Turmeric Crop : अतिवृष्टीच्या नुकसानीच्या खुणा, पीक बहरात पण उत्पादन नाही पदरात

फळपिकांपासून ते पालेभाज्या आणि हंगामी अशा सर्वच पिकांवर अतिवृष्टीचा परिणाम झालेला आहे. काळाच्या ओघात आणि पीक काढणी सुरु असतानाच नुकसान काय असते याचा प्रत्यय येत आहे. बहरात दिसत असलेल्या हळदीच्या उत्पादनात मात्र कमालीची घट होत आहे. अतिवृष्टी दरम्यान हळद पिकामध्ये पाणी साचून राहिले होते. त्यामुळे थेट हळदीच्या घडावरच परिणाम झाला होता.

Turmeric Crop : अतिवृष्टीच्या नुकसानीच्या खुणा, पीक बहरात पण उत्पादन नाही पदरात
हळद काढणीला प्रारंभ झाला आहे.Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 22, 2022 | 1:43 PM

वाशिम : फळपिकांपासून ते पालेभाज्या आणि हंगामी अशा सर्वच पिकांवर (Heavy Rain) अतिवृष्टीचा परिणाम झालेला आहे. काळाच्या ओघात आणि पीक काढणी सुरु असतानाच नुकसान काय असते याचा प्रत्यय येत आहे. बहरात दिसत असलेल्या (Turmeric Production) हळदीच्या उत्पादनात मात्र कमालीची घट होत आहे. अतिवृष्टी दरम्यान हळद पिकामध्ये पाणी साचून राहिले होते. त्यामुळे थेट हळदीच्या घडावरच परिणाम झाला होता. पावसामुळे हळद हिरवीगार असली तरी जमिनीत असलेल्या घड कुजले तर आता काढणीच्या दरम्यान जेवढे बियाणे गाढले तेवढे तरी पदरी पडते की नाही अशी अवस्था (Washim District जिल्ह्यातील उमरा परिसरात पाहवयास मिळत आहे. नगदी पीक म्हणून वाशिम जिल्ह्यात हळदीचे क्षेत्र वाढत आहे. पण यंदा उत्पादनावर झालेला खर्च तरी मिळतो की नाही अशी स्थिती आहे.

लागवड घडाची अन् उत्पादन दोन शेंगाचे

हळद लागवड करताना शेती मशागत, विकतचे बियाणे, मजुरीचा खर्च हे सर्व करुनही आता उत्पादनात कमालीची घट झाली आहे. लागवडसाठी बियाणे म्हणून बंडाचा गोळा आणि आता काढणी दरम्यान एक किंवा दोन शेंगा निघत आहेत. मध्यंतरी अतिवृष्टीच्या दरम्यान हळदीच्या क्षेत्रात अधिक काळ पाणी साचून राहिले. त्याचा निचराच योग्य पध्दतीने झाला नाही. त्यामुळे घडकूज आणि न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. वर्षभर लागवड, मशागत, बियाणे आणि आता काढणीचा खर्च तरी मिळतो का नाही अशी अवस्था आहे.

उमरगा परिसरात काढणीची लगबग

हळद तसे सांगली आणि हिंगोली जिल्ह्यामध्येच अधिक प्रमाणात घेतले जाणारे पीक आहे. मात्र, वाशिम जिल्ह्यातील बगायती भागात हळद लागवडीला प्राधान्य दिले जाते. शिवाय नगदी पीक म्हणूनही याकडे पाहिले जात असून वर्षागणीस हळदीच्या क्षेत्रात वाढ होत आहे. खरिपात लागवड केलेल्या हळदीची सध्या काढणी सुरु आहे. जिल्ह्यातील उमरी परिसरात हळदीची अधिकचा लागवड आहे. मात्र, त्या तुलनेत उत्पादन नाही. निसर्गाच्या लहरीपणाचा परिणाम शेतकरी आता 5 महिन्यानंतर पाहत आहेत.

काढणी दरम्यान सर्वकाही समोर

आतापर्यंत उत्पादनात घट होणार इथपर्यंतच विषय होता. पण प्रत्यक्षात हळद काढणीला सुरवात झाल्यानंतर नेमका अतिवृष्टीचा परिणाम काय हे शेतकऱ्यांच्या लक्षात येऊ लागले आहे. वाढीव उत्पादन तर सोडाच पण बियाणे म्हणून जेवढे वापरले आहे त्याचा खर्च निघावा हीच अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहे.

संबंधित बातम्या :

Banana आता फळपिक, ‘मनरेगा’ मधूनही करता येणार लागवड, शेतकऱ्यांना नेमका फायदा काय?

Cloudy Weather: ऊन, पावसाच्या खेळात शेती व्यवसायच धोक्यात, यंदा आंबा बेभावात

Mango Export : अडचणींवर मात करीत फळांचा ‘राजा’ परदेशात, हंगामात प्रथमच ‘लेट पण थेट’ England ध्येच निर्यात

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.