Monsoon 2021: मान्सून दाखल होण्यास उशीर का? मान्सूनच्या बदलत्या स्वरुपाचा भारतावर काय परिणाम होणार?

| Updated on: Jun 03, 2021 | 7:40 PM

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार मान्सून केरळमध्ये आज दाखळ होणार आहे. Monsoon 2021 update

Monsoon 2021: मान्सून दाखल होण्यास उशीर का? मान्सूनच्या बदलत्या स्वरुपाचा भारतावर काय परिणाम होणार?
प्रतिकात्मक छायाचित्र
Follow us on

नवी दिल्ली: मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्या नंतर भारतातील शेतकरी खरीप हंगामीतील शेतीच्या कामाच्या तयारीला सुरुवात करतो. भारतीय शेतकऱ्यांना या काळात मान्सूनच्या आगमनाचे वेध लागलेले असतात. यंदा, मात्र मान्सून दोन दिवस उशिराने दाखल होणार आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार मानसून आज केरळमध्ये दाखल होईल. मान्सूनच्या आगमनाच्यासाठी ची परिस्थिती केरळच्या भागात निर्माण झाली असून तिथे पावसाचे प्रमाण वाढले आहे. त्यासोबतच अरबी समुद्रातील वातावरणामध्ये देखील बदल झालेले दिसून आले आहेत. केरळमध्ये पुढील चोवीस तासात पाऊस वाढून मान्सूनच्या परिस्थिती आगमनासाठी परिस्थिती अनुकूल होईल अशी अपेक्षा आहे. केरळमध्ये सर्वसाधारणपणे 1 जून रोजी मान्सून दाखल होतो. यावेळी भारतीय हवामान विभागाने 31 मे रोजी मान्सून दाखल होईल असा अंदाज वर्तवला होता. मात्र, त्यानंतर बदललेल्या वातावरणातील परिस्थितीमुळे मान्सून 3 जूनला दाखल होईल, असे सांगण्यात आले आहे. (Monsoon 2021 update monsoon delayed due to climate change will impact on India )

मान्सून केरळमध्ये कधी दाखल होतो?

गेल्या काही दशकांपासून मान्सून पाऊस 1 जून रोजी केरळमध्ये दाखल होतो. भारतीय हवामान विभाग गेल्या काही वर्षांपासून मान्सून दाखल होण्याबद्दल च्या वेगवेगळ्या तारखा जाहीर करत आहे. 1961 ते 2019 पर्यंतचे आकडे पाहिले तर मान्सूनच्या आगमनाची तारीख 1 जून अशीच आहे. तर संपूर्ण भारतभरात मान्सून पोहोचण्यासाठी 15 जुलै पर्यंतचा कालावधी लागतो. अलीकडच्या काळात मान्सून 8 जुलै पर्यंत संपूर्ण भारतात पोहोचलेला असतो.

मान्सूनची एक्झिट कधी सुरु होते?

भारतातील मान्सून पावसाची समाप्ती सप्टेंबर महिन्यामध्ये सुरू होते. गेल्या काही दिवसांमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासानुसार मान्सून परत जाण्यास 17 सप्टेंबर पासून सुरुवात होते. 2020 मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार हे स्पष्ट करण्यात आलं आहे. 2019 मध्ये मान्सून परत जाण्यास 9 ऑक्टोबर ला सुरुवात झाली होती. त्यावर्षी मान्सून परत जाण्यास तब्बल 39 दिवस उशिरा झाला होता. त्यापूर्वी मान्सूनची भारतातून एक्झिट होण्याची सुरुवात 1 सप्टेंबर पासून होत असे. संपूर्ण देशभरातून मान्सूनचा पाऊस 15 ऑक्टोबर पर्यंत काढता पाय घेतो. गेल्या वर्षी 28 ऑक्टोबरला गोवा किनारपट्टीवरून मान्सून पावसाने एक्झिट घेतली होती.

शेतीवर काय परिणाम

भारतातील शेती मान्सून पावसावर आधारित आहे. मान्सूनच्या बदलेल्या स्वरुपामुळे शेतीमध्ये बदल करणे आवश्यक आहे. मान्सूनच्या आगमनामध्ये आणि जाण्यामध्ये झालेल्या बदलामुळे शेतीवर त्याचा फार मोठा परिणाम होतो. शेतीचे फार मोठं नुकसान होतं, यामुळे भविष्यात अन्न संकट निर्माण होण्याची देखील शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने यंदा सामान्य पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

मान्सूनचा स्वरूप का बदललं?

गेल्या काही वर्षांमध्ये भारतातील मोठ्या प्रमाणात झालेली वृक्षतोड कार्बनचे वाढते प्रमाण यामुळे हिंद महासागरातील तापमानामध्ये वाढ झाली आहे. वाढलेले ग्लोबल वॉर्मिंग याचा परिणाम देखील मान्सूनवर झाला आहे. मान्सून वारे अरबी समुद्रातून बाष्प ग्रहण करतात आणि भारतावर त्याचा पावसाच्या रूपात वर्षाव होतो.

संबंधित बातम्या:

Weather Update: लोणावळ्यात मुसळधार पावसाची बँटिंग, सागंली लातूरसह मुंबईत मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात

Monsoon Update: चांगली बातमी, 24 तासात मान्सून केरळमध्ये दाखल होणार, पश्चिमी वारे वाहण्यास सुरुवात

(Monsoon 2021 update monsoon delayed due to climate change will impact on India)