AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अख्खे जग नशामुक्तीच्या वाटेवर, पण भारतात मद्यसेवनाचे प्रमाण वाढतंय… काय कारण ?

पेर्नोड रिकार्ड इंडियाचे सीईओ जीन टूबोल यांच्या मते वाढते उत्पन्न आणि बदलत्या जीवनशैलीमुळे भारतात दारू पिण्याच्या प्रमाणात बदल होत आहेत.आता सामान्य दारुच्या ऐवजी आता प्रीमीयम ब्रँडकडे ग्राहकाचे लक्ष चालले आहे.

अख्खे जग नशामुक्तीच्या वाटेवर, पण भारतात मद्यसेवनाचे प्रमाण वाढतंय... काय कारण ?
The booming market for expensive liquor
| Updated on: Dec 06, 2025 | 10:20 PM
Share

भारतात बदलत्या जीवनशैलीचा परिणाम म्हणून आता मद्य संस्कृतीचा शिरकाव झाला आहे. कधीकाळी कुजबूजत होणारी दारुची चर्चा आणि ड्रॉईंगरुम आणि सोशल गॅदरिंग महत्वाचा भाग झाली आहे. अलिकडे आलेल्या एका रिपोर्ट आणि उद्योग जगतातील दिग्गजांच्या वक्तव्यानुसार भारतीय समाजात दारु पिण्यासंबंधीचे पारंपरिक विचार आता बदलत चालले आहेत. हा बदल केवळ सामाजिक नव्हे तर आर्थिक जगतात होत आहे. अखेर या बदलाचे कारण काय ? चला पाहूयात…

ET च्या एका बातमीनुसार फ्रान्सची मद्य निर्मिती कंपनी ‘पर्नोड रिकार्ड इंडिया’ चे सीईओ जीन टूबॉल यांच्या मते भारतीय लोकांची क्रयशक्ती वाढली आहे. तसेच त्यांची पसंद देखील ‘प्रीमीयम’ बदल झाला आहे. आता युवक सामान्य दारुच्या ऐवजी महागडी आणि प्रीमीयम ब्रँडला महत्व देत आहेत.

महागड्या मद्याचा चढता बाजार

इकॉनॉमिक्स टाईम्सच्या बातमीनुसार पर्नोड रिकार्ड इंडिया सारख्या दिग्गज कंपन्यांसाठी भारत आता केवळ बाजार नाही एक ग्रोथ इंजिन बनला आहे. आकडे सांगतात की गेल्या आर्थिक वर्षात कंपनीच्या जागतिक विक्रीत भारताचे योगदान १३ टक्के राहिले आहे. हा आकडा यासाठी महत्वाचा आहे की भारताने या बाबतीत चीनलाही मागे टाकले आहे. आता अमेरिकेनंतर दुसऱ्या क्रमांकावर भारत आला आहे.

जीन टूबॉल यांच्या मते दरवर्षी भारतात सुमारे २ कोटी तरुण (Legal Age) अशा वयात येत आहेत की त्यामुळे कायद्यानुसार दारु पिऊ शकतात.हा एक मोठा ग्राहक आहे.जो थेट बाजारपेठेत पाऊल ठेवत आहे. मॅक्रोईकॉनॉमिक ट्रेंड्स इशार करत आहेत की आता तो दिवस दूर नाही की दारुच्या विक्रीत आणि बाजारपेठेच्या बाबतीत भारत अमेरिकेला मागे टाकेल. याचे कारण कंपन्या आता लोअर कॅटेगरी म्हणजे स्वस्त दारु निर्मिती सोडून संपूर्ण फोकस प्रीमीयम आणि सुपर प्रीमीयम ब्रँडच्या मद्यामागे लागली आहे. कारण भारतीय आता क्वालीटीसाठी खिसा मोकळा करायला तयार आहेत.

जगाच्या वेगळा आहे भारताचा ‘ट्रेंड’

एकीकडे जागतिक पातळीवर तरुण आरोग्याच्या प्रती जागरुक होत आहेत आणि मद्यापासून दूर जात आहेत. तर भारतात उलटी गंगा वहात आहे. अन्य एका बातमीनुसार साल २०२४ ते २०२९ दरम्यान भारतात मद्याची विक्री ३५७ दशलक्ष लिटर इतकी प्रचंड वाढण्याचा अंदाज आहे. हा विरोधाभास मजेशीर आहे. एकीकडे जग नशामुक्त होण्याच्या मार्गावर असताना भारत जगातील वेगाने वाढणारा अल्कोहोल मार्केट बनण्याच्या मार्गावर आहे.

ब्लूमबर्गच्या आकड्यानुसार २०२० मध्ये भारतात प्रति व्यक्ती मद्याची विक्री ३.१ लिटर होती. ती २०२३ मध्ये वाढून ३.२ लिटर झाली आहे. आणि २०२८ पर्यंत ३.४ लिटरपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. बिझनस स्टँडर्डच्या मते आज भारताचा मद्य बाजार ६० अब्ज अमेरिकन डॉलर झाला आहे, जो याला जागतिक व्यापाराच्या नकाशावर खूप महत्वाचा बनवत आहे.

अजित पवारांच्या निधनावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया...
अजित पवारांच्या निधनावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया....
फडणवीस, शिंदेंकडून सुनेत्रा पवारांचं सांत्वन; बारामतीत अलोट गर्दी
फडणवीस, शिंदेंकडून सुनेत्रा पवारांचं सांत्वन; बारामतीत अलोट गर्दी.
अजित पवारांच्या निधनाने राज्यावर शोककळा! छगन भुजबळही बारामतीत दाखल
अजित पवारांच्या निधनाने राज्यावर शोककळा! छगन भुजबळही बारामतीत दाखल.
अजित पवारांच्या विमान दुर्घटनेच्या वेळीचा आणखी एक व्हिडीओ समोर
अजित पवारांच्या विमान दुर्घटनेच्या वेळीचा आणखी एक व्हिडीओ समोर.
अजितदादांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी कुठे ठेवलं जाणार?
अजितदादांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी कुठे ठेवलं जाणार?.
मुख्यमंत्री फडणवीस, एकनाथ शिंदे बारामतीच्या रुग्णालयात दाखल
मुख्यमंत्री फडणवीस, एकनाथ शिंदे बारामतीच्या रुग्णालयात दाखल.
Ajit Pawar Death : अजित पवार यांच्या सासरवाडीत कडकडीत बंद!
Ajit Pawar Death : अजित पवार यांच्या सासरवाडीत कडकडीत बंद!.
अजितदादा वाचतील असं वाटलेलं; पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया
अजितदादा वाचतील असं वाटलेलं; पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया.
विमान अपघाताचं प्राथमिक कारण काय? मुरलीधर मोहोळांनी दिली माहिती
विमान अपघाताचं प्राथमिक कारण काय? मुरलीधर मोहोळांनी दिली माहिती.
अश्रूंचा बांध फुटला! बारामतीत पोहोचताच सुनेत्रा पवार यांना अश्रू अनावर
अश्रूंचा बांध फुटला! बारामतीत पोहोचताच सुनेत्रा पवार यांना अश्रू अनावर.