सोयाबीनच्या दरात चढ-उतार कायम, तुरीची आवक होण्यापूर्वीच शेतकऱ्यांमध्ये धास्ती

मध्यंतरी 6 हजार 800 रुपये दर असतानाही 9 हजार पोत्यांचीच आवक होती तर मंगळवारी सोयाबीनला 6 हजार 400 दर असतनाही 10 हजार पोत्यांचीच आवक आहे. सध्या सोयाबीनचे दर हे स्थिर असले तरी वाढीव दराची शेतकऱ्यांचा प्रतिक्षा कायम आहे. 7 हजार रुपये क्विंटलचा दर मिळाला तरच विक्री अशी भूमिका काही शेतकऱ्यांनी घेतलेली आहे. तर तुरीची आवक सुरु होताच दर कमी होतील म्हणून हमीभाव केंद्र सुरु करण्याची मागणी वाढत आहे.

सोयाबीनच्या दरात चढ-उतार कायम, तुरीची आवक होण्यापूर्वीच शेतकऱ्यांमध्ये धास्ती
संग्रहीत छायाचित्र

लातूर : गेल्या आठ दिवसांपासून सोयाबीनच्या दरामध्ये चढ-उतार कायम राहिलेला आहे. आठ दिवसांपूर्वीच (Soybean Rate) सोयाबीनच्या दरात तब्बल 600 रुपयांची घसरण ही झाली होती तर त्यानंतरही सोयाबीनचे दर हे सावरले होते. दरामध्ये कमी-जास्तपणा झाला असला तरी मात्र, शेतरकऱ्यांनीही सोयाबीन विक्रीची गडबड ही केलेलीच नाही. (Latur Market) मध्यंतरी 6 हजार 800 रुपये दर असतानाही 9 हजार पोत्यांचीच आवक होती तर मंगळवारी सोयाबीनला 6 हजार 400 दर असतनाही 10 हजार पोत्यांचीच आवक आहे. सध्या सोयाबीनचे दर हे स्थिर असले तरी वाढीव दराची शेतकऱ्यांचा प्रतिक्षा कायम आहे. 7 हजार रुपये क्विंटलचा दर मिळाला तरच विक्री अशी भूमिका काही शेतकऱ्यांनी घेतलेली आहे. तर तुरीची आवक सुरु होताच दर कमी होतील म्हणून हमीभाव केंद्र सुरु करण्याची मागणी वाढत आहे.

दर पुन्हा 6 हजार 400 रुपयांवर स्थिरावले

यंदा सोयाबीनचा हंगाम हा लांबत आहे. दरवर्षी दिवाळी नंतर आवक वाढते आणि डिसेंबर अखेरपर्यंत आवक कायम राहिल्याने सोयाबीनचा हंगाम संपुष्टात येत असतो. यंदा मात्र, शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीपेक्षा साठवणूकीवरच अधिक भर दिला होता. सध्याही दरात कमी-अधिकपणा झाला तरी साठवणूक याच भूमिकेवर शेतकरी ठाम आहेत. सध्याचा दर हा सरासरी असला तरी अनेकांना 7 हजारापेक्षा अधिकची अपेक्षा आहे. त्यामुळे ज्या दिवसांमध्ये लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दिवासाला 50 ते 60 हजार पोत्यांची आवक असते त्या बाजारसमितीमध्ये 10 हजार पोत्यांपेक्षा अधिकची आवकच झालेली नाही.

तुरीचा हंगाम तोंडावर

खरीप हंगामातील अंतिम पिक म्हणून ओळखले जाणारी तुरही आता बाजारात दाखल होईल. पावसामुळे तुरीची कापणी रखडलेली आहे. मात्र, यंदा तेलबिया आणि कापसाच्या दरात वाढ झाली होती. त्यामुळे या पिकांची हमीभावानेच खरेदी व्हावी असे काही नव्हते पण आता कडधान्यही बाजारात दाखल होणार आहे. यामध्ये तूर, हरभरा या पिकांचा समावेश राहणार आहे. यापूर्वीच सरकारने मोठ्या प्रमाणात तूर आणि हरभऱ्याची आयात केली असल्याने दर कमीचा राहणार आहेत. त्यामुळे हंगाम सुरु होण्यापूर्वीच हमीभाव केंद्र सुरु करण्याची मागणी होऊ लागली आहे. तुरीचा आवक सुरु होताच पुन्हा दर कमी होण्याची शक्यता आहे.

इतर शेतीमालाचे कसे आहेत दर

लातूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दुपारी 12 च्या दरम्यान शेतीमालाचे सौदे होतात. मंगळवारी लाल तूर- 6001 रुपये क्विंटल, पांढरी तूर 6050 रुपये क्विंटल, पिंकू तूर 5675 रुपये क्विंटल, जानकी चना 4900 रुपये क्विंटल, विजय चणा 4900, चना मिल 4850, सोयाबीन 6800, चमकी मूग 7350, मिल मूग 6450 तर उडीदाचा दर 7200, पांढरी तूर 6050 एवढा राहिला होता.

संबंधित बातम्या :

शेतकऱ्यांसाठी खुशखबर : प्रतिक्षा संपली यादीत नाव तपासा अन् खात्री करुन घ्या, सन्मान निधी योजनेतील 10 हप्त्याची

द्राक्षाचे नुकसान प्रशासकीय यंत्रणेमुळेच, आस्मानी संकटाला प्रशासनाकडून ‘पाठबळच’

कृषी विभागाचे सर्वकाही ऑनलाईनच, कृषी सेवा केंद्रांच्या कारभारातही काय झाला मोठा बदल?

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI