AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जी लोकं १७ दारं फिरले त्यांनी आम्हाला नैतिकता शिकवू नये, अंबादास दानवे यांचा रोख कुणावर?

शिवसेना सत्तेसाठी नाही तर सत्ता शिवसेनेसाठी आहे. सत्ता निश्चितपणे शिवसेनेकडे येईल, असा आशावाद अंबादास दानवे यांनी व्यक्त केला.

जी लोकं १७ दारं फिरले त्यांनी आम्हाला नैतिकता शिकवू नये, अंबादास दानवे यांचा रोख कुणावर?
| Updated on: May 12, 2023 | 4:44 PM
Share

कुणाल जायकर, प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी सत्ताधाऱ्यांवर केली टीका केली. नैतिकतेच्या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस यांच्यासह सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. एवढे मोठे मुख्यमंत्री पदावर लाथ मारली, ही उद्धव ठाकरे यांची नैतिकता नाही का? गद्दारी करून- करून लोकं गेले. वर्षावर कित्तेक लोकं बसले होते. मनाने तिकडे आणि शरीराने इकडे असाल, तर मला काय करायचं आहे. तुम्ही जा, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट सांगितले होते. आपल्या रक्तमासाची लोक आपल्याला सोडून गेले. त्या हेतुने नैतिकेतून त्यांनी राजीनामा दिला. उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला याचा कोणताही पश्चाताप होत नाही, असं अंबादास दानवे यांनी स्पष्ट केले.

पहाटेचा शपथविधी ही कुठली नैतिकता?

शिवसेना सत्तेसाठी नाही तर सत्ता शिवसेनेसाठी आहे. सत्ता निश्चितपणे शिवसेनेकडे येईल, असा आशावाद अंबादास दानवे यांनी व्यक्त केला. अंबादास दानवे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली. देवेंद्र फडणवीस यांनी रात्री तीन वाजता राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केली. त्यांनी आम्हाला नैतिकता शिकवण्याची गरज नाही. पहाटे तीन-चार वाजता घेतलेला शपथविधी ही कोणती नैतिकता होती, याचे उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी द्यावे, असंही अंबादास दानवे यांनी म्हंटलं.

भाजपने आम्हाला नैतिकता शिकवण्याची गरज नाही

राजभवनात शपथ घेतली ती कोणती नैतिकता होती. मेहबूबा मुक्तीसोबत तुम्ही गेलात, ही कोणती नैतिकता आहे. संघमुक्त भारत म्हणणाऱ्या नीतीश कुमार यांच्याबरोबर तु्म्ही सरकार स्थापन केलात, ही कोणती नैतिकता आहे. त्यामुळे भाजपने आम्हाला नैतिकता शिकवण्याची गरज नाही, असा टोला अंबादास दानवे यांनी लगावला. जे पहाटे तीन-चार वाजता शपथविधी घेतात त्यांना आम्हाला नैतिकतेच्या गोष्टी सांगण्याची गरज नाही, असं अंबादास दानवे यांनी सुनावलं.

नितेश राणे हा चिल्लर माणूस

नितेश राणे हा चिल्लर माणूस आहे. त्यांचे वडील कुठे कुठे जाऊन आले. शिवसेना, काँग्रेस, स्वाभीमान पक्ष स्थापन केला. आता भाजपात गेले. त्यांनी 17 दार केले. ते भारतीय जनता पार्टीच्या तुकड्यावर पाळले जातात, त्यांनी आम्हाला शिकवू नये, असा खरपूस समाचार अंबादास दानवे यांनी घेतला.

सर्वोच्च न्यायालयाचा १४५ पानांचा अहवाल. निकालाचं वाचन श्रीकांत शिंदे यांनी केलं पाहिजे. तसेच त्यांच्या गद्दार सहकाऱ्यांनी केले पाहिजे. सुस्पष्टपणे सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. येणाऱ्या काळात सर्वोच्च न्यायालयाच्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्याचे परिणाम दिसतील.

ठाकरे यांच्यावर टीका करणे ही नमक हरामी

संजय शिरसाट हे माता बहिणींवर टीका करतात. ठाकरे साहेब यावेत म्हणून चार-चार वेळा त्यांचे दारं झिजवत होते. ठाकरे साहेबांनी आपल्या मतदारसंघात यावे, म्हणून दहा-दहा वेळा जात होते. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणे ही नमक हरामी आहे. त्यामुळे यांच्या टीकेला काय उत्तर द्यायचं.

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागला आहे. राज्यपालांनी चुकीचे केले हे स्पष्टपणे सांगितले. जनाची नाही, तर मनाची लाज वाटली पाहिजे. आतापर्यंत निकाल ऐकून राजीनामा फेकून द्यायला पाहिजे होता, असा टोला अंबादास दानवे यांनी लगावला.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.