शेतकर्यांना दिवाळीपूर्वीच मिळणार 5000 रुपये, पण अगोदर आजच करा हे काम
Maharashtra Farmer Relief Fund: महाराष्ट्र सरकारने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना 5,000 रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. याचा जवळपास 1.5 कोटी शेतकऱ्यांना थेट फायदा होणार आहे. पण त्यासाठी ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.

Maharashtra Farmer Relief Fund : महाराष्ट्रात यंदा कमकुवत मान्सूनमुळे शेतकऱ्यांसमोर अनेक अडचणी आणि समस्या आहेत. राज्य सरकारने दिवाळीपूर्वी शेतकर्यांच्या बँक खात्यात 5000-5000 रुपये पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सरकारने 7500 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. राज्यातील जवळपास 1.5 कोटी शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. पण जर ई-केवायसी अथवा बँकेशी संबंधित काही माहिती अपूर्ण असेल, तर शेतकऱ्यांना हा मदतनिधी मिळण्यास अडचण येऊ शकते. अशावेळी शेतकऱ्यांना वेळेतच ही सर्व प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.
कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार 5000 रुपये?
राज्यातील 304 तालुके दुष्काळग्रस्त जाहीर केले आहे. या परिसरातील ज्या शेतकर्यांना खरीप हंगामात 33 टक्क्यांपेक्षा अधिकचे नुकसान झाले आहे. त्यांना 5000 रुपयांची अग्रिम मदत जाहीर केली आहे. ही रक्कम थेट पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवण्यात येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना स्वतंत्र अर्ज करण्याची गरज नाही. पण ई-केवायसी आणि इतर प्रक्रिया रखडली असेल तर ती पूर्ण करून घेणे आवश्यक आहे.
ई-केवायसीविषयी काय नियम?
सरकारने शेतकऱ्यांची अडचण कमी करण्यासाठी ई-केवायसीचा नियम सोपा केला आहे. ज्या शेतकऱ्यांनी 1 नोव्हेंबर 2025 रोजीनंतर कोणत्याही सरकारी योजनेसाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली असेल, त्यांना ही प्रक्रिया पुन्हा करण्याची गरज नाही. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. त्यांनी ती लवकर पूर्ण करून घेणे आवश्यक आहे.
Farmer ID नसेल तर काय होणार?
सरकारने वन अधिकारातंर्गत शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा व्यवस्था केली आहे. अशा शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नसेल तर त्यांना ई-केवायसीच्या आधारे मदत मिळू शकते. इतर शेतकऱ्यांना सुद्धा त्यांचा फार्मर आयडी आणि बँक खात्याची माहिती द्यावी लागेल.
खात्यात केव्हा येणार पैसा?
सरकारने दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना पैसे देण्याचे निश्चित केले आहे. सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात एकाच दिवसात रक्कम पोहचेल. याविषयीची कोणतीही अधिकृत तारीख समोर आलेली नाही. पाच हजारांची अग्रिम मदत सध्या देण्यात येणार आहे. पिकाच्या नुकसानीचा सर्व्हे पूर्ण झाल्यावर उर्वरीत रक्कम देण्यात येणार आहे.