रासायनिक खते आणि बियाण्यांच्या दरवाढीचा शेतकऱ्यांना फटका, कृषी सेवा केंद्र ओस पडली

| Updated on: May 19, 2021 | 5:53 PM

या वर्षी बी बियाणे खते यांच्या किमतीत दुप्पट झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. Fertilizers and Seed rates increased

रासायनिक खते आणि बियाण्यांच्या दरवाढीचा शेतकऱ्यांना फटका, कृषी सेवा केंद्र ओस पडली
प्रातिनिधीक फोटो
Follow us on

भंडारा: खरिप हंगाम जवळ आला असून ही भंडारा जिल्ह्यातील कृषी केंद्र ओस पडली आहेत. मे महिना लागताच शेतकरी कृषी केंद्रांवर बी बियाणे,खते खरेदी करण्यासाठी गर्दी करत असतात. मात्र, या वर्षी बी बियाणे खते यांच्या किमतीत दुप्पट झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांनी शेती करावी कशी असा प्रश्न निर्माण झाला आहे, एकीकडे पंतप्रधान किसान सन्मान योजने अंतर्गत 2 हजार रुपये देत आहेत. दुसरीकडे खतांच्या किमतीत वाढ करून वसूल करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. (Bhandara Agriculture Fertilizers and Seed rates increased create problem for farmers and fertilizer sellers )

मशागतीचा खर्च वाढला

अवकाळी पाऊस, गारा पडल्याने धानाचे होणारे नुकसान अशा अनेक समस्यांचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो. तरीसुद्धा शेतकरी न डगमगता शेती कसत आहे. शेतीची मशागत, पीक लागवड, बी-बियाणे, रोवणीपासून कापणीपर्यंत पैसा खर्च करावा लागतो. सध्या डिझेलचे दर वाढल्याने ट्रॅक्टरचे प्रति तासाचे मशागतीचे भाडेही वाढले आहे. त्यामुळे ट्रॅक्टरच्या दरातही वाढ झाली आहे.

कृषी सेवा केंद्र ओस पडली

आता पुन्हा शेतकऱ्यांपुढे नवीन संकट आलं आहे. खत , बी बियाणे यांचे यांच्या किमती दुप्पट झाल्याने शेतकऱ्यांपुढे शेती करावी कशी असा प्रश्न पडला आहे. खतांच्या किमती वाढल्याचा फटका शेतकऱ्यांसोबत कृषी केंद्र चालकांना सुद्धा बसला आहे. दर वर्षी मे महिना सुरु होताच कृषी केंद्रांवर बी बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी गर्दी होत होती मात्र आता संपूर्ण केंद्र रिकामे दिसत आहे, असं कृषी केंद्र चालक नरेंद्र ठवकर यांनी सांगतिले.

केंद्र सरकार 2 हजार रुपये पंतप्रधान किशन सन्मान योजने अंतर्गत देत असले तरी दुसरीकडे खतांच्या किमतीत वाढ करून वसूल करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. आधीच कोरोनाचे संकट असताना दुसरीकडे खतं बी बियाणे यांच्या वाढलेल्या किमती त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटाधत सापडल्याचे दिसून येते. शेतकरी शेती वाऱ्यावर सोडेल तर खाणार काय अशा प्रश्न शेतकऱ्यांपुढे पडला आहे, त्यामुळे शासनाने खातं बी बियाणे यांच्या किमती कमी कराव्या अशी मागणी शेतकरी नरेंद्र निमकर, पदमुमार गभणे यांनी केली आहे.

खत दरवाढीची चर्चा कशी सुरु झाली?

इफकोचं पत्र

 

खतांच्या किमतीवरुन शरद पवारांचं सदानंद गौडा यांना पत्र

इफकोच्या मार्केटिंग विभागाकडून 7 एप्रिलला एक पत्र जारी करण्यात आलं होतं. संबंधित पत्रामध्ये डीएपीच्या किंमती वाढवण्यात आल्याचं म्हटलं होतं. त्या पत्रातील किंमती 1 एप्रिलपासून डीएपी 1900 रुपयांना विकले जाईल, असं म्हटलं होते. संबंधित पत्रावर मार्केटिंग डायरेक्टर योगेंद्र कुमार यांची सही होती. या पत्रानुसार देशात खतांच्या किंमती 1 एप्रिलपासून लागू करण्यात येणार होत्या. शेतकऱ्यांनी विरोध केल्यानंतर निवडणुकीच्या काळात इफकोकडून जुना स्टॉक जुन्या किमतीला विकला जाईल, असं सांगितलं. देशातील खताची मागणी लक्षात घेता इफकोकडील जुना स्टॉक किती शेतकऱ्यांना पुरणार हा प्रश्न निर्माण झाला होता. खतांच्या किमतीवरुन राजकारण तापू लागलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रासायनिक खते आणि उर्वरक मंत्री सदानंद गौडा यांना पत्र लिहिलं आहे. तर दुसरीकडे चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय कृषी मंत्र्यांना पत्र लिहिलं आहे.

संबंधित बातम्या:

कोरोना संकटात ना शेतकरी थांबला ना कारखाने, यंदाच्या गाळप हंगामात ऊसाचं विक्रमी गाळप

कोरोनाच्या संकटात आदिवासी युवकांच्या प्रयत्नांना मोठं यश, गुळवेल पुरवठ्यासाठी मिळाली दीड कोटी रुपयांची ऑर्डर

(Bhandara Agriculture Fertilizers and Seed rates increased create problem for farmers and fertilizer sellers also )