Indapur : महिला शेतकऱ्यास मदतीचा हात, आपत्ती व्यवस्थापनाची कसर भरणे मामांनी भरुन काढली

| Updated on: May 26, 2022 | 11:45 AM

निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी एक ना अनेक समस्यांना सामोरे जात आहे. यंदा तर संकटाच्या मालिकेत अधिकच वाढ झाली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न राज्य सरकारच्या माध्यमातून केला जात आहे. त्याप्रमाणे दत्तात्रय भरणे यांनी प्रथम अंथूर्णे गावातील शेतकऱ्यांशी संवाद साधला.

Indapur : महिला शेतकऱ्यास मदतीचा हात, आपत्ती व्यवस्थापनाची कसर भरणे मामांनी भरुन काढली
Follow us on

इंदापूर : राज्यात गेल्या काही दिवसांपासून (Short Circuit) शॉर्टसर्किटने आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यामध्ये उसाचे फडाची राखरांगोळी झाली असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अशाच दुर्घटनेत तालुक्यातील अंथूर्णे गावातील एका महिला शेतकऱ्याच्या दोन (Cow) गाईंचा मृत्यू झाला होता. आपत्ती व्यवस्थापनातून सदरील महिलेला त्वरीत मदत मिळणे अपेक्षित होते. पण होत असलेली दिरांगई आणि महिलेचे हाल पाहून राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी (Help to the farmer) 50 हजाराची मदत केली आहे. त्यामुळे आर्थिक अडचणीत आलेल्या महिला शेतकऱ्याला मदतीचा हात मिळाला आहे.

दुर्घटनेत 2 गायींचा मृत्यू इतर शेतकऱ्यांचेही नुकसान

मध्यंतरी तालुक्यातील अंथूर्णे गावात वादळी वाऱ्यासह पावसाला सुरवात झाली होती. दरम्यान, शॉर्टसर्किटमुळे गोठ्यात बांधलेल्या 2 गायींचा जागेवर मृत्यू झाला होता. शिवाय गावाला लागून असलेल्या शेतीचेही नुकसान झाले होते. महिला शेतकऱ्यांना प्रोत्साहन आणि अडचणीच्या काळात मदत हे ठाकरे सरकारचे धोरण आहे. त्यामुळे यंदाचे वर्ष हे महिला शेतकऱ्यांच्या सन्मानाचे आहे. याची सर्व जाणीव ठेवत पालकमंत्री तथा राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी ही आर्थिक मदत केली आहे.

शेतकऱ्यांशी संवाद अन् रोख रक्कम

निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी एक ना अनेक समस्यांना सामोरे जात आहे. यंदा तर संकटाच्या मालिकेत अधिकच वाढ झाली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न राज्य सरकारच्या माध्यमातून केला जात आहे. त्याप्रमाणे दत्तात्रय भरणे यांनी प्रथम अंथूर्णे गावातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या पण महिला शेतकऱ्याची परस्थिती हा हालाखीची असल्याने भरणे यांनी लागलीच 50 हजारांची मदत केली.

हे सुद्धा वाचा

आपत्ती व्यवस्थापनाची जबाबदारी काय ?

नैसर्गिक घटनेमध्ये जर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असेल तर काही तासांमध्ये शेतकऱ्यांना मदत देण्यात यावेत अशी नियामावलीच आहे. मात्र, गेल्या दोन वर्षापासून या विभागाकडेच निधीची पूर्तताच झालेला नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची अडचण झाली आहे. नैससर्गिक आपत्ती व्यवस्थापनात 48 तासांच्या आतमध्ये ही रक्कम संबंधितांना देणे गरजेचे आहे. मात्र, प्रक्रिया पूर्ण होऊन देखील न्याय मिळत नाही. याची खंत आहे.