Chanakya Niti : अशावेळी कधीच रागवू नका, होईल मोठं नुकसान, चाणक्य काय म्हणतात?
चाणक्य हे एक महान अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते, त्यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये जगण्याचं तत्त्वज्ञान सोप्या भाषेमध्ये सांगितलं आहे. चाणक्य म्हणतात असे काही लोक असतात त्यांच्यावर तुम्ही कधीच रागवू नका.

चाणक्य हे एक महान विचारवंत होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, चाणक्य यांनी या ग्रंथामध्ये ज्या गोष्टी सांगितल्या आहेत, त्या आजच्या काळात देखील उपयोगी पडतात, जेव्हा-जेव्हा आपण एखाद्या मोठ्या संकटात सापडतो, तेव्हा त्यातून बाहेर पडण्यासाठी या गोष्टी रोडमॅप सारखं काम करतात. चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये मानवाने जीवन जगताना काय करावं? आणि काय करू नये? याचं तत्त्वज्ञान अगदी सोप्या भाषेत सांगितलं आहे. चाणक्य म्हणतात राग हा मानसाचा सर्वात मोठा शत्रू आहे, कारण रागामुळे आपले अनेक होणारे कामं देखील बिघडू शकतात. रागीट माणूस कोणालाच नको असतो, त्या उलट जर तुम्ही तुमच्या डोक्यावर बर्फ ठेवला आणि तोंडात साखर ठेवली तर असा माणूस प्रत्येकाला हवा-हवा वाटतो. त्यामुळे तुमचे न होणारे काम देखील होतात. पुढे चाणक्य यांनी असंही म्हटलं आहे, माणूस हा कितीही रागीट स्वभावाचा असला तरी तीन ठिकाणी कधीही राग करू नये, त्यामुळे तुमचंच मोठं नुकसान होण्याची शक्यता असते.
परिस्थिती अनियंत्रित असते तेव्हा – चाणक्य म्हणतात जेव्हा परिस्थिती अनियंत्रित असते, तुमच्या हातात काहीही नसतं, तेव्हा अशा परिस्थितीमध्ये कधीही राग डोक्यात घालू नका, कारण यामुळे परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता असते.
लाहन मुलं चूक करतात तेव्हा – चाणक्य म्हणतात अनेक आई-वडिलांना आपल्या मुलाची चूक झाली की त्याच्यावर ओरडण्याची त्याला मारहाण करण्याची सवय असते, मात्र ही सवय अतिशय चुकीची आहे, कारण मुलं चुकांमधूनच अनेक गोष्टी शिकत असतात, मग अशावेळी तुम्ही त्यांना रागवलात तर त्याचा त्यांच्यावर परिणाम होऊ शकतो, अशावेळी त्यांची नव्या गोष्टी शिकण्याची क्षमता बाधित होऊ शकते.
वृद्ध व्यक्तींवर रागवू नका- चाणक्य म्हणतात जेव्हा एखादा वृद्ध व्यक्ती आपल्याला काही सल्ला देतो, तेव्हा त्याच्यावर रागवू नका, कारण तो आपल्यापेक्षा अनुभवाने खूप मोठा असतो, त्याच्या सल्ल्यामुळे आपला फायदाच होणार असतो.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
