अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, मात्र उन्हाळी तीळ पीक जोमात

| Updated on: Apr 01, 2023 | 12:43 PM

बुलढाणा जिल्ह्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील तब्बल 7115 शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मात्र काल पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह पावसाने हाहाकार माजवला आहे.

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, मात्र उन्हाळी तीळ पीक जोमात
unseasonal rain
Image Credit source: tv9marathi
Follow us on

वाशिम : वाशिमच्या (Washim karanja) कारंजा तालुक्यातील इंझोरी (Injhori) येथील प्रयोगशील शेतकरी अजय ढोक (ajay dhok) यांनी उन्हाळी तीळ पेरण्याचे ट्रॅक्टर चलित यंत्रावर नवीन जुगाड करून नवीन कल्पकतेतून प्रयोगशील शेतकऱ्याने देशी जुगाड केले आहे. तीळ पीक आता अतिशय उत्तम प्रकारे बहरले व त्याची उगम शक्ती पण चांगली झाली. आजपर्यंत त्या पिकाला फक्त पाणीच द्यावे लागले, कुठल्याही प्रकारची रोगराई आली नाही. त्याचबरोबर यावर्षी सर्वात जास्त अवकाळी पाऊस व गारपीट इत्यादी संकटांमध्ये तिळाचे पीक करपल्या गेले नसून वातावरणाने साथ दिली तर तिळाला आज रोजी पंधरा ते वीस हजार रुपये क्विंटलचा भाव मिळू शकतो असं मत शेतकऱ्यांनी व्यक्त केलं आहे.

वाशिम जिल्ह्यातील कारंजा शहर, शहा, आखातवाडा, वालई आणि मालेगांव तालुक्यातील पांगरी नवघरे सह अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह काल सायंकाळी जोरदार पाऊस पडला. या वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळं शेतातील उभी असलेली गहू, ज्वारी, कांदा, उन्हाळी तीळ, मूग या पिकांसह भाजीपाला पिकांचं नुकसानीची शक्यता असल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

अकोला जिल्ह्याला अवकाळी पावसाचा पुन्हा तडाखा

अकोला जिल्हातल्या पातूर तालुक्यातल्या आगीखेड, खामखेड शिवारात जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाने शुक्रवारी संध्याकाळी हजेरी लावली. त्यामुळे कांदा बीजोत्पादन, उन्हाळी पीक, फळ व फूल पिकांना मोठा फटका बसला आहे. तर यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर वाऱ्याचा जोर जास्त असल्याने रस्त्यावर झाडे उन्मळून पडली होती. त्यामुळे काही ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली होती.

हे सुद्धा वाचा

बुलढाणा जिल्ह्यात पावसाचा पुन्हा हाहाकार

बुलढाणा जिल्ह्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील तब्बल 7115 शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मात्र काल पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह पावसाने हाहाकार माजवला आहे. खामगाव तालुक्यात पुन्हा एकदा पावसाने शेतकऱ्यांना जोरदार तडाखा दिला आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना पुन्हा एकदा पावसाने रडवल्याचे चित्र बुलढाणा जिल्ह्यात पाहायला मिळतं आहे. वादळी वाऱ्यामुळे चिंचपूर येथील जिल्हा परिषद शाळेचे छप्पर उडून शाळेच्या इमारतीचे मोठ नुकसान झालं आहे.