बंपर कमाईसाठी बांबू शेतीचा भन्नाट पर्याय, खत पाण्याशिवाय लाखोंच्या कमाईची संधी, वाचा सविस्तर

देशातील शेतकरी आता पारंपरिक शेती पासून फारकत घेत नवे मार्ग चोखाळत असताना आपल्याला दिसतो. शेती करताना कोणत्या पिकाची निवड करावी या विचार करताना शेतकरी आता त्यातून होणारा फायदा याचा देखील विचार करतो.

बंपर कमाईसाठी बांबू शेतीचा भन्नाट पर्याय, खत पाण्याशिवाय लाखोंच्या कमाईची संधी, वाचा सविस्तर
बांबू शेती
| Edited By: | Updated on: Jul 04, 2021 | 12:11 PM

नवी दिल्ली: देशातील शेतकरी आता पारंपरिक शेती पासून फारकत घेत नवे मार्ग चोखाळत असताना आपल्याला दिसतो. शेती करताना कोणत्या पिकाची निवड करावी या विचार करताना शेतकरी आता त्यातून होणारा फायदा याचा देखील विचार करतो. गेल्या काही वर्षापासून यामुळे भारतातील बांबू शेतीला चालना मिळाली आहे. आज देशामध्ये अनेक ठिकाणी व्यावसायिक तत्त्वावर बांबू शेती केली जाते.(Farmers can earn 5 to 7 lakh from bamboo farming in one hectare know about bamboo farming its benefit )

सातत्याने घटत असलेलं वनक्षेत्र आणि लाकडाचा वापर कमी करण्यासाठी बांबू महत्त्वपूर्ण ठरतात. यामुळे बांबू शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना नर्सरीतून बांबूची रोपे मोफत दिली जातात. बांबूच्या एकूण 136 प्रजाती आहेत, भारतात 13.96 मिलीयन हेक्टर क्षेत्रावर बांबू लावला जातो. मात्र व्यावसायिक शेती करण्यासाठी बांबूच्या सर्वाधिक 10 प्रकारच्या जातीच्या रोपांची लागवड केली जाते.

निर्यात वाढवण्याचा प्रयत्न

केंद्र सरकारच्या धोरणानुसार भारतात बांबू उत्पादनाला चालना देण्याचं कारण बांबूपासून तयार होणाऱ्या वस्तूंची निर्यात वाढवणं हे आहे. भारत जगामध्ये बांबू उत्पादनामध्ये अग्रणी देश असला तरी बांबूच्या निर्यातीबाबत भारत बराच पिछाडीवर आहे. देशात बांबूच्या शेतीचा प्रसार करण्यासाठी 2014 पासून केंद्र सरकार मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहे. यासाठी 2017 मध्ये भारतीय वन अधिनियम 1927 मध्ये दुरुस्ती करून झाडांच्या यादीतून बांबूला हटवण्यात आलं आहे.

बांबूची शेती करण्यासाठी त्याची एक नर्सरी तयार केले जाते. त्यामध्ये रोपे तयार केली जातात बांबूची नर्सरी अशा ठिकाणी तयार करावी जिथे सहजपणे जाता येईल. तिथली माती चांगली असावी त्याशिवाय त्याचा सामू 6.5 ते 7.5 असावा. मातीचा हा पोत नर्सरीसाठी चांगला मानला जातो. नर्सरी तयार करण्यासाठी मार्च महिना सर्वाधिक चांगला मानला जातो. सहा महिने ते एक वर्ष कालावधीसाठी बिया साठवल्या जातात त्यानंतर त्याची रोपे तयार केली जातात. याशिवाय पारंपरिक पद्धतीने देखील बांबू लागवड करता येते.

सातत्याने फायदा देणारे पीक

बांबू पिकाची ओळखी सातत्याने शेतकऱ्यांना नफा मिळवून देणारं पीक अशी आहे. शेतामध्ये बांबू लागवड करून शेतकरी चांगला नफा मिळवू शकतात. एका हेक्टर शेतीवर 625 रोपं चार मीटरच्या अंतरावर लावता येतात त्यानंतर पाचव्या वर्षी 3125 बांबू प्रत्येक वर्षी मिळण्यास सुरू होतात तर आठव्या वर्षी 6250 बांबू दरवर्षी मिळू शकतात. याची विक्री करून शेतकऱ्यांना वार्षिक पाच ते सात लाख प्रति हेक्‍टर रुपये मिळू शकतात. याशिवाय शेतकरी बांबू शेती मध्ये आंतरपीक देखील घेऊ शकतात यातून त्यांना प्रति वर्ष 20 ते 50 हजार हेक्टरी उत्पादन मिळू शकते.

बांबूसाठी कोणत्याही प्रकारच्या खतांची गरज लागत नाही. कोणत्या प्रकारचे कीटकनाशक देखील लागत नाही. बांबू शेती मृदा संरक्षणाचे काम करते माती वाहून जाण्यापासून वाचवते. बांबूचं वय 32 ते 40 वर्ष मानलं जातं. इतर पिकांच्या तुलनेत बांबू पीक पर्यावरणाचं मोठ्या प्रमाणावर रक्षण करतात. वातावरणातील 66 टक्के कार्बन डाय ऑक्साईड शोषून घेण्याचं काम बांबू द्वारे केलं जातं आणि तितकाच ऑक्सिजन देखील वातावरणात सोडला जातो.

इतर बातम्या

‘कंपन्यांच्या नफेखोरीतील अडथळे दूर करण्यासाठी कृषी कायद्यात बदल’, शेतकरी संघटना आक्रमक

कोरोनाच्या संकटातही शेतकऱ्यांनी करुन दाखवलं, लासलगांव बाजारसमितीत 1315 कोटींची उलाढाल

Farmers can earn 5 to 7 lakh from bamboo farming in one hectare know about bamboo farming its benefit