महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरु निवडीचा वाद हायकोर्टात,अनिल गोटे यांचे राज्यपालांवर गंभीर आरोप

| Updated on: Mar 03, 2021 | 11:09 AM

महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. प्रशांतकुमार पाटील यांची केलेली निवड बेकायदेशीर असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल गोटे यांनी केला आहे. Anil Gote

महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरु निवडीचा वाद हायकोर्टात,अनिल गोटे यांचे राज्यपालांवर गंभीर आरोप
अनिल गोटे,, भगतसिंह कोश्यारी, डॉ.प्रशांतकुमार पाटील
Follow us on

मुंबई: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. प्रशांतकुमार पाटील यांची केलेली निवड बेकायदेशीर असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल गोटे यांनी केला आहे. कुलगुरु निवडीबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल झाल्याची माहिती अनिल गोटे यांनी दिली. कुलगुरु निवडी प्रकरणी नोटीस काढण्यात आल्या असून 4 मार्चला सुनावणी होणार आहे. डॉ. एस.के.पाटील यांनी याबाबत याचिका दाखल केलीय. ( NCP leader Anil Gote claimed Vice Chancellor appointment of Mahatma Phule Krishi Vidyapith Rahuri by Governor is illegal)

औरंगाबाद खंडपीठात सुनावणी

डॉ. एस.के.पाटील यांनी डॉ. प्रशांतकुमार पाटील यांच्या निवडीबाबत आक्षेप घेत औरंगाबाद खंडपीठात 3718/21 क्रमांकाची याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्ती एस.वी.गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती श्रीकांत कुलकर्णी यांनी कुलगुरु डॉ.पी.जी.पाटील यांच्यासह इतरांना नोटीस काढली आहे.

आक्षेप काय?

डॉ.एस.के.पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेत महाराष्ट्र कृषी विद्यापीठ कायदा 1983 च्या कलम17 चा दाखला देण्यात आला आहे. यासोबत 2010 च्या विद्यापीठ सुधारणा कायद्याद्वारे मुलाखतप्रसंगी राज्यपाल आणि इतर तीन सदस्यांची उपस्थिती बंधनकारक करण्यात आल्याचं म्हटलंय. त्यानुसार राज्यपाल त्रिलोकचंद महापात्रा यांची 14 ऑगस्ट 2020 रोजी सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली होती. कायद्यातील तरतुदीनुसार सर्व सदस्यांची उपस्थित बंधनकराक असते, त्यापैकी एकजरी सदस्य गैरहजर राहीला असला तरी कामकाज करता येत नाही. मत्र, 28, 29, 30 जानेवारीला झालेल्या बैठकीला त्रिलोकचंद महापात्रा अनुपस्थित होते. डॉ.महापात्रा अनुपस्थित असल्यानं मिटिंग नियमबाह्य असून कायद्यात बंधनकारक आणि तरतूद धुडकावून राज्यपालांनी डॉ.पी.जी.पाटील यांची नियुक्ती केल्याचा दावा करत आव्हान देण्यात आलं आहे.

डॉ.प्रशांतकुमार पाटील यांनी पदभार स्वीकारला

डॉ. प्रशांतकुमार पाटील यांनी मंगळवारी (2 मार्च) 5 वर्षांच्या काळासाठी पदभार स्वीकारला. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कार्यक्षेत्र 10 जिल्ह्यांमध्ये पसरलेले आहे. कृषी क्षेत्रासाठी अद्यायावत तंत्रज्ञान अत्यंत आवश्यक असुन राहूरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या नावलौकिकाप्रमाणे या विद्यापीठाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी काम करणार असल्याचं पाटील यांनी सांगितले.

डॉ. प्रशांतकुमार पाटील कोण आहेत?

डॉ.प्रशांतकुमार पाटील हे भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या मुंबई येथील केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेचे संचालक म्हणून काम करत होते. डॉ.प्रशांतकुमार गुलाबराव पाटील यांनी महात्मा फुले कृषि विद्यापीठातून कृषि अभियांत्रिकी या विषयात बी.टेक पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी आयआयटी खडकपूर येथून एम.टेक. व त्यानंतर नागपूर येथील व्हीएनआयटी येथून पीएच.डी प्राप्त केली आहे.


संबंधित बातम्या:

माजी विद्यार्थीच बनला कुलगुरु, डॉ. प्रशांतकुमार पाटील यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा पदभार स्वीकारला

माजी विद्यार्थीच बनला महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा कुलगुरु; डॉ. प्रशांतकुमार पाटील यांची नियुक्ती

( NCP leader Anil Gote claimed Vice Chancellor appointment of Mahatma Phule Krishi Vidyapith Rahuri by Governor is illegal)