AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विमानसेवेचा खोळंबा, मध्य रेल्वे धावली मदतीला, 14 विशेष गाड्या जाहीर

गेल्याकाही दिवसात विमान सेवांचे विस्कळीत झालेले वेळापत्रक यामुळे प्रवाशांच्या अडचणीत वाढ झाली आहे. विमान प्रवाशांना दिलासा देण्यासाठी मध्य रेल्वे अतिरिक्त गाड्याचे नियोजन केले आहे.

विमानसेवेचा खोळंबा, मध्य रेल्वे धावली मदतीला, 14 विशेष गाड्या जाहीर
| Updated on: Dec 07, 2025 | 5:41 PM
Share

मुंबई, दि. ६  ( निखिल चव्हाण  ) – इंडिगो  विमान कंपनीची गेली अनेक दिवस सेवा कोलमडल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल सुरु आहेत. पर्यायी विमानांच्या तिकीटाचे दरही अव्वाच्या सव्वा झाल्याने विमान प्रवाशांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. त्यामुळे मुंबई, बंगलोर, दिल्ली, पुणे अशा ठिकाणी प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.मध्य रेल्वेने यातून जादा गाड्या सोडून दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.

देशातील विमान कंपन्यासाठी नवे नियम केंद्र सरकारने जारी केल्यानंतर देशातील सर्वात स्वस्त दरात प्रवास घडवणारी विमान कंपनी इंडिगो हीचे धाबे दणाणले आहे. पुरेसे वैमानिक कर्मचारी नसल्याने इंडिगो कंपनीला अडचणी येत आहेत. त्यामुळे विमानतळांवर प्रवाशांना ताटकळत बसण्याची वेळ आली आहे.यामुळे मध्य रेल्वेने जादा गाड्या सोडून यावर दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.

विमान सेवा कोलमडल्याने मध्य रेल्वेने अतिरिक्त गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे. प्रवाशांच्या वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी मध्य रेल्वेने 14 विशेष गाड्यांचे नियोजन केले आहे.

प्रवाशांच्या वाढलेल्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर, मध्य रेल्वेने विविध सण, हिवाळी सुट्ट्यांच्या काळात प्रवाशांच्या सोयीसाठी 14 विशेष मागणीवर आधारित रेल्वे गाड्यांचे नियोजन करून त्यांची घोषणा केली आहे. या गाड्या मडगाव, नागपूर, बेंगळुरू, लखनऊ, गोरखपूर आणि हजरत निजामुद्दीन (दिल्ली) अशा विविध ठिकाणांदरम्यान चालवण्यात येणार असून राज्यांदरम्यान प्रवाशांना जलद आणि आरामदायी प्रवास घडवतील असे मध्य रेल्वेचे नियोजन आहे.

या विशेष गाड्यांमध्ये एसी प्रथम वर्ग, एसी 2-टियर, एसी 3-टियर, स्लीपर वर्ग आणि सामान्य द्वितीय वर्ग अशा सर्व श्रेणींचा समावेश असेल, ज्यामुळे सर्व प्रकारच्या प्रवाशांच्या गरजा पूर्ण केल्या जातील असे म्हटले जात आहे.

विशेष गाड्यांचे वेळापत्रक:

लोकमान्य तिळक टर्मिनस ते लखनऊ – 6 डिसेंबर, दुपारी 12.15

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई ते हजरत निजामुद्दीन (दिल्ली) – 6 डिसेंबर, सायं. 17.15

पुणे ते बेंगळुरू – 6 डिसेंबर, सायं. 19.00

नागपूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई – 6 डिसेंबर, रात्री 22.10

लोकमान्य तिळक टर्मिनस ते मडगाव – 7 डिसेंबर, सकाळी 11.10

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई ते नागपूर – 7 डिसेंबर, दुपारी 15.30

लोकमान्य तिळक टर्मिनस ते हैदराबाद – 7 डिसेंबर, सायं. 17.20

पुणे ते हजरत निजामुद्दीन (दिल्ली) – 7 डिसेंबर, रात्री 20.20

प्रवाशांच्या आवश्यकतेनुसार मध्य रेल्वेतर्फे आणखी विशेष गाड्यांचे नियोजन केले जात आहे.

Follow Us
राज ठाकरेंचा महाराष्ट्राला गंभीर इशारा: 50 खोके एकदम ok घोषणेवर सडकून
राज ठाकरेंचा महाराष्ट्राला गंभीर इशारा: 50 खोके एकदम ok घोषणेवर सडकून टीका
तुम्ही Gen Z कधी उठणार? वृक्षतोडीवर राज ठाकरेंचं तरुणांना आवाहन
Raj Thackeray : तुम्ही Gen Z कधी उठणार? वृक्षतोडीवर राज ठाकरेंचं तरुणांना मोठं आवाहन
राज्यातील शिक्षक, पदवीधरच्या निकालावरून काँग्रेसला डिवचलं; PM मोदी...
राज्यातील शिक्षक, पदवीधरच्या निकालावरून काँग्रेसला डिवचलं; PM मोदींची पोस्ट चर्चेत!
भाजपच्या बंडखोरांना धक्का देत किरण सरनाईक यांचा विजय; कुटुंबीयांनी...
भाजपच्या बंडखोरांना धक्का देत किरण सरनाईक यांचा विजय; कुटुंबीयांनी व्यक्त केला आनंद, म्हणाले…
शिवसेना पक्षचिन्ह-आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली; कोर्टात नेमकं
शिवसेना पक्षचिन्ह-आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली; कोर्टात नेमकं काय घडलं?
विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
Maharashtra MLC Election Result 2026 : विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत...
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत निवडणुकांवर उपस्थित केले सवाल
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा...
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी!
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश,
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश, 17 नोव्हेंबरला प्रत्यक्ष हजर राहावे लागणार!
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच...
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच... सुप्रिया सुळेंचं भावनिक विधान