रब्बा हंगामातील उत्पन्न वाढविण्यासाठी शेतीशाळांचा उपक्रम, शेतकऱ्यांना होणार फायदा

| Updated on: Sep 16, 2021 | 3:52 PM

खरिप हंगामाचे पावसामुळे नुकसान झालेले आहे. मात्र, रब्बीत तरी शेतकऱ्यांचे उत्पादन वाढावे या हेतूने सर्व जिल्ह्यात शेतीशाळा घेण्यात येणार आहेत. यामध्ये शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन केले जाणार असून याची जबाबदारी ही कृषी सहायकावर असणार आहे. यामध्ये सर्वाधिक शाळा ह्या हरभरा पिकासाठी घेतल्या जाणार आहेत.

रब्बा हंगामातील उत्पन्न वाढविण्यासाठी शेतीशाळांचा उपक्रम, शेतकऱ्यांना होणार फायदा
संग्रहीत छायाचित्र
Follow us on

मुंबई : खरिप हंगामाचे पावसामुळे नुकसान झालेले आहे. मात्र, रब्बीत तरी शेतकऱ्यांचे उत्पादन वाढावे या हेतूने सर्व जिल्ह्यात शेतीशाळा घेण्यात येणार आहेत. यामध्ये शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन केले जाणार असून याची जबाबदारी ही कृषी सहायकावर असणार आहे. यामध्ये सर्वाधिक शाळा ह्या हरभरा पिकासाठी घेतल्या जाणार आहेत.
शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी प्रशासकीय स्तरावर प्रयत्न हे केले जात आहेत. त्याचअनुशंगाने या शेतीशाळांचे आयोजन करण्यात आले आहे.

यंदाच्या रब्बी हंगामात हरभरा हेच याच पिकावर अधिकचा भर राहणार आहे. त्यानुसार तयारी करण्यात आली असून हरभऱ्याचे उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न असणार आहेत. राज्यात तब्बल 8483 शेतीशाळा घेतल्या जाणार असून यापैकी हरभऱ्यासाठी 5379 , ज्वारीसाठी 727, मक्यासाठी 286, ऊसासाठी 85 तर इतर पिकासाठी 2005 शेतीशाळा या घेतल्या जाणार आहेत. विभागानुसार शेतीशाळांचे आयोजन करण्यात आले असून ज्या भागात पिकाला महत्व आहे त्यानुसार हा कार्यक्रम पार पडणार आहे. या शाळांची जबाबदारी ही कृषी सहायक तसेच पर्यवेक्षांवर असणार आहे. या दरम्यान, स्थापन करण्यात आलेले गटशेती गट हे समोर ठेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन हे केले जाणार आहे.

याकरिता ज्या कृषी अधिकीऱ्यास त्याच्या कामामुळे पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे त्यांना प्रधान्य दिले जाणार आहे. याशिवाय ज्या शेतकऱ्यांनी शेतामध्ये यशस्वी प्रयोग राबवले आहेत त्यांनाही मार्गदर्शन करता येणार आहे. यामाध्यमातून शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे रब्बी हंगामाातील उत्पादन वाढावे हा सरकारचा उद्देश आहे.

मार्गदर्शनामध्ये या विषयावर शेतकऱ्यांना धडे

केवळ माहितीअभावी शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट होते असे चित्र सर्वत्रच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पिक लागवडीपासून ते बाजारपेठपर्यंत मार्गदर्शन केले जाणार आहे. यामध्ये हरभऱ्यावरील घाटी आळीचा प्रादुर्भाव कसा आटोक्यात आणावा, मका आणि ज्वारीवरील लष्करी आळी आणि ऊसावरील हुमनी नियंत्रणाच आणण्यासाठी मार्गदर्शन होणार आहे. त्यामुळे पिकाची पेरणी होताच हे धडे दिले जाणार असल्याने याचा फायदा होणार आहे.

शेतीशाळासाठी 25 कोटींचा निधी

शेती शाळेची जबाबदारी ही कृषी सहायक आणि पर्यवेक्षक यांच्यावर राहणार आहे. याकरिता 25 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. अधिकारी यांना ऑनलाईद्वारेही मार्गदर्शन करता येणार आहे. राज्यात 885 मंडळ कृषी अधिकारी, 1170 पर्यवेक्षक आणि 10, 620 कृषी सहायक हे सहभागी होणार आहेत.

शेतीशाळेचा उद्देश

शेतकऱ्यांना कोणत्या पिकाला हवामाह अनुकूल आहे. त्याचा उत्पादनावर काय परिणाम होणार याबाबत धडे दिले जाणर आहेत. तर पेरणापासून बाजारपेठपर्यंतची माहिती ही शेतकऱ्यांना दिली जाणार आहे. त्यामुळे प्रक्रिया आणि बाजारमुल्य यालादेखील चालना मिळणार आहे. (Agriculture schools to increase revenue during Rabba season, farmers to benefit)