YouTube वरून पुण्याचा तरुण कांदा लागवडीची नवीन पद्धत शिकला, सध्या कमवतोय लाखात पैसे

मल्चिंग पेपरच्या वापरामुळे कमी खत लागत असल्याचं अक्षयचं म्हणणं आहे. त्यामुळे खर्च कमी होतो. त्याचबरोबर कांद्याच्या मुळ्या शेवटपर्यंत मजबूत राहतात.

YouTube वरून पुण्याचा तरुण कांदा लागवडीची नवीन पद्धत शिकला, सध्या कमवतोय लाखात पैसे
YouTube वरून पुण्याचा तरुण कांदा लागवडीची नवीन पद्धत शिकला, सध्या कमवतोय लाखात पैसे
Image Credit source: tv9marathi
| Updated on: Jan 23, 2023 | 2:03 PM

पुणे :  शेतकरी (Farmer) प्रत्येकवेळी शेतीचे नवे प्रयोग (New Expriment) करताना पाहायला मिळतो, त्यामध्ये समजा हवामानाची साथ लाभली तर त्या पिकाचं नुकसान होत नाही. हवामान बदलामुळं शेतीचं अधिक नुकसान झाल्याचं वारंवार पाहायला मिळत आहे. त्याबरोबर पावसाळ्यात सुध्दा अति मुसळधार पावसामुळे शेतीचं नुकसान होत आहे. पुण्यातील एक तरुण युट्यूबचे व्हिडीओ (YouTube Video) पाहून शेती करीत आहे. त्या शेतकऱ्याचे नाव अक्षय असं आहे. फर्राटे मल्चिंग पेपरच्या साहाय्याने तो कांद्याची शेती करीत आहे. त्यामुळे त्याला अधिक फायदा सुध्दा झाला आहे. अक्षयने ही सगळी टेक्निक युट्यूबमधून शिकली आहे.

मल्चिंग पेपरच्या वापरामुळे कमी खत लागत असल्याचं अक्षयचं म्हणणं आहे. त्यामुळे खर्च कमी होतो. त्याचबरोबर कांद्याच्या मुळ्या शेवटपर्यंत मजबूत राहतात.

अक्षय पुण्यात दोन एकरात कांद्याची शेती करतो. या शेतीसाठी त्या सर्वसाधारण 50 हजार खर्च येतो. एका एकरमध्ये तो आठ ते नऊ टन कांद्याचं उत्पन्न घेतो. महाराष्ट्रात कांद्याची शेती करणाऱ्या अग्रगण्य शेतकऱ्यांमध्ये अक्षयचा नंबर लागतो. महाराष्ट्रात कांद्याचं उत्त्पन्न अधिक घेतलं जातं.

अक्षय दोन एकरात चांगली शेती करुन लाखोंचं उत्पन्न घेत आहे. त्यामुळे पुण्यात जिल्ह्यात त्याची अधिक चर्चा आहे.