AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ देशात चक्क विकला जातोय सेकंड-हँड फ्राईड चिकन, नेमकं काय आहे हा प्रकार जाणून घ्या

आपण अनेकदा इलेक्ट्रिक वस्तू सेकंड हँड घेताना पाहिले असेल. पण तुम्हाला माहिती आहे का की या देशात चक्क "सेकंड-हँड फ्राइड चिकन" विकलं जातयं. त्यात मजेशीर गोष्ट म्हणजे या देशात त्याची मोठी क्रेझ वाढत आहे आणि लोकं ते मुबलक प्रमाणात खात देखील आहेत. चला तर मग आजच्या लेखात जाणून घेऊयात की असा कोणता देश आहे जिथे "सेकंड-हँड फ्राइड चिकन" विकल जातयं.

'या' देशात चक्क विकला जातोय सेकंड-हँड फ्राईड चिकन, नेमकं काय आहे हा प्रकार जाणून घ्या
fried chicken
| Edited By: | Updated on: Dec 06, 2025 | 3:27 PM
Share

तुम्ही कदाचित सेकंड-हँड कार, मोबाईल फोन, पुस्तके आणि फर्निचर याबद्दल खूप ऐकले असेल. पण तुम्हाला कधी असे वाटले आहे का की एखादा पदार्थ देखील सेकंड-हँड असू शकतो? हे वाचून कोणालाही धक्का बसेल, पण जगात असे एक ठिकाण आहे जिथे सेकंड-हँड पदार्थ विकला जातो आणि त्या लोकांचे हे दैनंदिन जीवनाचा एक भाग आहे. हे केवळ विचित्रच नाही तर हृदयद्रावक देखील आहे. चला तर आजच्या लेखात आपण या देशाबद्दल जाणून घेऊयात.

मीडिया रिपोर्ट्सनुसार फिलीपिन्समधील अनेक झोपडपट्ट्यांमध्ये गेल्या काही दशकांपासून एक डिश तयार केली जाते आणि खाल्ली जाते, ज्याला स्थानिक भाषेत पगपाग म्हणतात. या शब्दाचा अर्थ धूळ साफ करणे आहे, मात्र या देशात धुळ साफ केली जात नाही तर तेथील मोठ्या 5 स्टार भागातील रेस्टॉरंट्स आणि फास्ट-फूड हे चेनद्वारे कचऱ्यात टाकल्या जाणाऱ्या पदार्थांचे तुकडे साफ करण्याचे काम येथील काही फिलीपिन्स माणसं करत असतात. तर यामध्ये विशेषतः उरलेले तळलेले चिकन हे उचलले जाते, धुतले जाते, पुन्हा मसाला लावला जातो आणि नंतर ते चिकन तेलात तळले जाते. सोप्या भाषेत सांगायचे तर, ही डिश ताटात उरलेले चांगले चिकन असते जे नीट स्वच्छ करून पुन्हा त्यापासून नवीन डिश तयार केली जाते.

हे सेकंड-हँड फ्राईड चिकन कसे तयार केले जाते?

फिलीपिन्समध्ये दररोज सकाळी झोपडपट्ट्यांमधील काही लोकांचा एक गट मोठ्या कचराकुंड्यांकडे जातो. त्यांचे काम म्हणजे अशा पदार्थांचे तुकडे शोधणे जे अजूनही चांगले आहेत ज्याला उष्ट केलेलं नाही आणि ते फेकून दिले गेले आहेत पण पूर्णपणे खराब झालेले नाहीत. असे काही चिकनचे तुकडे ते प्लास्टिकच्या पिशव्या आणि टोपल्यांमध्ये गोळा करतात.

त्यानंतर हे उत्पादन पगपॅग तयार करणाऱ्या आणि विकणाऱ्या विक्रेत्यांपर्यंत पोहोचवतात. त्यांच्या प्रक्रियेत प्रथम चिकन किंवा मांसाचे तुकडे पाण्याने धुवून त्यावरील घाण काढून टाकली जाते, नंतर त्यावर मीठ, मिरपूड आणि इतर त्यांचे मसाले लावले जातात. नंतर ते गरम तेलात पूर्णपणे तळले जाते, जेणेकरून खाणारी व्यक्ती हे पदार्थ ताजे आहे याची खात्री करून सेवन करते.

या संपूर्ण प्रक्रियेनंतर, एका प्लेट पॅगपॅगची किंमत अंदाजे 2,030 म्हणजे आपल्या भारतीय चलनानुसार अंदाजे 2,025 रुपये आहे. तर हे तेथील असे लोकं जास्त प्रमाणात खरेदी करतात, ज्यांना रोजचे दोन वेळेचं जेवण मिळायलाही खुप संघर्ष करावा लागतो.

पॅगपॅग ट्रेंडमध्ये का आहे?

फिलीपिन्समधील गरीब झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या अनेक कुटुंबांना दररोज ताजे पदार्थ खरेदी करण्याचे साधन नसते. रोजच्या आधारावर जगणारी ही लोकसंख्या कधीकधी दोन किंवा तीन दिवस उपाशी राहते. पगपॅग हा त्यांच्यासाठी एक स्वस्त पर्याय आहे. आरोग्याला धोका असला तरीही ते पोटभर जेवण देते.

स्थानिक लोकं ही समस्या गरिबीचा परिणाम मानतात. त्यांच्यासाठी, पगपाग हा पर्याय नाही तर एक सक्ती आहे. अनेक पालक म्हणतात की जर त्यांनी ते विकत घेतले नाही तर त्यांची मुले उपाशी झोपतील. या कठोर वास्तवात कोणतीही लाज नाही, फक्त असहाय्यता आहे. पगपाग हा फक्त एक पदार्थ नाही, तर फिलीपिन्स देशातील अनेक भागांमध्ये गरीब लोकांना दररोज होणाऱ्या संघर्षाचे चित्र आहे. हे दर्शवते की अन्न ही एक मूलभूत मानवी गरज आहे आणि जेव्हा ही गरज पूर्ण करता येत नाही, तेव्हा लोक कोणत्याही मार्गाने जगण्याचा प्रयत्न करतात.

KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.