पाण्यावर चारा निर्मिती, दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी फायदेशीर हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान नेमकं काय?

| Updated on: Aug 01, 2021 | 5:21 PM

शेतकरी दूध विक्रीतून मिळणाऱ्या पैशातून कुटुबांची आर्थिक गरज भागवतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून शेतीचं क्षेत्र कमी होत असल्याचं समोर आलं आहे.

पाण्यावर चारा निर्मिती, दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी फायदेशीर हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान नेमकं काय?
प्रातिनिधिक फोटो
Follow us on

नवी दिल्ली: भारतातील शेतकऱ्यांचा पशुपालन हा महत्वाचा जोडधंदा असल्याचं म्हटलं जातं. शेतकरी दूध विक्रीतून मिळणाऱ्या पैशातून कुटुबांची आर्थिक गरज भागवतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून शेतीचं क्षेत्र कमी होत असल्याचं समोर आलं आहे. शेतकऱ्यांसमोर चाऱ्याची समस्या मोठ्या प्रमाणावर निर्माण होत आहे. चाऱ्याच्या समस्येवर मार्ग काढण्यासाठी शेतकऱ्यासमोर हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानाचा वापर करुन चारा उपलब्ध करण्याचा मार्ग उपलब्ध झाला आहे. शेतकरी हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानाद्वारे 10 दिवसांमध्ये चारा तयार करु शकतात.

मक्याच्या बियांपासून फक्त हायड्रोपोनिक ट्रेमध्ये पाणी शिंपडून चारा पिकवता येतो. या तंत्राचा वापर करून चारा तयार करण्यासाठी खूप कमी वेळ लागतो. हायड्रोपोनिक्स तंत्राद्वारे शेतकरी बांधवांना फक्त 10 दिवसात चारा मिळू शकतो. हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करणे खूप महाग आहे कारण त्यात खूप खर्च होतो. मात्र, स्थानिक बाजारपेठेत किंवा घरी उपलब्ध होणाऱ्या वस्तू आणि साधनं वापरूनकमी खर्चात चारा पिकवता येई शकतो.

स्थानिक साहित्य वापरून कमी खर्चात ग्रीन हाऊस तयार करून शेतकरी आता हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाने चारा पिकवत आहेत. या ग्रीन हाऊसच्या निर्मितीमध्ये पाणी गोळा करण्यासाठी जुन्या टाकीचा वापर करता येतो. ग्रीन हाऊस बनवण्यासाठी बांबू, लाकूड, लोखंडी पाईप किंवा पीव्हीसी पाईप सारख्या साहित्याचा वापर केला जातो. ट्रे स्टँड बनवण्यासाठी बांबू किंवा पीव्हीसी पाईपचा वापर करता येतो.

या तंत्राचा वापर करून चारा पिकवण्यासाठी काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. यामध्ये, मक्याचे न कापलेले आणि स्वच्छ बियाणे वापरले जातात. उन्हात सुकल्यानंतर बिया पाण्यामध्ये टाकून आणि हातांनी चोळून स्वच्छ कराव्या लागतात. बिया पाण्याने भरलेल्या बादलीत टाकल्या जातात. पाण्यात टाकल्यानंतर तरंगणारे बियाणे वापरले जात नाही. कारण त्याची उगवण क्षमता खराब असल्यानं ते वापरले जात नाही. वरील प्रक्रिया केल्यानंतर बादलीमध्ये 1 मिली हायड्रोजन पेरोक्साइड टाकावं लागतं. यानंतर ते बियाणं एका ज्यूट ट्रे मध्ये भरा आणि उगवण्यासाठी ठेवा. जी जागा उबदार आणि स्वच्छ असेल तिथे पोत्यात बियाणं ठेवावं. बियाणे उगवल्यानंतर ते एका ट्रेमध्ये ठेवा. 10 दिवसांनी हायड्रोपॉनिक्स तंत्रादावेर चारा तयार होईल.

इतर बातम्या:

PM Kisan: पीएम किसान योजनेचा नववा हप्ता ‘या’ तारखेपर्यंत जारी होणार, 11 कोटी शेतकऱ्यांना 2 हजार रुपये मिळणार

Drumstick Farming: एकदाच 50 हजाराची गुंतवणूक करा आणि दहा वर्षांपर्यंत खोऱ्याने पैसे कमवा

Hydroponic technique for the production of green fodder know all details and process