द्राक्षाचा हंगाम सुरू होताच अवकाळीचे संकट, द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना किती कोटींचा फटका, द्राक्ष पंढरी धास्तावली

| Updated on: Mar 17, 2023 | 11:07 AM

नाशिकमधील द्राक्ष उत्पादक शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. यंदाच्या वर्षी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याला मोठा फटका बसला असून कोट्यवधी रुपयांचे नुकसान शेतकऱ्यांचे झाले आहे.

द्राक्षाचा हंगाम सुरू होताच अवकाळीचे संकट, द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना किती कोटींचा फटका, द्राक्ष पंढरी धास्तावली
Image Credit source: Google
Follow us on

नाशिक : द्राक्ष पंढरी म्हणून नाशिक जिल्ह्याची ओळख आहे. मोठ्या प्रमाणात नाशिकमध्ये द्राक्ष उत्पादक शेतकरी आहे. सध्या द्राक्षाचा हंगाम सुरू आहे. मोठ्या प्रमाणात लोकल बाजार आणि परदेशात निर्यात होत असते. मात्र, मागील आठवड्यात आलेल्या अवकाळी पावसाने मोठा शेतकऱ्यांना बसला. अशातच पुन्हा अवकाळी पाऊस पडू लागला आहे. नाशिक जिल्ह्यात पुन्हा दोन दिवसांपासून मध्यरात्री मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळे आधीच द्राक्ष निर्यातीला ब्रेक लागलेला असतांना लोकल बाजारात द्राक्षाकडे कुणी बघायला सुद्धा तयार नाहीये. त्यामुळे तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलेला द्राक्षाचा मनुका करण्याची वेळ येऊन ठेपली आहे.

साधारणपणे नाशिकमधून द्राक्ष विक्रीची कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. मात्र, यंदाच्या वर्षी बांग्लादेश मधील कर कमी न झाल्याने त्याचा ही फटका नाशिकमधील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.

अशातच गेल्या दोन आठवड्यापासून नाशिकमध्ये अवकाळी पाऊस पडू लागला आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात द्राक्ष बागेचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी गारपीठ देखील झाली आहे. त्यामुळे द्राक्ष घडाला फटका बसला आहे. मण्यांना तडे गेले आहे.

हे सुद्धा वाचा

संततधार पाऊस सुरू असल्याने व्यापाऱ्यांनी द्राक्ष बागेचा खुडा बंद केला आहे. त्यामुळे काढणीला आलेला द्राक्ष काय करायचा असा प्रश्न द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना पडला आहे. तर दुसरीकडे द्राक्ष मण्यांना तडे जाऊ लागल्याने काहींनी द्राक्षाचा खुडा करून ठेवला आहे. पण त्याला कुणी खरेदी करत नसल्याने मोठी कोंडी झाली आहे.

परदेशातील अनेक व्यापारी कमी दराने द्राक्ष खरेदी करत आहे. दहा ते बारा रुपयांपर्यंत दर येऊन ठेपले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना झालेला उत्पादन खर्च सोडाच वाहतुकीचा खर्च सुद्धा निघेल की नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सरासरी अंदाज पाहता यंदाच्या वर्षी फक्त परदेशी निर्यातीचा विचार केल्यास 12 कोटीचा फटका बसला आहे.

द्राक्ष बागायतदार संघाच्या माध्यमातून सध्याच्या घडीला ही आकडेवारी काढण्यात आली आहे. द्राक्षाचे स्थानिक व्यापारी सुद्धा द्राक्ष खरेदी करण्यास तयार होत नाहीये. त्यामुळे द्राक्ष काढून मनुका करण्यासाठी द्यायचा का ? याचा विचार आता शेतकरी करू लागले आहे.

नाशिकमधील द्राक्ष बाग यंदाच्या वर्षी संकटात सापडल्या असून सरकारने मदत जाहीर करावी अशी मगणी केली जात आहे. यामध्ये अद्याप पहिल्या अवकाळीची मदत सोडा पंचनामे झालेले नाही, त्यामुळे मोठा फटका द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना बसला आहे.