सक्षम ताटे गेल्यावर आचल मामीडवार हिची मोठी मागणी अखेर मान्य, तब्बल 24 तास..
Nanded Crime News : नांदेडच्या सक्षम ताटे याची प्रेमप्रकरणातून हत्या करण्यात आली. या घटनेने मोठी खळबळ उडाली. हेच नाही तर तब्बल तीन गोळ्या सक्षम याच्यावर झाडण्यात आल्या. आता आचल हिने केलेली मागणी प्रशाससनाकडून मंजूर करण्यात आली.

प्रेमसंबंधातून नांदेडच्या सक्षम ताटे या तरूणाची हत्या झाली. सक्षम हा अवघ्या 20 वर्षाचा होता. आचल मामीडवार आणि सक्षम यांच्यात गेल्या तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होती. मात्र, आचलच्या कुटुंबियांचा याला जोरदार विरोध होता. आचलच्या भावाने सक्षमला आचलपासून दूर राहण्यास सांगितले होते. आचलच्या कुटुबियांची आणि सक्षमची गुन्हेगारी पार्श्वभूमी होती. सक्षमवर अनेक गुन्हे दाखल होते, हेच नाही तर त्याच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आली होती. आचलचे वडील आणि भावांवरही काही गुन्हे दाखल आहेत. सक्षम जेलमधून सुटून बाहेर आल्यापासूनच सक्षमच्या हत्येचा कट तिच्या कुटुंबियांकडून रचला जात होता. सक्षमची हत्या करण्याच्या काही वेळ अगोदरच आचलची आई सक्षमच्या घरी पोहोचली होती आणि तिने आचलपासून दूर राहण्याची धमकी सक्षमच्या कुटुंबियांना दिली होती.
आचलचे भाऊ सक्षमच्या घरी पोहोचले. मात्र, सक्षम घरी नव्हता, त्याला बाहेरच त्यांनी गाठले आणि गोड बोलून नेले. सक्षमवर तब्बल तीन गोळ्या झाडण्यात आल्या. तरीही सक्षम पळत होता. फरशीत पाय उडकला आणि तो पडला. तीच फरशी सक्षमच्या डोक्यात घालून त्याची हत्या करण्यात आली. सक्षमच याच्या हत्येबद्दल आचलला काहीच कल्पना नव्हती. तीला देवदर्शनाला जाऊ म्हणून मामाच्या घरी नेण्यात आले होते.
सक्षमच्या हत्येची माहिती तिला पेपरमधील फोटोवरून समजली. पोलिस स्टेशनमध्ये मला तुमच्यासोबत यायचे असल्याचे सांगत थेट सक्षमच्या घरी आचल पोहोचली. हेच नाही तर तिने थेट सक्षमच्या मृतदेहासोबतच लग्न केले. लग्नातील जवळपास सर्वच विधी तिने केले. एखाद्या चित्रपटात घडावी तशी गोष्टी सक्षमच्या हत्येनंतर घडली. आयुष्यभर सक्षमची बायको म्हणून राहणार असल्याचे तिने स्पष्ट म्हटले.
सक्षम ताटे याच्या हत्येनंतर आचल हिने अत्यंत मोठी मागणी केली होती. सक्षम ताटे गेल्यानंतर आता त्याच्या कुटुंबाला माझ्या कुटुंबाकडून धोका आहे. माझा भाऊ अल्पवयीन आहे आणि तो बाहेर येऊन सक्षमच्या कुटुंबाचा काटा काढू शकतो. यामुळे त्याच्या कुटुंबाला संरक्षण द्या. आता आचल हिची मागणी अखेर प्रशासनाने मान्य केली असून सक्षमच्या घराबाहेर पोलिसांचा अहोरात्र पहारा असेल. सक्षम ताटे याच्या संघसेननगर येथील निवासस्थानी पोलिसांनी सहा शस्त्रधारी पोलीस कर्मचारी तैनात केले आहेत. जे 24 तास सक्षमच्या घराबाहेर असतील .
