टमाटर लाल नाही आता काळे लावा, असे होणार मालामाल, लाखोंची कमाई

| Updated on: May 12, 2023 | 6:12 PM

काळ्या टमाटरची लावणी हिवाळ्यात होते. जानेवारी महिना लागवडीसाठी चांगला असतो. लागवड केल्यानंतर तीन महिन्यांनी टमाटर लागतात.

टमाटर लाल नाही आता काळे लावा, असे होणार मालामाल, लाखोंची कमाई
Follow us on

नवी दिल्ली : काळ्या टमाटरची शेती सुरुवातीला इंग्लंडमध्ये सुरू झाली. येथे याला इंडिगो रोज टोमॅटो नावाने ओळखले जाते. युरोपच्या बाजारात लोकं याला सुपरफूड असेही म्हणतात. टमाटर खाणे प्रत्येकाची पसंती असते. टमाटरमुळे व्हिटॅमीन-सी, व्हिटॅमीन ए आणि व्हिटॅमीन केची मात्रा भरपूर असते. टमाटरचे सेवन केल्याने कित्तेक आजार बरे होतात. टमाटरचा वापर ब्युटी प्रोडक्समध्ये होतो. परंतु, लोकं सर्वात जास्त टमाटर सलादाच्या रुपात खातात. लोकांना वाटते की, टमाटर फक्त लाल रंगाचे असतात. पण, अस काही नाही. काळ्या रंगाचेही टमाटर असतात.याची शेती भारतातील काही राज्यात केली जाते. लाल टमाटरऐवजी काळ्या टमाटरची शेती केली जाते.

उशिरा लागतात काळे टमाटर

काळ्या टमाटरच्या शेतीसाठी उष्ण वायू जास्त चांगला समजला जातो. मातीचे पीएस ६ ते ७ असलं पाहिजे. भारतातील शेतकऱ्यांना काळ्या टमाटरची शेती करणे फायदेशीर राहणार आहे. कारण भारतात उष्ण वायू जास्त भागात आहे. काळ्या टमाटरची किंमत लाल टमाटरपेक्षा जास्त आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चांगली कमाई होऊ शकते. काळ्या टमाटरला उशिरा फळं लागतात. त्यासाठी शेतकऱ्यांना थोडा धीर धरावा लागतो.

हे सुद्धा वाचा

हिमाचल प्रदेशात सुरू झाली काळ्या टमाटरची शेती

काळ्या टमाटरची शेती सुरुवातीला इंग्लंडमध्ये सुरू झाली. येथे याला इंडिगो रोज टोमॅटो या नावाने ओळखले जाते. युरोपच्या बाजारात याला सुपरफूड असेही म्हणतात. आता भारतातही काळ्या टमाटरची लागवड सुरू झाली आहे. हिमाचल प्रदेशात काळ्या टमाटरची लागवड केली जाते. हिमाचल प्रदेशात विदेशातून बी मागवण्यात आले. यानंतर हळूहळू दुसऱ्या राज्यातही काळ्या टमाटरची लागवड केली जाते.

चार लाखांपर्यंत फायदा

काळ्या टमाटरची लावणी हिवाळ्यात होते. जानेवारी महिना लागवडीसाठी चांगला असतो. लागवड केल्यानंतर तीन महिन्यांनी टमाटर लागतात. याचा अर्थ एप्रिल महिन्यात काळ्या टमाटरची तोडणी करता येते. एका हेक्टरमध्ये काळ्या टमाटरची लागवड केल्यास चार लाख रुपयांपर्यंत कमाई होऊ शकते. काळ्या टमाटरचा भाव लाल टमाटरपेक्षा जास्त असतो. भारतात आता काळ्या टमाटरचा भाव १०० ते १५० रुपये किलो आहे.