वसंत ऋतूत पिवळा पळस बहरला, झाडं सर्वांचं लक्ष वेधून घेतायेत, बहुआयामी उपयोग तुम्हाला माहित आहे का ?

| Updated on: Feb 26, 2023 | 10:03 AM

रंगाची उधळण करणारा होळी सण जवळ आली की, हमखास आठवण होते. ती पळसाच्या फुलांची, भर उन्हात सगळी सृष्टी ओसाड पडू लागली असताना रानावनात बहरणारी लाल केशरी पळसफुले वसुंधरेच सौंदर्य खुलवतात.

वसंत ऋतूत पिवळा पळस बहरला, झाडं सर्वांचं लक्ष वेधून घेतायेत, बहुआयामी उपयोग तुम्हाला माहित आहे का ?
लाल केशरी पळसफुले जंगलात सर्वसाधारणपणे सर्वत्र आढळतात
Image Credit source: tv9marathi
Follow us on

वाशिम : वसंत ऋतु (Spring season) लागताच जंगलामध्ये पळस फुले बहरतात आणि लाल केशरी रंगाने संपूर्ण वसुंधरा बहरून जाते. मात्र वाशिम (washim) जिल्ह्यातील वनोजा परिसरात दुर्मिळ असलेला पिवळा पळस बहरलेला आहे. हा पिवळा पळस अत्यंत दुर्मिळ असून, औषधीसाठीही या पिवळ्या पळस फुलांचा (palm tree) वापर होत असल्याने या पळसाला विशेष महत्व आहे. वसंत ऋतूत फुललेले हे पळसाचे झाड सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

लाल केशरी पळसफुले जंगलात सर्वसाधारणपणे सर्वत्र आढळतात

रंगाची उधळण करणारा होळी सण जवळ आली की, हमखास आठवण होते. ती पळसाच्या फुलांची, भर उन्हात सगळी सृष्टी ओसाड पडू लागली असताना रानावनात बहरणारी लाल केशरी पळसफुले वसुंधरेच सौंदर्य खुलवतात. लाल केशरी पळसफुले जंगलात सर्वसाधारणपणे सर्वत्र आढळतात, मात्र पिवळा पळस हा अत्यंत दुर्मीळ समजला जातो. औषधीसाठीही या फुलांचा बहुआयामी उपयोग आहे असे तज्ज्ञ सांगतात.

गुप्तधन शोधण्यासाठी या फुलांचा उपयोग केला…

पिवळ्या पळसाबद्दल काही अंधश्रद्धादेखील प्रचलित आहेत. गुप्तधन शोधण्यासाठी या फुलांचा उपयोग केला जातो. त्यामुळे जादूटोणा करणारे तांत्रिक-मांत्रिक नेहमीच या झाडाच्या शोधार्थ असतात. पळस फुलांना ‘फ्लेम ऑफ फॉरेस्ट’ अर्थात जंगलातील ज्वाला अशी इंग्रजांनी उपमा ‌दिली आहे.

हे सुद्धा वाचा

फुललेला पळस सर्वांनाच आवडतो

पळसाला जसा आकार नाही, तसाच त्याच्या आकर्षक फुलांना गंधही नाही. परंतु फुललेला पळस सर्वांनाच आवडतो. कारण पळस फुलला की, संपूर्ण जंगल लाल रंगांनी न्हाऊन निघते. अशा बहुगुणी आणि त्याच्याकडे लक्ष जाताच पाहणाऱ्याच्या डोळ्यांना भुरळ घालणारा असाच, पिवळा पळस सध्या वाशीम जिल्ह्यातील आदर्श ग्राम वनोजा परिसरात समृद्धी महामार्गालगत बहरला असून, लक्ष येणाऱ्या जाणाऱ्यांचे वेधून घेत आहे.