लहाणपणी आंब्याचं लोणचं आवडायचं, ‘या’ शेतकऱ्यानं तब्बल आंब्याच्या 150 दुर्मिळ प्रजातींचं केलं संवर्धन

| Updated on: Apr 01, 2021 | 2:02 PM

हेगडे यांनी त्यांची आवड जोपासण्यासोबतच घराच्या परिसरात जवळपास 150 प्रकारच्या देशी आंब्यांच्या प्रजातींची बाग तयार केली आहे. BV Subba Rao Hegade

लहाणपणी आंब्याचं लोणचं आवडायचं, या शेतकऱ्यानं तब्बल आंब्याच्या 150 दुर्मिळ प्रजातींचं केलं संवर्धन
आंबा
Follow us on

बंगळुरु: फळांचा राजा म्हणून आंब्याला ओळखलं जातं. आंबा आणि त्यापासून बनवले जाणारे विविध पदार्थ अनेकांना आवडतात. कर्नाटकातील बीवी सुब्बा राव हेगडे यांना लहाणपणी आंब्याचं लोणचं खूप आवडायचं. हेगडे यांनी त्यांची आवड जोपासण्यासोबतच घराच्या परिसरात जवळपास 150 प्रकारच्या देशी आंब्यांच्या प्रजातींची बाग तयार केली आहे.( BV Subba Rao Hegade 84 years Karnataka man preserve 150 rare mango varieties )

16 वर्षांपासून पश्चिम घाटातील आंब्यांच्या प्रजातींचा अभ्यास

कर्नाटकातील शिमोगा जिल्ह्यातील सागर येथील रहिवासी बीवी सुब्बा राव हेगडे यांनी पश्चिम घाटामध्ये येणाऱ्या आंब्याच्या प्रजातींचं संवर्धन करण्यासाठी प्रयत्न केले. हेगडे यांनी पश्चिम घाटातील आंब्यांचा अभ्यास करण्यासाठी विविध भागात दौरे केले. गेल्या 16 वर्षांपासून पश्चिम घाटातील विविध गावांना भेटी देतात. आंब्याच्या ज्या प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत त्यांचं संवर्धन करण्याचं काम त्यांनी सुरु केलं आहे.

बीवी सुब्बा राव हेगडे यांनी एनएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना लहानपणापासून आंब्याच्या लोणच्याची आवड असल्याचं सांगितलं. त्यावेळी आमच्या घराजवळ आंब्याचं एकच झाड होतं. वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर घराजवळ देशी आंब्याच्या झाड लावण्याचं ठरवलं आणि त्यामध्ये पत्नीचं सहकार्य मिळालं, असं ते सांगतात.

आंब्याच्या प्रजाती कशा शोधल्या

बीवी सुब्बा राव हेगडे यांनी देशी आंब्याच्या विविध प्रजाती शोधण्यासाठी पश्चिम घाटातील विविध गांवांमध्ये दौरे सुरु केले. सुरुवातीला त्यांना 120 प्रकारच्या आंब्यांची माहिती मिळाली. नोव्हेंबर ते मार्च या काळामध्ये त्यांनी विविध गावांना भेटी दिल्या.ते विविध प्रकारचे आंबे घरी आणत आणि त्याची चव देखील तपासून घेत.

पुरस्कारांनं सन्मानित

बीवी सुब्बा राव हेगडे यांनी आतापर्यंत जमवलेल्या 150 प्रकारच्या आंब्यापैकी 15 प्रकारचे आंबे दीर्घकाळ ठेवू शकतो, असं सांगितले. त्यांनी एकाच झाडावर पाच प्रकारच्या आंब्यांचं कलम केलं आहे. काही रोपं त्यांनी शाळांना देखील दिली आहे. घराजवळ हेगडे यांनी छोटीशी बाग तयार केली आहे. नॅशनल हॉर्टिकल्चर फेअर 2021 मध्ये हेगडे यांना इनोव्हेटीव फार्मिंग साठी सन्मानित करण्यात आलं आहे.

संबंधित बातम्या:

सह्याद्रीतील वनस्पतीला राजकारणातील ‘सह्यगिरी’चं नामकरण, कोल्हापूरच्या संशोधकांकडून वेलीला शरद पवारांचं नाव

लॉकडाऊनची भीती, शेतकऱ्यानं आंबा विक्रीसाठी लढवली शक्कल, 2 दिवसात मिळालं यश

 

( BV Subba Rao Hegade 84 years Karnataka man preserve 150 rare mango varieties )