खर्च टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी लढवली शक्कल, भंगारात टाकलेल्या बैलगाडीचा ट्रॅक्टरची ट्रॉली म्हणून वापर

बुलढाणा तालुक्यातील गोंधनखेड येथील संतोष शेळके या शेतकऱ्याने शेतातील मशागतीसाठी एक छोटा ट्रॅक्टर घेतला. मात्र ट्रॅक्टरच्या ट्रॉली साठी जास्त खर्च येत असल्याने या शेतकऱ्यांनी शक्कल लढवत आपल्याकडे असलेली जुनी बैलगाडी दुरुस्त करून त्याला ट्रॅक्टरचे टायर लावले.

खर्च टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी लढवली शक्कल, भंगारात टाकलेल्या बैलगाडीचा ट्रॅक्टरची ट्रॉली म्हणून वापर
file photo
Image Credit source: twitter
| Updated on: Feb 25, 2023 | 9:46 AM

संदीप वानखेडे, बुलढाणा : शेतकरी (Farmer) नेहमीच आपला उत्पादन खर्च आणि मशागतीचा खर्च कमी करण्यासाठी काटकसर करत असतो. त्यासाठी शेतकऱ्यांकडून वेगवेगळ्या युक्त्याही लढवल्या जातात, अशीच शक्कल लढवत भंगारत टाकलेल्या बैलगाडीचा ट्रॅक्टरची ट्रॉली (tractor trolly) म्हणून वापर करतोय. ही शक्कल बुलढाणा (buldhana) तालुक्यातील गोंधनखेड येथील संतोष शेळके यांनी लढवली आहे. जुन्या बैलगाडीचा वापर शेतातील कामासाठी होत असल्यामुळे संपुर्ण परिसरात चर्चेचा विषय ठरला. जुनी बैलगाडी नव्या पद्धतीने बनवून घेतली आहे, त्यामुळे ती सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

बैलगाडी दुरुस्त करून त्याला ट्रॅक्टरचे टायर लावले

बुलढाणा तालुक्यातील गोंधनखेड येथील संतोष शेळके या शेतकऱ्याने शेतातील मशागतीसाठी एक छोटा ट्रॅक्टर घेतला. मात्र ट्रॅक्टरच्या ट्रॉली साठी जास्त खर्च येत असल्याने या शेतकऱ्यांनी शक्कल लढवत आपल्याकडे असलेली जुनी बैलगाडी दुरुस्त करून त्याला ट्रॅक्टरचे टायर लावले. या जुन्या बैलगाडीचा ट्रॅक्टरला जोडून शेतातील माल वाहतूक करण्यासाठी ट्रॉली प्रमाणे वापर करीत आहे. यामुळे या शेतकऱ्याचा ट्रॉलीचा खर्चही वाचलाय शिवाय अडगळीत पडलेली आणि वापरात नसलेली बैलगाडी देखील वापरात आलीये.

पुर्वी शेतीची काम आधुनिक पद्धतीने केली जायची

शेतीची जुनी अवजारं आता कोणी वापरताना शक्यतो दिसत नाही. सगळी काम यंत्राद्वारे केली जातात. पुर्वी शेतीची काम आधुनिक पद्धतीने केली जायची. परंतु सध्या शेतीची कामं सगळी यंत्राद्वारे केली जात आहेत. पूर्वीची शेतीसाठी वापरात असलेली साधन दिसणं सुध्दा दुर्मीळ झालं आहे. पण बुलढाणा तालुक्यातील गोंधनखेड येथील संतोष शेळके यांनी जुनी बैलगाडी नव्या पद्धतीने वापरात आणल्याने सगळीकडे त्यांचं कौतुक होत आहे.