उत्पन्न मिळाले आहे. केवळ पावने दोन एकरामध्ये बाळासाहेब आणि रामदास सरगर या बंधूनी पपईची लागवड (Papaya) केली होती. आठ महिने अथक परीश्रम आणि योग्य नियोजन करुन सरगर बंधू यांना तब्बल 22 लाखाचे उत्पन्न मिळवले आहे.त्यामुळे शेती तोट्यात असे म्हणाऱ्यांना अद्दल घडवूण आणणारा हा प्रयोग सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

माळशिरस हा दुष्काळी पट्ट्यातील तालुका आहे. येथील कन्हेर गावातील बाळासाहेब आणि रामदास सरगर या बंधूने आपल्या पावणे दोन एकर शेतीमध्ये आठ महिन्यापूर्वी पपईची लागवड केली. 2100 रोपांमधून आज संपूर्ण पपईची बाग फुलली गेली.

सरगर यांच्या पपई बागेतील एका झाडाला अंदाजे 80 ते 90 फळ लागले आहे. त्यामुळे दुष्काळी पट्ट्यातील जिराईत शेतीला आता बागायतीचे स्वरूप आले आहे. योग्य नियोजन आणि अथक परीश्रम यामधून हे साध्य झाले आहे.

कन्हेर गावच्या माळरानावरील पपईला आता परराज्यातून मागणी होत आहे. चेन्नई आणि कोलकत्ता येथून सरगर यांच्या पपईला मागणी आहे. उत्पादनात घट आणि मागणी अधिक यामुळे पपईला अधिकचा दर मिळाला आहे.

रासायनिक खतांचा वापर न करता संपूर्णपणे पारंपारिक आणि सेंद्रिय शेतीचा अवलंब करून सरगर बंधूने केलेली किमया सध्या इतर शेतकऱ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे. हा प्रयोग सेंद्रिय शेतीसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे केवळ हंगामी पिकाचेच नव्हे तर बागायती क्षेत्राचेही मोठे नुकसान झाले आहे. पण माळरानावरील पपई बागेला याचा धोका निर्माण झाला नव्हता. त्यामुळेच उत्पादनात वाढ झाली आहे.