AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amravati : पॉकीट महाबीजचं अन् सोयाबीन बाजार समितीमधलं, खरिपाच्या तोंडावर राज्यमंत्री बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट

एखाद्या मंत्र्याने जरी काम सांगितले आणि त्याबाबत अधिकारी नकारात्मक असेल तरी ते काम होऊ शकत नाही. अधिकाऱ्यांची भूमिका फार महत्वाची असून प्रशासन आणि शेतकरी यांच्यामधला तो दुआ असून त्याचा फायदा हा शेतकऱ्यांना घेता आला पाहिजे असेही मत बच्चू कडू यांनी व्यक्त केले.

Amravati : पॉकीट महाबीजचं अन् सोयाबीन बाजार समितीमधलं, खरिपाच्या तोंडावर राज्यमंत्री बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
राज्यमंत्री बच्चू कडूImage Credit source: tv9
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Jun 01, 2022 | 4:51 PM
Share

अमरावती :  (Kharif Season) खरीप हंगाम तोंडावर आलेला आहे. शिवाय शेत शिवारापासून ते शहरापर्यंतच्या बाजारपेठेपर्यंत केवळ (Chemical & Seed) खत-बियाणे याचीच चर्चा सुरु असताना  (Bachchu Kadu) राज्यमंत्री बच्चू कडू यांनी एक गौप्यस्फोट केला आहे. गतवर्षी बिजोत्पादन केलेले बियाणे संपल्यानंतर महाबीजने अक्षरश: बाजार समितीमधील बियाणे खरेदी केले आणि तेच बियाणे हे महाबीजचे असल्याचे सांगत विकले असा त्यांनी आरोप केल्यामुळे आता महाबीजचे बियाणे खरेदी करताना प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात संशयाची पाल चुकचुकणार हे मात्र नक्की. यंदा महाबीज कंपनीने सोयाबीन बियाणांच्या किंमती वाढवल्या आहेत. त्यावर प्रतिक्रिया देताना बच्चू कडू यांनी हा गौप्यस्फोट केला आहे.

सबसिडीच्या नावाखाली लूट

बियाणे केवळ सबसिडीवर मिळते म्हणून शेतकऱ्यांचा त्याकडे कल असतो. ही सबसिडी म्हणजे एखादा वाईट मित्र मिळाला तर दारूची सवय लावते तशी सरकारने आम्हाला सबसिडी देऊन आमच्या मागे ही सवय लावून दिल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती हालाकीची असल्याने ही वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. पण उत्पादन वाढीसाठी आणि फसवणूक टाळण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदानाचा आधार काढावाच लागणार आहे. शिवाय शेतकऱ्यांनी गटाने जर बियाणे निर्मिती केली तर एक दिवस या कंपन्या बंद पडतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

शेती व्यवसायात अधिकाऱ्यांची भूमिका महत्वाची

शेती व्यवसायात शेतकऱ्यांना जर कृषी अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन मिळाले तर शेती उत्पादनात वाढ तर होतेच पण शेतकऱ्यामध्ये एक विश्वास निर्माण होतो. एखाद्या मंत्र्याने जरी काम सांगितले आणि त्याबाबत अधिकारी नकारात्मक असेल तरी ते काम होऊ शकत नाही. अधिकाऱ्यांची भूमिका फार महत्वाची असून प्रशासन आणि शेतकरी यांच्यामधला तो दुआ असून त्याचा फायदा हा शेतकऱ्यांना घेता आला पाहिजे असेही मत बच्चू कडू यांनी व्यक्त केले.

बियाणे निर्मितीसाठी शेतीगट महत्वाचे

बियाणे निर्मितीचा आव आणून काही कंपन्या ह्या केवळ हंगामात कोट्यावधी रुपये कमावतात. त्यामुळे शेतकऱ्यांनीच बिजोत्पादन कार्यक्रमाचे ज्ञान घेऊ शेतकरी गट करुन त्याची विक्री केली तर उत्पाादनात वाढ होणार आहे. शिवाय कंपन्यांच्या मनमानी कारभारातून सुटाकाही होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी एकत्र येत गटशेतीवर लक्ष केंद्रीत करावे असेही आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले आहे.

Follow Us
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत रणकंदन; राहुल गांधींसह....
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत रणकंदन; इंडिया आघाडीचा मोर्चा अन् राहुल गांधींसह अनेक खासदार ताब्यात
इंडिया आघाडीतचं तीव्र आंदोलन! राहुल गांधी, प्रियंका गांधींना पोलिस...
इंडिया आघाडीतचं तीव्र आंदोलन! राहुल गांधी, प्रियंका गांधींना पोलिसांनी ताब्यात घेतलं
पोलिसांनी विरोधकांचा 'लोकशाही वाचवा' मोर्चा थांबवला; विरोधक ठाम
India Alliance Morcha : पोलिसांनी विरोधकांचा 'लोकशाही वाचवा' मोर्चा थांबवला; विरोधक ठाम
ज्ञानेश कुमार हटाव! दिल्लीच्या रस्त्यावर इंडिया आघाडीचा एल्गार,
ज्ञानेश कुमार हटाव! दिल्लीच्या रस्त्यावर इंडिया आघाडीचा एल्गार, खासदारांचा निवडणूक आयोगावर मोर्चा
दिल्लीमध्ये इंडिया आघाडीचा ‘लोकशाही वाचवा’ मोर्चा, ज्ञानेश कुमार...
दिल्लीमध्ये इंडिया आघाडीचा ‘लोकशाही वाचवा’ मोर्चा, ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी
मतदारांच्या हक्कांसाठी SIR का महत्त्वाचं? CM फडणवीसांनी दिली माहिती
मतदारांच्या हक्कांसाठी SIR का महत्त्वाचं? CM फडणवीसांनी ट्विट करत दिली मोठी अपडेट
MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यावरून गोपीचंद पडळकरांचा रोहित पवारांवर...
MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यावरून गोपीचंद पडळकरांचा रोहित पवारांवर घणाघात; थेट म्हणाले...
पेपरफुटी प्रकरणात मोठी घडामोड! विवेक भिमनवारांचा राजीनामा मुख्यमंत्र्य
पेपरफुटी प्रकरणात मोठी घडामोड! विवेक भिमनवारांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे? रोहित पवारांचा खळबळजनक दावा
पुणे MPSC आंदोलनातून पोलिसांनी हटवल्या LED स्क्रीन, 80 विद्यार्थ्यांना
पुणे MPSC आंदोलनातून पोलिसांनी हटवल्या LED स्क्रीन, 80 विद्यार्थ्यांना नोटिसा
मुंबईतील बेकायदा फ्लेक्सवर महापालिकेचा दणका; आता जाहिरातींसाठी नवे...
मुंबईतील बेकायदा फ्लेक्सवर महापालिकेचा दणका; आता जाहिरातींसाठी नवे नियम काय?