5

मराठवाड्यातील शेतकऱ्यांनीही परिवर्तन केले पण निसर्गालाही नाही बघवले

मराठवाडा तसा दुष्काळी भाग अशीच ओळख आतापर्यंत झालेली आहे. मात्र, प्रतिकूल परस्थितीमध्येही येथील शेतकऱ्यांनी नवनविन प्रयोग हे केलेले आहेत. मराठवाड्याच्या खडकाळ भागातील 20 हजार हेक्टरावर आंबा पिक बहरत होते. परंतू, डोंगरातील ही हिरवळ निसर्गाच्या ही पचनी पडलेली नाही.

मराठवाड्यातील शेतकऱ्यांनीही परिवर्तन केले पण निसर्गालाही नाही बघवले
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Dec 07, 2021 | 4:45 PM

औरंगाबाद : मराठवाडा तसा दुष्काळी भाग अशीच ओळख आतापर्यंत झालेली आहे. मात्र, प्रतिकूल परस्थितीमध्येही येथील शेतकऱ्यांनी नवनविन प्रयोग हे केलेले आहेत. मराठवाड्याच्या खडकाळ भागातील 20 हजार हेक्टरावर आंबा पिक बहरत होते. परंतू, डोंगरातील ही हिरवळ निसर्गाच्या ही पचनी पडलेली नाही. आता आंबा पिक बहरात असतानाच पाऊस आणि वातावरणातील बदालामुळे मोठ्या कष्टाने बहरलेले आंबा पिकही धोक्यात आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये आंबा बागा बहरलेल्या आहेत.

मोहोर लागण्यासाठी पोषक वातावरणच नाही

प्रतिकूल परस्थितीमध्येही या विभागात आंब्याचे उत्पादन घेतले जाते. सध्या 20 हजार हेक्टरावर आंबा आहे. दरवर्षी मोहोर लागण्याच्या वेळीच वातावरणात बदल होतो आणि उत्पादकांची निराशा होते. यंदाहा सर्वकाही सुरळीच होते पण मोहोर फुटण्यासाठी 14 डिग्री तापमानात 21 दिवस सातत्य राहणे गरजेचे आहे. कल्टारचा वापर केलेल्या बागांमध्ये नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये तर नैसर्गिकरीत्या डिसेंबर जानेवारीमध्ये आंब्याला मोहर येतो. यंदा ज्या ठिकाणी कल्टारचा वापर केला त्या बागांमध्ये जवळपास ७० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त बागांमध्ये मोहर बाहेर पडला आहे. त्यामुळे न भरुन निघणारे नुकसान हे शेतकऱ्यांचे झाले आहे.

अद्यापही प्रतिकूलच वातावरण

अतिपावसामुळे आंब्याची झाडे ही सुप्ताअवस्थेत आहेत. शिवाय सततच्या पावसामुळे जमिनीत वाफसाच राहिला नाही. त्यामुळे मोहोर लागण्यासाठी आवश्यक असणारे वातावरण अद्यापही तयार झालेले नाही. मोहोर लागण्यापूर्वी आंब्याची जमिन ही कोरडी पडणे गरजेचे असते. मुळांना हवा मिळणे गरजेचे असताना झाडाला अन्नद्रव्य ही मिळालेच नाहीत त्यामुळे मोहोर लागला नाही तर नैसर्गिक पध्दतीने लागलेला मोहोर वातावरणामुळे गळून पडला आहे.

लगडलेला मोहोर गळून पडला

ज्या आंब्याच्या झाडांना गतवर्षी कमी मोहोर होता ती झाडे यंदा लगडून गेली होती. त्यामुळे मोहोराबरोबरच आंबेही लागणार असेच चित्र होते. पण डिसेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात वातावरणातील बदल आणि अवकाळी पाऊस यामुळे 80 टक्के मोहोर गळून पडलेला आहे. त्यामुळे उत्पादनात तर घट होणारच पण हंगामही लांबणीवर जाणार असल्याचे कृषितज्ञ रामेश्वर चांडक यांनी सांगितलेले आहे. आता उर्वरीत काळात बुरशीनाशक आणि किड नाशक फवारुनच बागा उबदार आणाव्या लागतील असाही सल्ला त्यांनी दिला आहे.

संबंधित बातम्या :

आता सर्वकाही व्यर्थ..! 40 एक्कर मिरची लागवड केलेल्या शेतकऱ्यांची काय झाली अवस्था..?

पावसाची उघडीप तरीही द्राक्ष बागा धोक्यातच, काय आहे शेतकऱ्यांसमोरील नवे संकट?

सोयाबीनच्या दरात चढ-उतार कायम, तुरीची आवक होण्यापूर्वीच शेतकऱ्यांमध्ये धास्ती

Non Stop LIVE Update
निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा दाखला देत हा खासदार म्हणाला... अर्धवटराव
निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा दाखला देत हा खासदार म्हणाला... अर्धवटराव
आमदाराची पोलीस निरीक्षकाला सस्पेंड करण्याची धमकी, कारण अगदीच शुल्लक
आमदाराची पोलीस निरीक्षकाला सस्पेंड करण्याची धमकी, कारण अगदीच शुल्लक
पुढील चार दिवस राज्यात मुसळधार पाऊस? कोणत्या जिल्ह्यांना कोणता अलर्ट?
पुढील चार दिवस राज्यात मुसळधार पाऊस? कोणत्या जिल्ह्यांना कोणता अलर्ट?
पंकजा मुंडे यांच्या नाराजीची भाजपकडून दखल, बावनकुळे स्पष्ट म्हणाले...
पंकजा मुंडे यांच्या नाराजीची भाजपकडून दखल, बावनकुळे स्पष्ट म्हणाले...
MPSC परीक्षा पास पण हाकतोय मेंढ्या, पण का? व्हिडीओ होतोय व्हायरल
MPSC परीक्षा पास पण हाकतोय मेंढ्या, पण का? व्हिडीओ होतोय व्हायरल
बहिणीसाठी भाऊ पुढं सरसावला, पंकजा मुंडेंसाठी धनंजय मुंडेंनी काय केलं?
बहिणीसाठी भाऊ पुढं सरसावला, पंकजा मुंडेंसाठी धनंजय मुंडेंनी काय केलं?
आधी लगीन कोंढाण्याचं.. बाप्पासाठी तानाजी मालुसरे यांचा ऐतिहासिक देखावा
आधी लगीन कोंढाण्याचं.. बाप्पासाठी तानाजी मालुसरे यांचा ऐतिहासिक देखावा
मोबाईल चार्जिंगला लावून दुर्लक्ष करताय? मग काळजीपूर्वक बघा व्हिडीओ
मोबाईल चार्जिंगला लावून दुर्लक्ष करताय? मग काळजीपूर्वक बघा व्हिडीओ
श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या विसर्जनासाठी २१ फुटी रथ, बघा रथाची पहिली झलक
श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या विसर्जनासाठी २१ फुटी रथ, बघा रथाची पहिली झलक
चिखलात लोळून लोकांनी कुठं केलं आंदोलन? आक्रमक स्थानिकांची मागणी काय?
चिखलात लोळून लोकांनी कुठं केलं आंदोलन? आक्रमक स्थानिकांची मागणी काय?