AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या रशियन मद्याला संपूर्ण जगात मागणी, भारतातील किंमत ऐकून आश्चर्य वाटेल…

रशिया आणि भारताची संस्कृती वेगळी असली तरी दोन्हींकडे मद्याचे चाहते आहेत. रशियातील हे मद्य संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. या मद्याच्या किंमती देखील खूपच आश्चर्यकारक आहेत.

या रशियन मद्याला संपूर्ण जगात मागणी, भारतातील किंमत ऐकून आश्चर्य वाटेल...
रशियन व्होडका
| Updated on: Dec 06, 2025 | 9:33 PM
Share

Russian Vodka: रशियाचे अध्यक्ष नुकतेच भारताच्या दौऱ्यावर आले होते. दोन दिवसांच्या दौऱ्याने रशियन आणि भारतीय संस्कृतीवर चर्चा झाली. लोक इंटरनेटवर पुतिन यांची सुरक्षा, त्याची आलिशान लिमोझिन एवढेच काय त्यांची राहण्याची व्यवस्था वगैरे माहिती सर्च करत होते. याच दरम्यान रशियाची ओळख असलेले त्यांचे पेय रशिय व्होडका देखील चर्चेत आहे. हे केवळ एक नशा येणारे मद्य नसून रशियन संस्कृती आणि इतिहासाशी देखील त्याचे नाते आहे.

रशियन लोकांना पाणी आहे ‘व्होडका’ !

रशिया आणि व्होडका यांचे नाते शतकाहून जुने आणि गहरे आहे. मजेशीर बाबत म्हणजे ‘व्होडका’ या शब्दाची व्युत्पत्ती रशियन शब्द ‘व्होडा’ (Voda) पासून झाली आहे. ज्याचा अर्थ ‘पाणी’ आहे. हे नाव हेच सांगते की रशियन जीवनात या मद्याला किती महत्व आहे. रशियात जन्मापासून मृत्यूपर्यंत, लग्नाच्या आनंद साजरा करण्यापासून ते अंत्यसंस्काराचा रितीरिवाज म्हणून व्होडका मस्ट आहे. येथील सामाजिक मेळ आणि सांस्कृतिक ओळखीचे हे एक प्रतिक आहे.

व्होडकाचा जन्मावरुन रशिया, पोलंड आणि स्वीडनमध्ये अहमिका सुरु असते. रशियाच्या दाव्यानुसार व्होडकाची निर्मिती पहिल्यांदा १४३० च्या आसपास मॉस्कोच्या एका मठात झाली होती. सुरुवातीला याचा वापर छंद किंवा व्यसन म्हणून नव्हे तर औषधाच्या रुपात होत होता. यास एंटी -बॅक्टेरियल गुणांमुळे अनेक आजारात उपयोग केला जात होता. हळूहळू रशियाच्या अर्थव्यवस्था आणि राजकारणातील ती महत्वाचा हिस्सा बनली.

कशी तयार होते ?

व्होडकाची शुद्धता आणि तिची ‘किक’ तिला इतर दारुपेक्षा वेगळी बनवते. याच्या निर्मितीसाठी मुख्य रुपाने स्टार्च आणि साखरेने भरपूर नैसर्गिक पदार्थांचा वापर केला जातो.यात बटाटा, गहू, राई वा बिटचा वापर केला होता. निर्मिती प्रक्रियेत सुरुवातीला या कच्च्या पदार्थांना वाटून उकळ्याने होते. त्यानंतर या मिश्रणाला फर्मेंटेशन म्हटले जाते.

तीन चार दिवसांनी या प्रक्रीयेनंतर जेव्हा अल्कोहोल तयार केले जाते, तेव्हा असली खेळ सुरु होतो तो डिस्टीलेशनचा. रशियन व्होडकाची खासियत म्हणजे तिचे डिस्टीलेशन तंत्र. हिला वारंवार डिस्टील केले जाते.कारण तिच्यातील अशुद्धता संपावी असा उद्देश्य असतो. अनेक प्रीमीयम ब्रँड तर हिला चारकोल फिल्टरेशनमधून गाळतात. हीचा स्वाद खूप स्वच्छ आणि स्मूद होतो. शेवटी ही तीव्रता नियंत्रित करण्यासाठी यात विशेष प्रकारचे पाणी मिक्स केले जाते.

भारतातही रशियन व्होडकाचे चाहते आहेत. हिचा स्मूदनेस आणि गळ्यात उतरण्याचा मखमली जाणीव हिला कॉकटेल आणि ‘नीट’ ( पाणी आणि सोड्याशिवाय ) पिणाऱ्यांसाठी पहिली पसंद बनवतो. बाजारातील काही ब्रँड तिच्या क्वालीटीसाठी प्रसिद्ध आहेत.

Stolichnaya (Stoli): गहू आणि तांदुळापासून तयार होतो.या व्होडकाला ४ वेळा डिस्टील आणि ३ वेळा फिल्टर केला जातो. ७५० एमएल बाटलीची किंमत सुमारे १,५०० रुपये असते.

Beluga Noble: सैबेरियातील हा व्होडका अत्यंत प्रीमियम मानला जातो. बनवल्यानंतर हिला ३० दिवस रेस्ट दिला जातो. जिचा टेक्सचर मलाई सारखा असतो. किंमत आहे ५,९९० रुपये

Russian Standard: हा ब्रँड भारतात प्रसिद्द आहे. महाराष्ट्रात याच्या ओरिजनल व्हेरिएंटची किंमत सुमारे २,२०० रुपये आहे. गोल्डची किंमत २,६०० रु. आणि प्लॅटीनमची किंमत ५,००० रुपयांच्या आसपास आहे.

AMG Carbon: ही पारंपारिक आणि आधुनिक तंत्राचा संगम आहे. हीची कार्बन फिल्टरेशन प्रक्रिया यास खूप खास बनवते किंमत आहे २,००० रुपये.

Belankaya Gold: जे लोक लक्झरी आणि स्मुदनेस पसंद करतात त्यांच्यासाठी हा चांगला पर्याय आहे.

Green Mark: रशियाच्या पारंपारिक रेसिपीवर आधारित हा व्होडका त्याच्या शानदार क्लालिटी आणि माफक किंमतीसाठी ओळखला जातो. याची किंमत सुमारे १,६३० रुपये आहे.

भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.