बाणेगावच्या पेरू उत्पादक शेतकऱ्याच्या पाठीवर राज्यापालांची कौतुकाची थाप, दुष्काळावर अशी केली मात

Latur Banegaon Guava Farmers: दुष्काळी परिस्थितीवर मात करीत 12 लाखांचे उत्पादन घेणाऱ्या, शेतकऱ्याला फोन करीत राज्यपालांकडून अभिनंदन करण्यात आले. दुष्काळी परिस्थितीवर मात करीत लातूर जिल्ह्यातल्या बाणेगाव येथील शेतकऱ्याने आपल्या अडीच एकर शेतीत पेरू लागवडी पासून 12 लाख रुपयांचे उत्पादन घेतले आहे.

बाणेगावच्या पेरू उत्पादक शेतकऱ्याच्या पाठीवर राज्यापालांची कौतुकाची थाप, दुष्काळावर अशी केली मात
बाणेगावच्या पेरू उत्पादक शेतकऱ्याच्या पाठीवर राज्यापालांची कौतुकाची थाप, दुष्काळावर अशी केली मात
| Updated on: Nov 04, 2026 | 1:55 PM

Chadrakant Parihar Banegaon Latur: सध्या राज्यात दुष्काळाचे सावट आहे. पावसाने डोळे वटारल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. पाणी उपलब्ध नसलेल्या शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे. तर ज्यांच्या विहिरीला, बोअरला पाणी आहे. शेततळे आहे, त्यांना काही दिवस दिलासा मिळाला आहे. लातूर जिल्ह्यातील बाणेगाव येथील प्रगतीशील शेतकऱ्याने कमी पाण्यातही मोठी कामगिरी बजावली आहे. अडीच एकर शेतात पेरू लगावडीतून त्याने 12 लाख रुपयांचे उत्पादन घेतले आहे. या प्रयोगशील शेतकऱ्याची राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी दखल घेत मोबाईल वरून संपर्क करीत अभिनंदन केले आहे. चंद्रकांत परिहार असं या शेतकर्‍याचे नाव आहे. लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील बाणेगावमध्ये ही घटना कळताच कौतुक करण्यात येत आहे.

राज्यपालांकडून मोठे कौतुक

Loading...

यंदा लातूर जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. अशा स्थितीतही ठिबक सिंचनाचा वापर करून चंद्रकांत परिहार यांनी पेरूचा गोडवा कायम ठेवला. त्यांनी नैसर्गिक पद्धतीने शेती केली. त्यांच्या चवदार पेरूचा डंका राज्यभर पसरला. त्यांच्या कार्याची पावती राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी दिली. परिहार यांनी पाठवलेली पेरूची पेटी राज्यपालांना भेट देण्यात आली. डॉ. निशिकांत देशपांडे यांनी राज्यपालांना ही पेटी सुपूर्द केली. यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, सहसचिव एस. राममुर्ती, खासगी सचिव पवन सिंह यांची उपस्थिती होती.


तैवान पिंक प्रजातीच्या पेरूची लागवड

चंद्रकांत परिहार यांनी अडीच एकर शेतीत तैवान पिंक प्रजातीच्या पेरूची लागवड केली. ही पेरूची बाग त्यांनी जीवापाड जपली. या शेतीतून त्यांनी 12 लाखांचे उत्पन्न घेतले. यंदा पावसाने पाठ फिरवल्याने लातूर जिल्ह्यात सरासरीपेक्षा अतिशय कमी पाऊस झाला. पावसाने पाठ फिरवल्याने अनेक ठिकाणी भुजल पातळी घसरली आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत परिहार यांनी ठिबक सिंचनाचा नवापर करून नैसर्गिक पद्धतीने शेती केली. त्यांच्या चवदार पेरूला राज्यभरातून मागणी आहे. याची माहिती राज्यपालांपर्यंत पोहचली. त्यांच्या या यशाची दखल राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी घेतली. त्यांनी लोकभवनातून फोन केला. त्यांचे भरभरून कौतुक केले. विशेष म्हणजे लातूर दौऱ्यादरम्यान परिहार यांच्या शेताला भेट देणार असल्याचा निरोपही राज्यपालांनी दिला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us