मराठवाड्यात ‘या’ नव्या पिकाचे क्षेत्र तर वाढले आता उत्पादन वाढीसाठी ‘असे’ करा व्यवस्थापन..!

| Updated on: Dec 08, 2021 | 7:17 AM

राजमा हे पीक आतापर्यंत केवळ उत्तर भारतामध्ये घेतले जात होते. पण त्यानंतर महाराष्ट्रात पुणे, सातारा, नाशिक जिल्ह्यात क्षेत्र वाढले होते. यंदा तर रब्बी हंगामात राजमाचे उत्पादन घेण्यासाठी मराठवाड्यातील शेतकरीही पुढे सरसावले आहेत. बीड जिल्ह्यात घाटावरील बोटावर मोजण्याएवढेच शेतकरी राजमा पिकाचे उत्पादन घेत होते. पण यंदा प्रतिकूल परस्थितीमध्ये ही तब्बल 20 हजार हेक्टरावर या पिकाचे उत्पादन घेण्यात आले आहे.

मराठवाड्यात या नव्या पिकाचे क्षेत्र तर वाढले आता उत्पादन वाढीसाठी असे करा व्यवस्थापन..!
संग्रहीत छायाचित्र
Follow us on

बीड : शेतामधून अधिकचे उत्पादन मिळवण्यासाठी पीक पध्दतीमध्ये मोठा बदल होत आहे. पारंपारिक पिकांवरच अवलंबून न राहता आता मराठवाड्यातील शेतकरीही अमूलाग्र बदल करीत आहे. ( Rajma Crop)राजमा हे पीक आतापर्यंत केवळ उत्तर भारतामध्ये घेतले जात होते. पण त्यानंतर महाराष्ट्रात पुणे, सातारा, नाशिक जिल्ह्यात क्षेत्र वाढले होते. यंदा तर रब्बी हंगामात राजमाचे उत्पादन घेण्यासाठी मराठवाड्यातील शेतकरीही पुढे सरसावले आहेत. ( Increased Area in Marathwada) बीड जिल्ह्यात घाटावरील बोटावर मोजण्याएवढेच शेतकरी राजमा पिकाचे उत्पादन घेत होते. पण यंदा प्रतिकूल (Change in Crop System) परस्थितीमध्ये ही तब्बल 20 हजार हेक्टरावर या पिकाचे उत्पादन घेण्यात आले आहे.

मराठवाड्यात राजमा (श्रावण घेवडा) क्षेत्र वाढण्याची काय आहेत कारणे?

राजमा पिक प्रक्रिया ही सोयाबीन प्रमाणेच आहे. त्यामुळेच मराठवाड्यात देखील या पिकाला पोषक वातरवण तयार झाले आहे. शिवाय 40 दिवसांमध्ये राजमा पिक शेतकऱ्यांना मालामाल करणार आहे. यापूर्वी बीड तालुक्यातील केवळ नेकनूर, चौसाळा, लिंबागणेश येथे राजमाचे उत्पादन घेतले जात होते. आता रब्बी हंगामात जिल्ह्यात 20 हजार हेक्टरावर उत्पादन घेतले आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी हे नवखे पीक असले तरी योग्य व्यवस्थापनेमुळे उत्पन्न वाढीचा उद्देशही साध्य होणार आहे. एकरी 30 किलो बियाणे लागते 15 हजार रुपये खर्चून शेतकऱ्यांना 7 ते 8 क्विंटल उत्पादन शेतकऱ्यांना मिळणार आहे.

40 दिवसांमध्ये पिक पदरात

राजमाची परेणी झाल्यापासून केवळ 40 दिवसांमध्ये उत्पादन मिळण्यास सुरवात होणार आहे. जिल्ह्यात जवळपास 95 टक्के क्षेत्रावर लाल राजमाची लागवड करण्यात आल आहे. आता पहिल्या पेऱ्यातील राजमा हे फुलअवस्थेत तर काही ठिकाणी शेंगा लागण्याच्या लागण्याची अवस्था आहे. असे असले तरी दुसरीकडे राजमा पिकाला रान डूकरांची उपद्रव होत नसल्याने क्षेत्रात वाढ होणार आहे.

असे करा व्यवस्थापन

घेवडयाच्‍या (राजमा) पिकाची मुळे जमिनीत उथळ वाढत असल्यामुळे पिकाला जास्‍त पाणी दिल्‍यास ते मुळांना अपायकारक ठरते. मात्र, फूलोऱ्यातच्‍या वेळी जमिनीत पुरेसा ओलावा नसल्‍यास फळधारणा कमी प्रमाणात होते. म्‍हणून घेवडयाच्‍या पिकाला फूले येण्‍याआधी पाणी द्यावे. तसेच पावसाळयात जमिनितील पाण्‍याचा निचरा होणे आवश्‍यक असते. खरीप हंगामातील घेवडयाच्‍या पिकाला पाणी देण्‍यात आवश्‍यकता भासत नाही. परंतू पाऊस लांबल्यास पिकाला गरजेनुसार पाणी द्यावे. उन्‍हाळी हंगामातील पिकाला 8 ते 10 दिवसांच्‍या अंतराने आणि जमिनीच्‍या मगदुरानुसार पाण्‍याच्‍या पाळया द्याव्‍यात.

किड रोगाचे व्यवस्थापनही महत्वाचे

मावा : मावा कीड घेवडयाच्‍या पानातील रस शोषून घेते. त्‍यामुळे पानाच्‍या कडा वळतात. मावा किड वाढणा-या फांद्या आणि लहान पानांतील रस शोषून घेते. या किडीच्‍या प्रादुर्भावामुळे काहीवेळा फूलांची गळ होते. मावा किडीच्‍या नियंत्रणासाठी 10 लिटर पाण्‍यात सायपरमेथीन (25 टक्‍के प्रवाही) 5 मिली किंवा 10 मिलीलीटर रोगो या प्रमाणात पाण्‍यात मिसळून फवारावे.

शेंगा पोखरणारी अळी : ही किड प्रथम शेंगाच्‍या मागच्या बाजूस आढळून येते. त्या नंतर शेंगेच्‍या आत शिरून आतील दाणे खाऊन फस्त करते. यावर किडीचा प्रादुर्भाव झाल्यास उत्पादन मोठी घट होणार आहे त्यामुळेकिडीचा प्रादुर्भाव होताच 5 टक्‍के कार्बरिल दर हेक्‍टरी 20 किलो या प्रमाणात मिसळून फवारी करणे गरजीची आहे.

संबंधित बातम्या :

Record Break : बीज गुणन केंद्राची किमया : 15 हेक्टरामध्ये 340 क्विंटल सोयाबीनचे उत्पादन

मराठवाड्यातील शेतकऱ्यांनीही परिवर्तन केले पण निसर्गालाही नाही बघवले

आता सर्वकाही व्यर्थ..! 40 एक्कर मिरची लागवड केलेल्या शेतकऱ्यांची काय झाली अवस्था..?