पुतिन यांच्या भारत दौऱ्यामुळे तुर्कीत खळबळ, एर्दोगन पडले पेचात ?
रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी भारताचा दौरा केल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवरील राजकारण बदलले आहे. ऑपरेशन सिंदुर दरम्यान पाकिस्तानला मदत करणारा तुर्की देखील आता आपली रणनिती बदलू पहात आहे.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन भारताचा दौरा पूर्ण करुन मायदेशी परतले आहे. याच दरम्यान तुर्कीतून एक खळबळजनक बातमी आली आहे. तुर्कीने रशियाकडून खरेदी केलेली s-400 एअर डिफेन्स सिस्टीम पूर्णपणे फेकण्याची तयारी केली आहे.त्यामुळे तुर्की आणि अमेरिकेतील नात्यातील कटूता कमी होताना दिसत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पचे जवळचे आणि तुर्कीचे अमेरिकन राजदूत टॉम बॅरक याने मोठा दावा केला की तुर्की लवकरच रशियाकडून खरेदी केलेले s-400 एअर डिफेन्स सिस्टीम हटवण्याची तयारीत आहे. ही तिच सिस्टीम आहे जिच्यामुळे तुर्कीला अमेरिकेने F-35 फायटर जेट प्रोग्रॅममधून बाहेर केले होते. आता अमेरिकन पक्षाचे म्हणणे आहे की जर तुर्कीने S-400 चा वापर पूर्ण सोडला तर येत्या काही महिन्यात F-35 खरेदीचा रस्ता मोकळा होऊ शकता.
अमेरिकेच्या दूताने काय सांगितले ?
अमेरिकेचे राजदूत टॉम बॅरक यांनी अबूधाबी एका संम्मेलना दरम्यान सांगितले की मला पूर्ण विश्वास आहे की येत्या चार ते सहा महिन्यात हा मुद्दा निकाली निघेल. जेव्हा त्यांना विचारले गेले की तुर्की s-400 सोडणार आहे का ? त्यांनी एका शब्दात उत्तर दिले की ‘हा’. 2017 मध्ये तुर्कीने रशियाकडून सुमारे 2.5 अब्ज डॉलरची डील करुन S-400 सिस्टम खरेदी केली होती. रशियाने साल 2019 मध्ये याची डिलीव्हरी देखील केली होती. परंतू अमेरिकेने स्पष्ट केले होते की F-35 आणि रशिया S-400 एक साथ ऑपरेट केले जाऊ शकत नाही. यानंतर तुर्कीला F-35 प्रोग्रॅमतून बाहेर केले आहे आणि निर्बंध देखील लावले गेले. या पावलाने दोन्ही देशांचे नाते खूपच तणावग्रस्त बनले.
S-400 वापर करत आहे तुर्की?
ब्लूमबर्गच्या रिपोर्टच्या नुसार अमेरिकेचे राजदूत टॉम बॅरक यांनी दावा केला आहे की तुर्की सिस्टीमचा वापर करत नाहीए, परंतू S-400 ची उपस्थिती अमेरिकेला मोठी अडचण बनली आहे. त्यांनी सांगितले की तुर्कीला समजले आहे की त्याला जर पाश्चात्य देशांशी नाते सुधारावयाचे आहे तर S-400 पासून सुटका करावीच लागणार आहे. गेल्या काही महिन्यात तुर्कीने संकेत दिले होते की F-35 प्रोग्रॅम पुन्हा यायचे आहे.तुर्कीने आधीच 1.4 अब्ज डॉलर जेट्ससाठी आगाऊ दिले होते. परंतू अमेरिकेने कोणताही रिफंड दिलेला नाही. आता बॅरक यांच्या वक्तव्यामुळे दोन्ही देशांच्या दरम्यानचा माहौल बदलताना दिसत आहे.
तुर्की संतुलन करु शकणार का ?
सध्या तुर्कीने रशियाकडून गॅस आणि तेल खरेदी सुरु ठेवली आहे. यामुळे तुर्कीला दोन्ही देशांशी संतुलन करुन चालावे लागणार आहे. परंतू नाटोतील आपली भूमिका मजबूत करण्यासाठी त्याला अमेरिकेची गरज आहे. तज्ज्ञांच्या मते जर तुर्की S-400 सिस्टीम हटवत असेल तर रशियाला मोठा संदेश असेल. बॅरक यांनी तुर्की आणि इस्रायलच्या वाढत्या तणावावरही टीप्पणी केली आणि म्हटले की दोन्ही देशांच्या अलिकडच्या वक्त्यव्यांमुळे केवळ राजकीय गोंधळ आहे. अखेर ते पुन्हा एकत्र काम करणार आहेत.
