AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोयाबीनला विक्रमी दर की अफवा, शेतकऱ्यांनी बाजारपेठेचा अभ्यास करावा

गतआठवड्यात हिंगोली बाजार समितीाध्ये सोयाबीनला 11 हजार रुपये दर मिळाला होता. यानंतर बार्शी येथील बाजार समितीमध्ये 11 हजार 50 रुपये तर बुधवारी अकोला बाजार समितीमध्ये 11 हजार 501 रुपये असा दर मिळाला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले अतले तरी ते काही वेळेपुरते मर्यादित आहे. कारण हे दर केवळ मुहुर्ताच्या सोयाबीनला मिळालेले आहेत

सोयाबीनला विक्रमी दर की अफवा, शेतकऱ्यांनी बाजारपेठेचा अभ्यास करावा
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: | Updated on: Sep 16, 2021 | 12:53 PM
Share

लातुर : यंदाच्या खरिप हंगामात सर्वात चर्चेत राहिलेलं पिक म्हणजे सोयाबीन. खरिपातील मुख्य पिक म्हणून सोयाबीनची ओळख आहे. मात्र, पेरणीपासून बाजार आवक सुरु होईपर्यंत सोयाबीनची वेगवेगळ्या अनुशंगाने चर्चा घडत आहे. गेल्या आठवड्यापातून अशा तीन घटना घडल्या आहेत त्यामुळे सोयाबीनची पुन्हा चर्चा होत आहे. त्याला निमित्त आहे ते सोयाबीनच्या दराचे. सोयाबीनच्या दराकडे सबंध शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिलेले असते. गतआठवड्यात हिंगोली बाजार समितीाध्ये सोयाबीनला 11 हजार रुपये दर मिळाला होता. यानंतर बार्शी येथील बाजार समितीमध्ये 11 हजार 50 रुपये तर बुधवारी अकोला बाजार समितीमध्ये 11 हजार 501 रुपये असा दर मिळाला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले अतले तरी ते काही वेळेपुरते मर्यादित आहे. कारण हे दर केवळ मुहुर्ताच्या सोयाबीनला मिळालेले आहेत

पावसामुळे खरीपातील सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. असे असले तरी पहिल्या पेऱ्यातील सोयाबीनची आवक ही सुरु झाली आहे. पावसामु्ळे सोयाबीन हे डागाळलेले असल्याने दर कमी मिळणार असे चित्र होते. मात्र, हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रमी 11 हजार रुपये क्विंटल असा दर मिळाला होता तर दोन दिवसापूर्वी बार्शी येथील बाजारपेठेत 11 हजार 50 असा दर मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.

अजूनही दर वाढतेल अशी आशा शेतकऱ्यांना लागलेली आहे. मात्र, या वाढीव दरांचे वास्तव हे वेगळे आहे. कारण सोयाबीनची आवक सुरु झाली की ज्या सोयाबीने आवक सुरु झाली आहे त्या एक किंवा दोन क्विंटलला विक्रमी दर दिला जातो. तोच प्रकार हिंगोली, बार्शी आणि अकोला येथेही घडला आहे. सोयाबीनला सध्या 8 हजार प्रति क्विंटल एवढा दर आहे. नव्या सोयाबीनची आवक असल्याने हा दर असून भविष्यात यामध्ये चढ-उतार होणार असल्याचे कृषी तज्ञांनी सांगितले आहे.

8 हजार ते 8 हजार 500 चा सोयाबीनला दर

गेल्या दहा दिवसापातून सोयाबीनची आवक सुरु झाली आहे. पावसामुळे न डागालेल्या सोयाबीनला 8 हजार ते 8 हजार 500 चा दर मिळत आहे. हाच दर गेल्या काही दिवसांपासून स्थिर आहे. तर आवकही सध्या कमी असल्याने दर हे वाढलेले आहे. यंदा सोयाबीनची पेरणी उशिराने झाली शिवाय मध्यंतरीच्या पावसामुळे काढणीही लांबलेली आहे. त्यामुळे भविष्यात दर कमीच होतील असा अंदाज व्यक्त होत आहे.

वाढीव दराच्या पावतीने सोशल मिडीयात धुमाकूळ

अकोला जिल्ह्यातील एका शेतकऱ्याला तब्बल 11 हजार 501 रुपयाचा दर मिळाला आहे. त्या दराची पावती हा सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. मात्र, हे मुहुर्ताचे सोयाबीन असल्याने याला व्यापाऱ्यांनी वाढीव दर दिलेला होता.

एकांब्याच्या शेतकऱ्याला मिळाला होता विक्रमी दर

हिंगोली जिल्ह्यातील एकंबा येथील शेतकऱ्याने केवळ 3 क्विंटल सोयाबीन आणले होते. यालाही सरासरीप्रमाणे दर मिळेल असा आशावाद होता, मात्र, जाहीर निलावात या सोयाबीनला तब्बल 11 हजार 21 असा दर मिळाला आहे. मात्र, हा दर केवळ 3 क्विंटलसाठी मिळालेला होता. इतर सोयाबीनची खरेदी ही 8 हजार प्रमाणेच करण्यात आली होती.

आगामी काळात दर अस्थिर राहणार

चांगल्या प्रतीच्या सोयाबीनला सरासरी एवढा भाव राहिल मात्र, पावसामुळे सोयाबीनचा दर्जा हा ढासाळलेला आहे. त्यामुळे बाजारात दाखल होणारे सोयाबीन डागाळलेले असणार त्यामुळे मालाप्रमाणे दर राहतील. Soyabean’s record rate is a rumour that farmers should be careful

संबंधित इतर बातम्या :

शेतकऱ्यांसाठी नवसंजवनी ठरणारी ‘प्रधानमंत्री कुसुम योजना’ आहे तरी काय? असा घ्या लाभ

क्विनोआ म्हणजे काय? जागतिक स्तरावरही त्याची ख्याती, जाणून घेऊ क्विनोआबद्दल

अतिवृष्टीने नाही तर वन्यप्राण्यांना त्रासून सोयाबीनवर फिरवला नांगर

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.