AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बहीण-भाऊ पुन्हा आमनेसामने, धनंजय मुंडे यांची पंकजा मुंडे यांच्यावर टीका, म्हणाले, आम्ही बोळ्याने दूध…

जीवनामध्ये राजकारण केले, एखाद्याला विरोध केला असेल तर तो विरोध सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी केला असेल. पण राजकारणामध्ये स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी मी कोणाच्या पाठीवर वार केला नाही.

बहीण-भाऊ पुन्हा आमनेसामने, धनंजय मुंडे यांची पंकजा मुंडे यांच्यावर टीका, म्हणाले, आम्ही बोळ्याने दूध...
dhananjay mundeImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Feb 25, 2023 | 9:10 AM
Share

परळी : बीडचं राजकारण सध्या एकाच कुटुंबाभोवती फिरतंय. या राजकारणात तिसरा व्हिलन नाहीये. मुंडे घराण्याभोवती हे राजकारण फिरत आहे. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या बहीण भावांच्या भोवती हे राजकारण फिरत आहे. विशेष म्हणजे दोघेही परस्पर विरोधी पक्षात असल्याने बीडमधील राजकारण अधिकच तापतंय. दोन्ही नेत्यांची खासियत म्हणजे दोघेही एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. त्यामुळे एकाने दुसऱ्यावर टीका करताच बीडमध्ये चर्चा तर होतच असते. कालही राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यावर टीकेचे बाण सोडले. त्यामुळे या टीकेची जोरदार चर्चा सुरू झालीय.

परळी तालुक्यातील सिरसाळा या गावी जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे धनंजय मुंडे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी धनंजय मुंडे यांनी पंकजा यांच्यावर टीकास्त्र सोडलं. दुसऱ्या कोणत्याही लोकप्रतिनिधींनी या सिरसाळ्यात विकासाची एक रुपयांची साधी एक वीट तरी आणली का? पण मी या सीरसाळ्यात विकासाची गंगा आणत आहे. या गावातही मला खूप विरोध करण्यात आला. मात्र मी विकास करताना विरोधक म्हणून बघत नाही. विकास करताना मी माझ्या घरावर तुळशीपत्र ठेऊन काम करत असतो. तुम्ही असं समजू नका की आम्ही बोळ्याने दूध पितोय, असा टोला धनंजय मुंडे यांनी लगावला.

पाठीत वार केला नाही

जीवनामध्ये राजकारण केले, एखाद्याला विरोध केला असेल तर तो विरोध सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी केला असेल. पण राजकारणामध्ये स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी मी कोणाच्या पाठीवर वार केला नाही. ज्याला कोणाला वार करायचा असेल तर छातीत वार झेलण्याची माझी तयारी आहे. पाठीत वार करण्याचं काही जणांनी बंद करावं, अशा शब्दात त्यांनी कार्यकर्त्यांचे कानही टोचले.

लातूरला रेल्वे डब्याचा प्रकल्प कसा गेला?

तुमचं राज्यात आणि केंद्रात सरकार आहे. तरीही रेल्वे डब्याचा प्रकल्प लातूरला कसा गेला? असा सवाल त्यांनी पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे यांना केला. नागपूर-गोव्याला जाणारा समृद्धी महामार्ग झाला. तसाच परळी तालुक्यातून समृद्धीचा मार्ग जाणार आहे. हे मी तुम्हाला आजच जाहीर करून सांगतो, असंही ते म्हणाले.

काय तरी ताकद असेल ना?

दुर्दैव आमचं. केंद्रात त्यांचं सरकार आहे. या भागाच्या खासदार केंद्राच्या सरकारमध्ये प्रतिनिधी आहेत. तरी सुद्धा एकही नवी रेल्वे या रेल्वे स्टेशनमधून मंजूर केली नाही. पण आमच्या सारखा एक फाटका तुमच्या घारातला मुलगा नागपूरहून गोव्यास जाणारा रस्ता आपल्या तालुक्यातून नेतो. काय तरी ताकद असेल ना आपली? असं म्हणत त्यांनी पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांच्यावर टीकास्त्र सोडलं.

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.