तुर्कीत अमेरिका, अझरबैजान आणि पाकिस्तानचे सैन्य एकत्र का आले ? काय सुरु आहे नेमके ?
भारत आणि पाकिस्तान संघर्षात पाकिस्तानला मदत करणारा तुर्की आता कॅस्पियन समुद्रात अमेरिका, अझरबैजान आणि पाकिस्तान सोबत एकत्र आला आहे. यांच्या एकत्र येण्यामुळे भारताचेही टेन्शन वाढले आहे.

तुर्कीतील इजमीर येथे पाकिस्तान, अमेरिका, अझरबैजान आणि तुर्कीच्या सैन्यात संयुक्त सैन्य अभ्यास सुरु आहे. यात अझरबैझानची नौसेना , तुर्की सैन्य, अमेरिकेच्या सैन्य पथक आणि पाकिस्तानी वायू सेनेचे गस्त घालणारी विमान सामील झाले आहे. आता यानंतर अझरबैजान, पाकिस्तान, तुर्की तिन्ही मुस्लीम देश आणि अमेरिका अखेर एकाच वेळी सैन्य कवायती का करत आहेत ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. या मागे काय हेतू आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे.
प्रश्न असा निर्माण होत आहे की चारही देश समुद्र युद्धाभ्यास करुन अखेर कोणाच्या विरोधात तयारी करत आहेत ? वास्तविक हा अभ्यास एकप्रकारचा दबाव बनवण्याच्या रणनितीचा भाग आहे. जो कॅस्पियन – ब्लॅक सी क्षेत्रात इराण आणि रशियाच्या विरोधात ब्लॉकच्या विरोधात आहे. आता हे सर्व अमेरिका आणि ब्रिटनच्या समर्थनार्थ केले जात आहे.
संयुक्त सैन्य कवायतींचा हेतू काय ?
या संयुक्त सैन्य अभ्यासासंदर्भात एक टेलिग्राम अकाऊंट Sepah Pasdaran ने लिहीलंय की हे देश सातत्याने समुद्री युद्धाभ्यास करुन इराण, रशिया आणि चीनच्या विरोधात तयारी करत आहेत. या अभ्यासाचा हेतू ब्लॅक आणि कॅस्पियन सीमध्ये चीन, रशिया आणि इराण सारख्या देशांना घेरणे हा आहे. या देशांच्या दबदबा अखेर वाढला तर याचा परिणाम भारतावर देखील होऊ शकतो. कारण कॅस्पियन समुद्रातून भारताचा व्यापार २.९ अब्ज डॉलर इतका आहे.
या सैन्य अभ्यासाचा उद्देश्य कॅस्पियन-ब्लॅक सी क्षेत्रात इराण आणि रशियाच्या विरोधी आघाडीला रोखणे आणि त्यांना संतुलित करणे आहे. आणि हे अमेरिका आणि ब्रिटनच्या संरक्षणासाठी ( समर्थन ) आयोजित केले आहे.
ब्लॅक-सी का महत्वाचा आहे ?
Black Sea अनेक बाबतीत महत्वाचा आहे. याची सीमा सहा देश युक्रेन, रोमानिया, बुल्गारिया, तुर्की, जॉर्जिया आणि रशियाशी लागून आहेत. या देशांतील तीन देश रोमानिया, बुल्गारिया आणि तुर्की NATO चे सदस्य आहेत. रशिया ब्लॅक सीवर नियंत्रण करुन नाटो देशांवर आर्थिक आणि राजकीय दबदबा कायम ठेवू शकतो.
तसेच युरोप आणि आशियाच्या मध्ये असल्याने ब्लॅक सीची जिओपॉलिटीकल महत्व खूप जास्त आहे. हा सैन्य आणि राजकीय दृष्ट्या खूपच संवेदनशील भाग आहे. ब्लॅक सीलाल गेटवे ऑफ आशिया आणि युरोप म्हटले जाते. इतके महत्वाचे स्थान कोणताही देश आपल्या ताब्यात ठेवू इच्छीत आहे.त्यामुळे ब्लॅक सी हा नेहमीच संघर्षाचा मुद्दा बनला आहे.
व्यापारासाठी महत्वाचा
ब्लॅक सीमधून तेल, गॅस आणि धान्याचा मोठा व्यापार होतो. येथून निघणारा Bosphorus Strait ( तुर्कीयेचा जलडमरुमध्य ) जगातला सर्वात महत्वाच्या समुद्री मार्गांपैकी एक आहे. युक्रेन आणि रशिया जगातले सर्वात मोठे गहू आणि धान्य निर्यातदार आहेत. ब्लॅक सीच्या किनारे रशिया, युक्रेन, रोमानिया आणि बुल्गारिया येथे गुव्हाची पैदास जास्त होते. तसेच रशियाच्या गॅस आणि तेलाच्या पाईपलाईन ब्लॅक सीच्या जवळून जातात. हे क्षेत्र युरोपच्या ऊर्जा सुरक्षेसाठी खूप महत्वाचे आहे. अनेक देश येथे मोठमोठे संयुक्त सैनिक कवायती करतात. यामुळे हे क्षेत्र नेहमी हायटेन्शन झोन बनलेले असते.
इराणने ब्लॅक सी संदर्भात काय सांगितले?
इराणचे देखील ब्लॅक सीकडे ध्यान आकर्षित झाले आहे. इराणने अलिकडेच म्हटले होते की त्याच्यासाठी Caspian Sea (कॅस्पियन समुद्र) एवढाच महत्वाचा आहे जेवढा पर्सियन गल्फ होता. म्हणजे आता त्याच्या बाह्य सीमांना आणि ऊर्जा-परिवहन नेटवर्कमध्ये पूर्व दिशेला ( सियानपासून काळ्या समुद्राकडे ) प्राथमिकता दिली जात आहे.
