किसान क्रेडिट कार्डवर कर्ज घेतलंय, 30 जूनपूर्वी परतफेड करा अन्यथा बसेल मोठा फटका

| Updated on: Jun 25, 2021 | 1:13 PM

केंद्र सरकारनं किसान क्रेडिट कार्डद्वारे घेतलेले पैसे परत करण्यासाठी 30 जूनपर्यंत वाढवली होती. ही मुदत संपण्यास अवघे पाच दिवस राहिले आहेत. KCC

किसान क्रेडिट कार्डवर कर्ज घेतलंय, 30 जूनपूर्वी परतफेड करा अन्यथा बसेल मोठा फटका
किसान क्रेडिट कार्ड
Follow us on

नवी दिल्ली: केंद्र सरकारनं किसान क्रेडिट कार्डद्वारे घेतलेले पैसे परत करण्यासाठी 30 जूनपर्यंत वाढवली होती. ही मुदत संपण्यास अवघे पाच दिवस राहिले आहेत. ज्या शेतकऱ्यांनी किसान क्रेडिट कार्डवरुन पैसे घेतले असतील त्यांना कोणत्याही परिस्थिती ते 30 जूनपूर्वी परत करावे लागतील. जे शेतकरी किसान क्रेडिट कार्डवरील घेतलेली रक्कम परत करणार नाहीत त्यांना ती रक्कम 3 टक्के अधिक व्याजानं परत करावी लागेल. केंद्रातील मोदी सरकारनं कोरोना संकटामुळे केसीसीवर घेतलेली रक्कम परत करण्याची मुदत वाढवली होती. (Kisan Credit Card loan last date near for depositing KCC money in the bank)

किसान क्रेडिट कार्डवर घेतलेलं कर्ज 31 मार्चपूर्वी व्याजासह परत करावं लागतं. त्यानंतर शेतकऱ्यांना नवीन कर्ज मिळतं. किसान क्रेडिट कार्डवरील कर्जावर केंद्र सरकारकडून व्याज माफी देखील देण्यात येते. 30 जूनपर्यंत कर्जाची रक्कम जमा केल्यानंतर शेतकऱ्यांना 3 किंवा 4 जुलैपर्यंत व्याज परतावा मिळू शकतो. किसान क्रेडिट कार्डवरील कर्ज व्यापारी बँका, सहकारी बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांकडून घेतलं जातं.

कोरोनामुळे कर्ज परतफेडीला मुदतवाढ

भारतात कोरोना विषाणू संसर्ग सुरु झाल्यानंतर मार्च 2020 मध्ये लॉकडाऊन करण्यात आलं होतं. कोरोना आणि लॉकडाऊनमुळं प्रत्येक क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. केंद्र सरकारनं यामुळे किसान क्रेडिट कार्डवरील कर्ज परत करण्याची मुदत 31 मार्चवरुन 31 मे पर्यंत वाढवली होती. त्यानंतर आता ती 30 जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे.

किसान क्रेडिट कार्डच्या कर्जावरील व्याज

किसान क्रेडिट कार्डद्वारे शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज 9 टक्के व्याजानं मिळतं. केंद्र सरकार यावर 2 टक्के सूट देते. वेळेत कर्ज फेड केल्यास 3 टक्के आणखी सूट मिळते. शेतकऱ्यांना या प्रकारे किसान क्रेडिट कार्डद्वारे 4 टक्के व्याजदरानं कर्ज मिळतं.

KCC साठी महत्त्वाचे कागदपत्रं

वेगवेगळ्या बँका केसीसीसाठी अर्जदाराकडे वेगवेगळी कागदपत्रे मागतात, परंतु काही मूलभूत कागदपत्रे अर्जदाराकडे असणे आवश्यक आहे. यामध्ये आयडी प्रुफ आणि अ‍ॅड्रेस प्रूफसाठी आधार कार्ड, पॅनकार्ड, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स असावेत. (Kisan Credit Card) याशिवाय अर्जासाठी अर्जदाराचा पासपोर्ट फोटोदेखील आवश्यक आहे..

संबंधित बातम्या

KCC | किसान क्रेडिट कार्ड मोफत बनवण्याची सुवर्णसंधी, ऑनलाईन अर्ज कुठे करायचा?

KCC | किसान क्रेडिट कार्ड प्रक्रिया आणखी सोपी, केवायसीबाबत मोठा निर्णय

(Kisan Credit Card loan last date near for depositing KCC money in the bank)