Summer Season : मराठवाड्यात ज्वारीचे क्षेत्र घटले मात्र, विदर्भातील शेतकऱ्यांना बाजारपेठेचे गणित कळले..!

| Updated on: Apr 23, 2022 | 11:42 AM

उत्पादन वाढीसाठी पीक पध्दतीमध्ये बदल हा चांगला प्रयोग असला तरी या बदलाबरोबर बाजारपेठेचा अभ्यास होणे देखील तेवढेच महत्वाचे आहे. दरवर्षी ज्वारीचे दर आणि पेरणीपासून काढणीपर्यंत करावे लागणारे परीश्रम यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी ज्वारी या मुख्य पिकाला बाजूला सारुन हरभरा, उन्हाळी सोयाबीन यावर भर दिला. मात्र, कधी नव्हे ते यवतमाळ जिल्ह्यात यंदा उन्हाळी ज्वारीचा प्रयोग करण्यात आला आहे.

Summer Season : मराठवाड्यात ज्वारीचे क्षेत्र घटले मात्र, विदर्भातील शेतकऱ्यांना बाजारपेठेचे गणित कळले..!
यवतमाळ जिल्ह्यामध्ये यंदा प्रथमच उन्हाळी ज्वारीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे.
Follow us on

यवतमाळ : उत्पादन वाढीसाठी (Crop Change) पीक पध्दतीमध्ये बदल हा चांगला प्रयोग असला तरी या बदलाबरोबर बाजारपेठेचा अभ्यास होणे देखील तेवढेच महत्वाचे आहे. दरवर्षी (Jowar Rate) ज्वारीचे दर आणि पेरणीपासून काढणीपर्यंत करावे लागणारे परीश्रम यामुळे (Marathwada) मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी ज्वारी या मुख्य पिकाला बाजूला सारुन हरभरा, उन्हाळी सोयाबीन यावर भर दिला. मात्र, कधी नव्हे ते यवतमाळ जिल्ह्यात यंदा उन्हाळी ज्वारीचा प्रयोग करण्यात आला आहे. तब्बल 5 हजार हेक्टरावर यंदा ज्वारीचा पेरा झाला आहे. घटलेल्या क्षेत्रामुळे यंदा ज्वारीला विक्रमी दर मिळेल असा अंदाज वर्तवला जात आहे. शिवाय चारा टंचाईमुळे कडबाही वधरणार असल्याचे संकेत आहेत.

खरिपानंतर रिकाम्या शेतजमिन क्षेत्राचा वापर

विदर्भात खरीप हंगामातील सोयाबीन, तूर पिकाची काढणी झाली की, आगामी खरिपापर्यंत हे क्षेत्र रिकामेच राहत होते. शिवाय यंदा मुबलक पावसामुळे पाणीसाठाही उपलब्ध होता. यामुळे शेतकऱ्यांनी धाडस करुन ज्वारीचा पेरा केला आहे. यंदा प्रथमच यवतमाळ जिल्ह्यामध्ये तब्बल 5 हजार हेक्टरावर ज्वारीचा पेरा झाला आहे. रब्बी हंगामात गहू, हरभरा पिकांवर शेतकऱ्यांचा भर असतो पण यंदा उन्हाळ्यामध्येही पाण्याची उपलब्धता असल्याने शेतकऱ्यांनी उन्हाळी ज्वारीचा पेरा मोठ्या प्रमाणात केला आहे.

यंदा वाढीव दराची अपेक्षा

ज्वारी हे मराठवाडा आणि सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मुख्य पीक असले तरी आता क्षेत्रात कमालीची घट होत आहे. यंदा तर सरासरीपेक्षाही क्षेत्र हे घटलेले आहे. ज्वारीला आहारात अनन्यसाधारण महत्व आहे. यामाध्यमातून मानवी शरिरीला प्रथिने मिळतात. असे असले तरी क्षेत्रच घटल्याने मागणीच्या तुलनेत पुरवठा होतो की नाही याबाबत साशंका उपस्थित केली जात आहे. बाजारपेठेत मागणी वाढून पुरवठा घटला तर ज्वारीच्या दरात वाढ होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्याच बरोबर ज्वारी कडब्याच्या दरातही वाढ होणार असल्याचे सांगितले जात आहे.

विदर्भातील शेतकऱ्यांना दुहेरी फायदा

मराठवाडा आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये यंदा सरासरीपेक्षाही कमी क्षेत्रात ज्वारीचा पेरा झाला आहे. शिवाय अवकाळी पाऊस आणि वातावरणातील बदलामुळे उत्पादनावरही परिणाम झाला आहे. याचाच फायदा आता विदर्भातील शेतकऱ्यांना होणार आहे. कारण यंदा प्रथमच या भागातील शेतकऱ्यांनी हा अनोखा प्रयोग केला आहे. सध्या ज्वारीला 2 ते 2 हजार 800 असा सरासरी दर आहे. शेतकऱ्यांनी योग्य प्रकारे साठवणूक करुन जर ज्वारी विकली तर फायदा होणार असल्याचे व्यापारी अशोक अग्रवाल यांनी सांगितले आहे.

संबंधित बातम्या :

Mango : निसर्गाच्या लहरीपणानंतर आता आंबा दरात घसरण, शेवटी नुकसान ते नुकसानच..!

Orchard Cultivation : फळबाग लागवड आता अधिक सोईस्कर, कमी क्षेत्रात जास्तीचा लाभ, नेमकी योजना काय?

Soybean Crop : बियाणांची उगवण क्षमता तपासा अन् मगच चाढ्यावर मूठ ठेवा, खरीप हंगामपूर्व बैठकांमध्ये कृषी विभागाचा सूर