West Vidarbha : नुकसानीचा पाऊस, 18 हजार हेक्टरावरील पिके पाण्यात, 24 जणांचा मृत्यू, जनावरेही दगावली

| Updated on: Jul 12, 2022 | 10:10 AM

राज्यातून गायब असलेल्या पावसाने 1 जुलैपासून तर थैमानच घातले आहे. धुवाधार झालेल्या पावसाने अनेक घराची परझड झाली आहे. शेतिदेखील खरडून गेल्या आहेत. तर विभागीय आयुक्तांच्या अहवालानुसार पश्चिम विदर्भात 1 जून ते 8 जुलै दरम्यान 18 हजार हेक्टर वरील पिकांचं नुकसान झालं आहे. याशिवाय 24 नागरिकांचा विजपडून मृत्यू झाला आहे.

West Vidarbha : नुकसानीचा पाऊस, 18 हजार हेक्टरावरील पिके पाण्यात, 24 जणांचा मृत्यू, जनावरेही दगावली
पश्चिम विदर्भात अति मुसळधार पावसामुळे मनुष्यहानी देखील झाली आहे.
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

अमरावती : राज्यात सर्वत्र (Monsoon) मान्सून सक्रीय झाला असला तरी त्याचे प्रमाण हे कमी-अधिक असेच आहे. गेल्या 3 दिवसांपासून (West Vidarbha) पश्चिम विदर्भात मुसळधार पाऊस झाला असून (Crop Damage) पिकांचे तर नुकसान झालेच आहे शिवाय या विभागीत मनुष्यहानीही झाली आहे. 1 जून ते 8 जुलै दरम्यान पावसामुळे झालेले नुकसानीचा अहवाल हा धक्कादायक आहे. या दरम्यानच्या काळात पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यामध्ये 35 नागरिकांचा वीज अंगावर पडून मृत्यू झाला आहे. तर 18 हजार हेक्टरावरील पिके ही पाण्यात असून या हंगामात आतापर्यंत 35 जनावरे ही वेगवेगळ्या कारणाने दगावलेली आहेत. त्यामुळे गरजेचा असलेला पाऊस आता नुकसानीचा ठरत आहे.

काय आहे पश्चिम विदर्भातील स्थिती?

राज्यातून गायब असलेल्या पावसाने 1 जुलैपासून तर थैमानच घातले आहे. धुवाधार झालेल्या पावसाने अनेक घराची परझड झाली आहे. शेतिदेखील खरडून गेल्या आहेत. तर विभागीय आयुक्तांच्या अहवालानुसार पश्चिम विदर्भात 1 जून ते 8 जुलै दरम्यान 18 हजार हेक्टर वरील पिकांचं नुकसान झालं आहे. याशिवाय 24 नागरिकांचा विजपडून मृत्यू झाला आहे. 35 जनावरे देखील मृत झालीत. पावसामुळे जवळपास 30 घराचे मोठे नुकसान झाले आहे. नदीला पूर आल्याने बुलढाणा जिल्ह्यातील एकजण पुरात वाहून गेला आहे. त्यामुळे सध्या सुरु असलेला पाऊस हा नुकसानीचा ठरत आहे.

पश्चिम विदर्भाला रेड अलर्ट

गेल्या 3 दिवसांपासून पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यामध्ये पावसाने हाहाकार घातला आहे. नदी, नाले, ओढे तर ओसंडून वाहत आहेतच पण खरिपातील पिकेही पाण्यात आहेत. त्यामुळे खरिपाचे भवितव्य काय असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे. पुढील दोन दिवस पावसामध्ये सातत्य तर राहणार आहेच पण या विभागाला रेड अलर्टही देण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

धराणाच्या पाणीपातळीतही वाढ

गेल्या काही दिवसांपासून पावसामध्ये सातत्य असल्याने आता पाणीपातळीत वाढ झाली आहे. लहान-मोठे नदी, नाले आणि तलाव हे तर तूडुंब भरले असले तरी अप्पर वर्धा धरणाची पाणी पातळी मंद गतीने वाढती आहे. पावसामुळे पश्चिम विदर्भातील 111 गावे ही प्रभावित झाली आहेत. 1 जून पासून 8 जुलैपर्यंत 24 नागरिकांचा अंगावर वीज पडल्याने मृत्यू झाला असल्याची प्रशासन दरबारी नोंद आहे.