‎SMAM Kisan Yojana : शेती उपकरणे खरेदी करताय? मग ‘या’ योजनेचा लाभ घ्याच..!

| Updated on: Apr 08, 2022 | 5:35 AM

देशाच्या जेडीपी मध्ये कृषी क्षेत्राचा वाटा हा 18 टक्के असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे शेती व्यवसयाला वेगळे महत्व आहे. शिवाय शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा निर्धार सरकारने केलेला आहेच. त्यामुळे शेतकऱ्यांना आवश्यक त्या सुविधा ह्या पुरवल्या जात आहेत. केंद्राबरोबर राज्य सरकारच्या माध्यमातून एक ना अनेक योजना राबवल्या जात आहेत. केवळ उत्पन्नच वाढावे असे नाही तर थेट आर्थिक लाभ खात्यामध्ये जमा अशा पीएम किसान सन्मान सारख्या योजनाही सरकार राबवत आहे.

‎SMAM Kisan Yojana : शेती उपकरणे खरेदी करताय? मग या योजनेचा लाभ घ्याच..!
शेती औजारे घेण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून 'स्माम' ही योजान राबवली जात आहे.
Follow us on

मुंबई : (India) देशाच्या जेडीपी मध्ये कृषी क्षेत्राचा वाटा हा 18 टक्के असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे शेती व्यवसयाला वेगळे महत्व आहे. शिवाय शेतकऱ्यांचे (Farmer Production) उत्पन्न दुप्पट करण्याचा निर्धार सरकारने केलेला आहेच. त्यामुळे शेतकऱ्यांना आवश्यक त्या सुविधा ह्या पुरवल्या जात आहेत. केंद्राबरोबर राज्य सरकारच्या माध्यमातून एक ना अनेक योजना राबवल्या जात आहेत. केवळ उत्पन्नच वाढावे असे नाही तर थेट आर्थिक लाभ खात्यामध्ये जमा अशा पीएम किसान सन्मान सारख्या योजनाही सरकार राबवत आहे. यापैकीच एक महत्वाची मानली जाणारी योजना म्हणजे (Smam Scheme) ‘स्माम’ या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेती उपकरणे घेण्यास अनुदान दिले जात आहे. याबाबत अधिक जनजागृती झाली नसल्याने शेतकरी हे अनभिज्ञ आहेत. मात्र, योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 50 ते 80 टक्के पर्यंतचे अनुदान हे दिले जात आहे. यासाठी योजनेची सर्वकश माहिती असणे गरजेची आहे.

स्माम योजनेचा लाभ नेमका कुणासाठी?

या योजनेचे साधे सरळ सूत्र आहे. जो शेतकरी त्याला योजनेचा लाभ असल्यामुळे देशभरातील कोणताही शेतकरी योजनेचा लाभ घेऊ शकणार आहे. एवढेच नाही महिला शेतकरी देखील योजनेचा लाभ घेऊ शकतात. यासाठी केवळ सातबारा नावावर असणे गरजेचे आहे. यामुळे शेतामध्ये जे उपकरणे वापरतो ती उपकरणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना 50 ते 80 टक्केपर्यंतचे अनुदान मिळणार आहे. शेती व्यवसयात विकते उपकरणे घेऊन उत्पादन वाढविणे शेतकऱ्यांना शक्य नसल्याने केंद्राने ही योजना राबवली आहे. शिवाय शेती व्यवसयात आधुनिक यंत्राचा वापर केल्याने शेतकऱ्यांचे काम सुखकर शिवाय उत्पादनात वाढ असा दुहेरी उद्देश साधला जाणार आहे.

लाभ घेण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता

शेती संबंधिच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी काही निवडक कागदपत्रे ही ठरलेलीच आहेत. यामध्ये सातबारा, आधार कार्ड, राहण्याचे प्रमाणपत्र, 8 ‘अ’, बॅंक पासबूक, मोबाईल नंबर, जातीचा दाखला आणि पासपोर्ट साईजचा फोटो अशी कागदपत्रे आवश्यक आहेत.

असा घ्या योजनेचा लाभ

*स्माम या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना सर्वप्रथम https://agrimachinery.nic.in/ या संकेतस्थळावर लॉगिन करावे लागणार आहे

*याठिकाणी Registration असा पर्याय समोर येईल. तेव्हा त्यामध्ये शेतकरी (Farmer) हा पर्याय निवडावा लागणार आहे. यावर क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज समोर येईल.

*या पेजवर नोंदणी करावी लागणार आहे.

*यामध्ये तुमते नाव, आधार कार्ड क्रमांक टाकावा लागणार आहे.

*त्यानंतर अर्जातील संपूर्ण माहिती भरावी लागणार आहे.

*अखेर Submit यावर क्लिक केल्यावर तुमची नोंदणी प्रक्रिया ही यशस्वीरित्या पूर्ण होईल.

संबंधित बातम्या :

Jalna : उन्हाळी सोयाबीन जोमात तरीही शेतकरी कोमात, काय घडले असे जालन्यात?

PM Kisan Yojna : 11 वा हप्ता वेळेत होणार जमा, योजनेच्या लाभासाठी नवीन अर्ज नोंदणी सुरु

Latur Market: हमीभावाप्रमाणेच बाजारपेठेत तुरीचे दर, सरकारच्या निर्णयाचा परिणाम काय ? सोयाबीनचं मात्र शेतकऱ्यांनी मनावर घेतलं