
शितलकुमार मोटे/ प्रतिनिधी: बीड जिल्ह्यातील आष्टी तालुका हा दुष्काळी भाग आहे. पण या दुष्काळी भागात एका महिलेने हिम्मतीनं फायद्याची शेती करुन दाखवली. कानडी खुर्द मेहकरी येथील महिला शेतकरी मंदाकिनी नानासाहेब गव्हाणे यांनी शेतात घामाने मोती पिकवले. डांगर भोपळा पिकासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर केला. रासायनिक खाताचा वापर न करता सेंद्रिय पध्दतीने शेतातील कचरा पाळा पाचोळया पासून सेंद्रिय पध्दतीने फवारणी केली. या एकरी पंधरा टन उत्पादन घेत आठ महिन्यांत तब्बल 45 टन डांगर भोपळा आपल्या शेतात पिकवला. या डांगरी भोपळ्याला राज्यातच नाही तर पाच राज्यात मोठी मागणी आहे.
इतर शेतकऱ्यांना प्रेरणा
या भोपळया पिकाची लागवड 8 बाय 2 वर लागवड करत आहेत.आमच्या शेजारीन मंदाकिनी नानासाहेब गव्हाणे या माझ्या मैत्रिणीने आम्हा महिलांना रोजगार दिलाच व त्यांना मोफत मार्गदर्शन करून भोपळा डांगर पिकाकडे वळवले आहे.या भोपळा पिकामुळे आमची प्रगती झाली अशी माहिती महिला शेतकरी जैबुन पठाण यांनी सांगितले.
अगोदर हरभरा पिक घेतले या शेतात चार पोते हरभरा झाला, पण तो सर्व शेतीच्या खर्चात गेला, काढणी करणे, यामध्ये खूप खर्च होत होता, ते सर्व शेतीतच जात होत.म्हणून आम्ही डांगर भोपळा पिकाकडेच वळलोत, आमच्या दोन पिढ्या डांगर भोपळा पिक घेतात, आमचे सासरे सासू पिक घेत होते पण सेंद्रिय पध्दतीने घेत नव्हते, तेव्हा या पिकात बदल करून शेतातील पाला पाचोळा कचऱ्यापासून सेंद्रिय पध्दतीने ओषध फवारणी केली व उत्पादनात वाढ झाली.व सेंद्रिय पध्दतीने पिक घेतल्याने आमच्या डांगर भोपळ्याला पर राज्यात मागणी आली आहे, असे मंदाकिनी गव्हाणे यांनी माहिती दिली.
त्यांच्या भोपळ्याला गुजरात,मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल,उत्तर भारतात मोठी मागणी आहे. सेंद्रिय पध्दतीने पिक पिकल्याने आपल्याला कोणतेच आजार होत नाहीत म्हणून सेंद्रिय पध्दतीने शेती केली. या शेतकरी महिलेने आपल्या मुलाचे शिक्षण पूणे येथे या भोपळ्याच्या आधावर पुर्ण केले व त्याला नोकरीला लावले आहे.यावेळी मंदाकिनी नानासाहेब गव्हाणे यांनी सांगितले की मला जरी शाळेत भोपळा मार्क मिळाले असले तरी याच भोपळयाला मनाशी लावून धरलं व चक्क माळारावरील शेतातील भोपळा परराज्यात पोहोचला. त्यांची ही जिद्द पाहून आता या भागातील इतर शेतकऱ्यांना सुद्धा प्रेरणा मिळाली आहे. ते सुद्धा डांगरी भोपळा पीकाकडे वळले आहेत.