PM Kisan Yojna : अपात्र असूनही योजनेचा लाभ, आता Website च्या माध्यमातून करा परतावा..!

| Updated on: Mar 22, 2022 | 2:52 PM

शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून एक ना अनेक प्रयत्न सुरु आहेत. कधी शेती व्यवसयात उपयोगी पडतील अशा योजना तर कधी थेट आर्थिक लाभ मिळावा अशा योजना राबवल्या जात आहेत. त्यापैकीच पीएम किसान सन्मान निधी योजना ही एक योजना आहे. गेल्या 6 वर्षामध्ये या योजनेच्या माध्यमातून कोट्यावधी शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळालेला आहे. असे असतानाही योजनेचा गैरफायदाही अनेकांनी घेतल्याचे समोर आले आहे.

PM Kisan Yojna : अपात्र असूनही योजनेचा लाभ, आता Website च्या माध्यमातून करा परतावा..!
संग्रहीत छायाचित्र
Follow us on

मुंबई : शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी (Central Government) केंद्र सरकारच्या माध्यमातून एक ना अनेक प्रयत्न सुरु आहेत. कधी शेती व्यवसयात उपयोगी पडतील अशा योजना तर कधी थेट आर्थिक लाभ मिळावा अशा योजना राबवल्या जात आहेत. त्यापैकीच (PM Kisan Yojna) पीएम किसान सन्मान निधी योजना ही एक योजना आहे. गेल्या 6 वर्षामध्ये या योजनेच्या माध्यमातून कोट्यावधी शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळालेला आहे. असे असतानाही योजनेचा (Disadvantage) गैरफायदाही अनेकांनी घेतल्याचे समोर आले आहे. ही योजना केवळ अल्प किंवा अत्यंल्प भूधारक शेतकऱ्यांना आहे. असे असताना जे आयकर अदा करतात किंवा शासकीय नौकरदार आहेत त्यांनीही योजनेचा लाभ घेतला आहे. मात्र, त्यांच्यासाठी हे महागात पडणार आहे. अशा अपात्र लाभार्थ्यांचा शोध तर प्रशासकीय पातळीवर सुरुच आहे पण ज्यांनी चुकीच्या पध्दतीने योजनेचा पैसा लाटलेला आहे. त्यांना पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरुनही परतावा करता येणार आहे. त्यामुळे तुमचे नावही गुपित राहिल आणि सरकारचा उद्देशही साध्य होणार आहे.

अशी आहे पैसे परत करण्याची प्रक्रिया

पीएम किसान योजनेच्या माध्यमातून अनेक गरजू शेतकऱ्यांना योजनेचा लाभ झाला आहे पण दुसरीकडे फसवणुकीच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. पात्र नसतानाही लाखो जणांनी योजनेचा लाभ घेतला आहे. सध्या अशा अपात्र नागरिकांकडून वसुली सुरु असून वेबसाईटच्या माध्यमातूनही पैसे परत करण्याची सोय आहे. याकरिता प्रथम पीएम किसान योजनेच्या pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जावे लागणार आहे. येथील होमपेजवरच Former Corner च्या एकदम खाली तुम्हाला Refund Online हा पर्याय दिसेल. या ठिकाणी आधारकार्ड, मोबाईल क्रमांक आणि खाते क्रमांक याची माहिती भरुन योजनेतील पैसे परत करता येणार आहेत.

वर्षभरात 6 हजार रुपये खात्यावर

पीएम किसान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्षभरात 6 हजार रुपये हे जमा केले जातात. तीन टप्प्यामध्ये हे पैसे जमा होतात. म्हणजेच चार महिन्याच्या कालावधीतून एकदा ही रक्कम जमा केली जाते. आतापर्यंत सरकारने शेतकऱ्यांना पीएम किसानचे 10 हप्ते पाठवले आहेत. पुढील ११ व्या हप्त्याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत. 11 व्या हप्त्याची तारीख अजून जाहीर झाली नसली तरी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर केले जाऊ शकतात.

फसवणूक केल्यास काय ?

पीएम किसान योजनेच्या माध्यमातून अनेकांनी सरकारची फसवणूक केली आहे. आता 6 वर्षानंतर ही प्रकरणे समोर येत आहेत. केवळ अल्पभुधारक तसेच अत्यल्प भूधारकाला योजनेचा लाभ मिळावा हा उद्देश होता.मात्र, फसवणूक करुन योजनेचा लाभ घेतल्याचे निदर्शनास येताच केवळ एक हप्ता नाही तर सर्वच्या सर्व हप्त्यांची रक्कम ही वसूल केली जात आहे. शिवाय महसूल विभागाच्या माध्यमातून अपात्र नागरिकांची नावे समोर येत आहेत.

संबंधित बातम्या :

Turmeric Crop : अतिवृष्टीच्या नुकसानीच्या खुणा, पीक बहरात पण उत्पादन नाही पदरात

Banana आता फळपिक, ‘मनरेगा’ मधूनही करता येणार लागवड, शेतकऱ्यांना नेमका फायदा काय?

Mango Export : अडचणींवर मात करीत फळांचा ‘राजा’ परदेशात, हंगामात प्रथमच ‘लेट पण थेट’ England ध्येच निर्यात